पाकिस्तानी क्रिकेटपटसोबत विवाह करून ‘या’ हॉट अभिनेत्री संपवले स्वतःचे करिअर, फोटो बघ्याची क्लिक करा

पाकिस्तानी क्रिकेटपटसोबत विवाह करून ‘या’ हॉट अभिनेत्री संपवले स्वतःचे करिअर, फोटो बघ्याची क्लिक करा

बॉलीवूड मधील अभिनेत्रींना केवळ आपले दिसणे आणि फिटनेस याबद्दल जागरूक राहून चालत नाही तर त्यांचे वैवाहिक स्टेटस सुद्धा त्यांच्या बॉलिवूडमधील टिकून राहण्या मधील एक प्रमुख निकष ठरतो. सध्याच्या काळामध्ये दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, करीना कपूर या विवाहानंतर सुद्धा आपले करियर जोरात सुरू ठेवत असल्या तरीही 80 च्या दशकामध्ये मात्र एखाद्या अभिनेत्रीने विवाह करणे म्हणजे आपल्या अभिनयातील करिअर संपुष्टात आणण्या सारखे होते.

करिअरच्या उंचीवर असताना एखाद्या अभिनेत्रीने विवाह करून अभिनय क्षेत्राशी फारकत घेतली तर पुढे जाऊन तिला पश्चाताप झालयाची सुद्धा काही उदाहरणे चित्रपटसृष्टीमध्ये आहेत. ऐंशीच्या दशकातील सुंदर व प्रसिद्ध अभिनेत्री रीना राय अभिनय क्षेत्रांमध्ये आघाडीची अभिनेत्री होती. तिने  पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान याच्यासोबत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला व त्याच्या प्रेमामध्ये वेडे होऊन केवळ चित्रपट सृष्टी मधूनच संन्यास घेतला नाही तर मोहसीनसोबत पाकिस्तान मध्ये स्थायिक होण्याचाही निर्णय रिनाने घेतला व त्याप्रमाणे ती मोहसीन सोबत पाकिस्तान मध्ये गेली. ज्यावेळी रीनाने मोहसिन सोबत लग्न केले त्यावेळी मोहसीन खान क्रिकेट जगामधील आघाडीचा खेळाडू होता तर सर्व प्रोड्युसर ची पहिली पसंती रीनाला होती कारण तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते.

1973 साली नया दौर, नये लोग या चित्रपटाद्वारे रीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले .या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत डँनी त् हे प्रमुख भूमिकेमध्ये होते. 1975 ते 1983 या काळामध्ये रीना राय यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका केल्या व यामध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचा समावेश होता. 1975 ते 1983 या काळामध्ये रिनाने आशा, नागिन, अरपन, अपनापन, जानी दुश्मन, आदमी खिलौना है, प्रेम तपस्या, बदलते रिश्ते, नसीब, धर्म कांटा, बदले की आग, आशा ज्योति, प्यासा सावन, विश्वनाथ, उधार का सिंदूर, सौतन आणि सौ दिन सास के यांसारख्या एकाचढ एक चित्रपटांमध्ये काम केले .

सर्वच निर्माते व दिग्दर्शकांना रीनालाआपल्या चित्रपटांमध्ये साईनकरायचे होते  मात्र रीना राय ची खरी जोडी जमली ती शत्रुघ्न सिन्हा यांच्या सोबत होय.या जोडीने कालीचरण हया चित्रपटामध्ये सर्वात आधी एकत्र काम केले. या जोडीचे प्रत्यक्ष जीवनातही प्रेमसंबंध होते असे मानले जात असे. मात्र काही काळानंतर शत्रुघ्न सिन्हा.यांनी पुनम यांच्यासोबत लग्न केले। ज्यावेळी रीना राय आणि मोहसिन खान या आपापल्या क्षेत्रांमध्ये प्रसिद्ध असलेल्या प्रेमवीरांचे प्रेम प्रकरण सुरू झाले त्यावेळी सर्वत्र यांच्या अफेअरवर चर्चा अतिशय सविस्तरपणे चघळल्या जात असत.

रीना रॉयने मोहसीन च्या प्रेमाखातर आपले फिल्मी करिअर ,आपले कुटुंब, देश सोडून पाकिस्तानमध्ये आपले नवीन आयुष्य सुरू केले.सुरुवातीच्या काळामध्ये सर्व काही व्यवस्थित होते.मोहसिन आणि रिना रॉय प्रामुख्याने लंडन आणि कराची या दोन ठिकाणी वास्तव्य करत होते व कधीतरी ते मुंबईला रीनाच्या आईला भेटायला येत असत. मात्र या सर्व काळामध्ये तिने कोणत्याही चित्रपटांमध्ये अभिनय केला नाही व पूर्णपणे संसारी आयुष्यामध्ये ती रमली. काही काळानंतर त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले जिचे नाव जन्नत ठेवले गेले.

मोहसीन पासून विभक्त झाल्यानंतर रिनाने आपल्या मुलीचे नाव बदलून ते सनम असे केले. मोहसीन सोबत सुरुवातीच्या काळ हा अतिशय प्रेमाचा व स्वप्नवत गेल्यानंतर आपण एका पूर्णपणे भिन्न व्यक्ती मत्त्वाच्या विरुद्ध व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती सोबत लग्न केले आहे याची जाणीव तिला झाली. त्याचे वर्तुळ हे विलासी आयुष्य जगणारे होते या आयुष्यामध्ये रिनाला कोंडल्यासारखे होऊ लागले। यानंतर मोहसीनने लंडन येथे नागरिकत्व घेऊन तिथे स्थाईक होण्याचा विचार बोलून दाखवला यासाठी रीना तयार नव्हती व शेवटी तिने मोहसीनपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीच्या काळामध्ये मोहसीनने आपल्या मुलीचा ताबा स्वतःकडे ठेवला. आपल्या मुलीची कस्टडी मिळावी यासाठी रीनाने जंगजंग पछाडले.रीनापासून विभक्त झाल्यानंतर मोहसीन पासून तीन विवाह केले. आपल्या तिसऱ्या विवाहाच्या वेळी अखेरीस त्याने सनमची कस्टडी रीनाला दिली.

कधीकाळी एका सुपरस्टारचे आयुष्य जगलेल्य रीनाला चित्रपटस्रुष्टी पासून वेगळे झाल्यानंतर भारतात परतल्यावर आपण नक्की काय गमावले याची जाणीव होऊन मोहसीन सोबत लग्न करण्याच्या निर्णयाचा पश्चात्ताप होऊ लागला. मोहसीन च्या प्रेमाखातर तिने आपले इतक्या मेहनतीने मिळवलेले स्टारडम पणास लावले होते मात्र आता पुन्हा ते सगळं काही सिद्ध करण्याची वेळ  निघून गेली होती. सध्या रीना आपली मुलगी सनम हिच्यासोबत मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रा पासून अलिप्त असे आयुष्य जगत आहे.

beingmarathi

Related articles