‘या’ अभिनेत्रीच्या मावशीच्या प्रेमात वेडा झाला होता ‘सलमान खान’, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री, दिसते खूपच सुंदर, पहा फोटो

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जाणारा व ज्याच्या अफेअरच्या आणि लग्नाच्या चर्चा प्रसारमाध्यमांचा सर्वात आवडीचा विषय आहे असा सलमान खान आणि कियारा अडवाणी यांचे एक वेगळेच नाते किंवा ओळख कियारा ने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.
सलमान खानच्या आयुष्यामध्ये त्याच्या चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वीपासून अनेक मुली येऊन गेल्या आहेत ज्यांच्या सोबत तो अगदी खुलेआमपणे प्रेम संबंधांमध्ये वावरला आहे मात्र यांपैकी कोणासोबतही त्याने अद्याप विवाह केला नाही .ऐश्वर्या राय साठी सलमान खान च्या भोवती निर्माण झालेले वादाचे वलय आणि कटरीना सोबत त्याचे झालेले ब्रेकअप हा तर नेहमीच चर्चेचा विषय होता.

काही काळापूर्वी सलमान लुलिया वेंटोर या त्याच्या सध्याच्या गर्लफ्रेंड सोबत विवाहबद्ध होण्याच्या अफवानाही जोर आला होता. असा हा बॉलिवूडचा भाईजान त्याच्या आयुष्यातील प्रेम संबंधांवर फारसे भाष्य करताना दिसत नाही मात्र त्याच्या आयुष्यामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये येण्यापूर्वी चे त्याचे पहिले प्रेम म्हणजे कियारा अडवाणी ची मावशी शाहीन जाफरी होती.
त्यावेळी सलमान बॉलिवूड मध्ये आला नव्हता व कियाराच्या आई सोबत त्याची घनिष्ठ मैत्री होती. कियाराच्या आई मार्फतच सलमान ची शाहीन सोबत मैत्री झाली व ते एकमेकांसोबत खूप वेळ घालवू लागले व बराच काळ ते प्रेम संबंधांमध्ये सुद्धा होते. मात्र त्यानंतर हे संबंध विवाह मध्ये परावर्तित होऊ शकले नाही.

कियारा आडवाणी च्या मावशी सोबत डेटिंग ला सुरुवात केली त्यावेळी या दोघांचेही वय अवघे 19 वर्षांचे होते व या दोघांचेही ते पहिलेच रिलेशनशिप होते. कियारा आणि सलमान यांच्या कुटुंबांमध्ये हे रिलेशनशिप संपल्यानंतर सुद्धा चांगले संबंध आहेत. कियाराला चित्रपट सृष्टीमध्ये येण्याचा ब्रेक सुद्धा सलमानने मिळवून दिला.

कियाराचा पहिला चित्रपट फगली होता. यानंतर कियारा ने आपल्या कबीर सिंग मधील उत्कृष्ट अभिनयाने व निरागस सौंदर्याने सर्वांचीच मने जिंकून घेतली व सध्या तिच्याकडे ओळीने रिलीज होणाऱ्या चित्रपटांची रांग आहे .अनेक बिग बॅनर चित्रपट कियाराने साइन केलेले आहेत. कियाराला खूप मोठी फिल्मी पार्श्वभूमी आहे. कियारा ही अशोक कुमार यांची नात असून सईद जाफरी यांची भाची आहे.