‘इस्ला म’साठी बॉलीवूड सोडणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला मौलानासोबत गुपचूप लग्न, आता करणार…

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे जिथे प्रसिद्धी, झगमगाट, ग्लॅ म र आणि पैसा या सर्वच गोष्टी अगदी मोहवून टाकतात त्यामुळे या मायाजाला मध्ये एकदा प्रवेश केला की तेथून बाहेर पडण्यास जणूकाही मज्जाव करतात. प्रकाशझोतामध्ये राहण्यासाठी बॉलिवूड मधील कलाकार अनेक नवनवीन फंडे आजमावत असतात, पब्लिसिटी स्टंट करतात मात्र या माया नगरीमध्ये आपले अस्तित्व वर्षानुवर्षे टिकून ठेवायचे असा चंगच जणू काही बांधतात.
मात्र या सर्वांमध्ये सध्याच्या काळामध्ये काही काही अभिनेत्रींनी आपल्या करिअरच्या अगदी सुरुवातीलाच केवळ आपल्या धर्माच्या विपरीत असे वर्तन करायचे नाही म्हणून बॉलीवूड ला व एकंदरीतच अभिनय क्षेत्राला अलविदा केल्याचे दिसून येते. या निर्णयामुळे या अभिनेत्रींच्या चाहत्यांना निश्चितच धक्का बसला आहे.
या अभिनेत्री म्हणजेच दंगल या चित्रपटांमधून प्रसिद्धीस आलेली जायरा वसीम आणि नुकतेच चर्चेमध्ये असलेली सना शेख ही अभिनेत्री होय. सना आपल्या सौंदर्यामुळे खूपच प्रसिद्ध होती. बिग बॉस आणि जय हो या चित्रपटांमधून तिला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. सनाने बॉलीवुड बरोबरच काही कन्नड, तमिळ ,तेलुगू इत्यादी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला होता.
सध्या तिला काही चित्रपटांच्या ऑफर सुद्धा येत होत्या. मात्र अचानक तिने आपल्याला आपल्या धर्मासाठी सेवेत वाहून घ्यावयाचे आहे व यासाठीच आपण बॉलीवूड मधून कायमचे संन्यास घेत आहोत असा संदेश आपल्या चाहत्यांना दिला. त्यावेळेस सगळ्यांसाठी हा एक खूप मोठा धक्का होता.
सना खान ही एक प्रसिद्ध मॉडेल म्हणून सुद्धा गणली जाते .सनाचे बराच काळ प्रसिद्ध कोरिओग्राफर मेलविन लुईस सोबत प्रेम संबंध होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघांचे ब्रेक-अप झाले व त्यानंतर सनाने मेल्विन लुईसने कशा प्रकारे आपले शोषण केले आहे यासंदर्भात अनेक आरोपही केले होते. मात्र यानंतर अचानक ऑक्टोबर मध्ये तिने आपण बॉलिवूड आणि एकंदरीतच चित्रपट सृष्टीला कायमचा अलविदा करत असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली.
या पोस्टमध्ये तिने बॉलिवूडमध्ये आपल्याला पैसा, प्रसिद्धी व मानसन्मान खूप मोठ्या प्रमाणात मिळाले मात्र माझ्या धर्माच्या शिकवणुकीतून मला या सत्याचा शोध लागला आहे की केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळवणे हेच आपल्या जगण्याचे अंतिम उद्दिष्ट नसून गरजूंना मदत करणे हा सुद्धा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे व यासाठीच इथून पुढे चित्रपटसृष्टीतील पैसा आणि प्रसिद्धी यांच्या मागे न धावता आपण धर्माच्या आणि मानवतेच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आहे असे या पोस्टमध्ये तिने सांगितले होते.
त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी सनाने गुजरात मधील मौलाना मुफ्ती अनस यांच्यासोबत अगदी साध्या पद्धतीने निकाह केला. या निकाहचे फोटो आणि व्हिडिओज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत व या फोटोज आणि व्हीडिओज वर अनेक चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. तर काही ट्रॉलर्सने ट्रोलसुद्धा केले आहे.

सनाने आपल्या पतीसोबत चे फोटो इंस्टाग्राम वर शेअर करत आपण धर्मासाठी व अल्लाह साठी एकत्र आलो आहोत आणि या जन्मामध्ये सुद्धा आणि जन्नत मध्ये सुद्धा एकमेकांसोबत राहू अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे .सना या फोटोज मध्ये खूपच सुंदर दिसत असून खूप आनंदी सुद्धा वाटत आहे .तिच्या चाहत्यांनी तिला च्या बॉलीवूड सोडण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्यास सुचवले आहे मात्र तिच्या निकाहनंतर तिचे वैवाहिक आयुष्य सुखासमाधानाचे जावो यासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.