एकेकाळी 96 किलो वजन असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने केला आहे कायापालट, आता तंदुरुस्त राहण्यासाठी घेते आहे असा आहार !

एकेकाळी 96 किलो वजन असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने केला आहे कायापालट, आता तंदुरुस्त राहण्यासाठी घेते आहे असा आहार !

बॉलिवूडमधील सध्या चर्चेत असणारे अनेक सितारे त्यांच्या लुक्स आणि फिटनेस मंत्रा मुळे प्रसिद्ध आहेत. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या फिट आणि फाईन  अवतारामुळे नेहमी चर्चेत असतात। हे सितारे आपल्या जीमच्या वर्कआउटचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यां पर्यंत पोहोचलत असतात व यातून त्यांना मोठा पाठिंबा पण दिला जातो व पसंती सुद्धा दर्शवली जाते.

या इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेते व अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी स्थुलपणाचा त्रास सहन केला आहे व बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यासाठी  या स्थुलपणावर मात करण्यासाठी प्रचंड मेहनत सुद्धा घेतली आहे. स्टार किड्स चा सुद्धा याला अपवाद नाही. सारा खान, सोनम कपूर ,अर्जुन कपूर, करीना कपूर या सर्व स्टारकिडनी  बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याअगोदर सर्वात आधी आपले वजन कमी करून लट्ठपणा घालवला आहे व आपला हा अवतार टिकवून ठेवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.

सारा अली खान ने आपली नजाकत ,अभिनय सैफ अली खान आणि आई आणि वडील या दोघांच्याही फिल्मी कारकीर्दीची पार्श्वभूमी घेत बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्वतंत्र असे स्थान निर्माण केले आहे. सारा आपल्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे ते तिच्या साधेपणामुळे व तिच्या सौंदर्यामुळे.साराने तिच्या बॉलिवूडमध्ये येण्या अगोदर चे काही व्हिडिओ शेअर केले होते यामध्ये ती लठ्ठ दिसत असून तिला ओळखता येणेही कठीण आहे.यावरून साराने सध्याचा आपला फिटनेस राखण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत हे दिसून येते.

सारा आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिम वर्क आऊट करण्यासोबतच योगा आणि डान्सला सुद्धा प्राधान्य देते. व्यायामाबरोबरच सारा आपल्या आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवते. वरूण धवन सोबत सध्या कुली नंबर वन या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना वरुणने दुपारच्या वेळी घेतलेल्या जेवणाचे फोटो इंस्टाग्राम वर वरून शेअर केले होते या फोटोला त्यांनी लंच असे कँप्शन दिले आहे आणि विशेष म्हणजे या जेवणाच्या प्लेटमध्ये ब्रेडचे स्लाइस, थोडीशी भाजी, आणि काकडी एवढेच पदार्थ दिसत आहेत. इतक्या जास्त प्रमाणात आपल्या आहारावर नियंत्रण ठेवत साराने हा पल्ला गाठला आहे.

चित्रपट सृष्टी मध्ये येण्यापूर्वी साराला पीसीओडीचा त्रास होता व तिचे वजन वाढत होते .त्यावेळी साराचे वजन 96 किलो इतके होते मात्र सिनेमा सृष्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी साराने खूप मेहनत घेतली .जिम, योग्य आहार घेत साराने फिट शरीर प्राप्त केले. चित्रपट सृष्टी मध्ये सौंदर्यसोबतच आपल्या अभिनय क्षमतेला सुद्धा साराने सिद्ध केले आहे. आपल्या पहिल्या चित्रपट केदारनाथमधून सुशांत सिंग राजपूत सोबत साराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते त्यानंतर सिंबा, लव आज कल या सारखे चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली.

beingmarathi

Related articles