जेव्हा शाहरुख खानने पत्नी गौरीला बुरखा परिधान करायला लावला आणि तिचे नाव आयेशा करण्यास सांगितले तेव्हा गौरीने दिले असे उत्तर

जेव्हा शाहरुख खानने पत्नी गौरीला बुरखा परिधान करायला लावला आणि तिचे नाव आयेशा करण्यास सांगितले तेव्हा गौरीने दिले असे उत्तर

सध्या लव जिहाद ही संकल्पना खूपच विवादास्पद चर्चामध्ये आहे  .याअगोदर सुद्धा हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्मियांना एकमेकांशी विवाह केल्याची अनेक उदाहरणे दिसून आली आहेत. मात्र अनेक प्रसिद्ध मुस्लिम सेलिब्रिटीज ने सुद्धा हिंदू धर्मीय मुलींसोबत विवाह केला व तो निभावून सुद्धा नेला आहे.

मात्र या विवाहाला पार पाडण्यासाठी आवश्यक रीतीरिवाज पाळण्यासाठी कधीही आपल्या हिंदू धर्मीय पत्नीला मुस्लिम धर्माचे रितीरिवाज पाळण्याची सक्ती त्यांनी केली नाही व सर्वधर्मसमभावाचे एक अनोखे उदाहरण समोर ठेवले  . याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे किंग खान शाहरुख खान होय .

शाहरुख खानने आपल्या हिंदुधर्मीय. मैत्रिणींसोबत विवाह केला शाहरुख खान ने गौरी सोबत विवाह केला ती एका हिंदी पंजाबी कुटुंबातील मुलगी होती. या विवाहाला सुरुवातीला या दोघांच्या भिन्न धर्मामुळे कुटुंबियांचा विरोध होता  मात्र या सर्व अडचणींमधून तावून-सुलाखून त्यांनी विवाह केला.   जवळपास 27 वर्षे शाहरुख खान आणि गौरी हे एक आदर्श पती-पत्नी म्हणून  संपूर्ण बॉलिवूडमध्ये परिचित आहेत.

मात्र त्यांचा हा प्रवास सामाजिक नीतीनियमांच्या दृष्टीने निश्चितच सोपा नव्हता. या निमित्ताने अनेक गमतीशीर प्रसंग सुद्धा त्यांच्या आयुष्यात घडलेले आहेत. अशाच  एका प्रसंगाला शाहरूखने काही वर्षांपूर्वी  एका मुलाखतीत उजाळा दिला होता. यामध्ये त्याने गौरीला आजपासून बुरखा परिधान करावा लागेल व तिचे नाव गौरी च्या ऐवजी आयेशा असे असेल असे सांगितले तेव्हा काय घडले असेल याचे खूप रसभरीत वर्णन केले. 

गौरी आणि शाहरुखचा विवाह झाला त्यानंतर त्यांच्या रिसेप्शनच्या वेळी अतिशय पारंपरिक असे वातावरण होते व सर्व पारंपरिक विचारसरणीचा  पगडा असलेले लोक तिथे उपस्थित होते. या सर्वांना शाहरुख इस्लामधर्मीय असल्याची कल्पना होती व त्यामुळे त्यांनी आता गौरीला तिचे नाव बदलावे लागेल का, धर्म बदलावा लागेल का यासंदर्भात चर्चा सुरू केल्या होत्या.

उपस्थितांमध्ये ही कुजबुज ऐकून मुळातच विनोद बुद्धी असलेल्या शाहरूखने या प्रसंगाला अधिक गमतीशीर बनवण्यासाठी गौरीला सर्वांना ऐकू जाईल अशा सुरात म्हटले की आता तू  नमाज अदि कर,बुरखा घाल, उद्यापासून तुझे नाव आयेशा असेल व बुरखा परिधान केल्याशिवाय तू कुठेही बाहेर पडू शकत नाही हे ऐकून गौरीच्या नातेवाईकांना गौरीने अगोदरच धर्मांतर केले की काय असे वाटले.

मात्र त्यावेळी शाहरुखने ही सर्व प्रकारची गंमत असल्याचे स्पष्ट केले व सर्वत्र हशा पिकला.  हा प्रसंग सांगताना शाहरुख खानने पती आणि पत्नी यांनी आंतरधर्मीय विवाह केला असला तरी एकमेकांच्या धर्माप्रती नेहमीच आदर बाळगला पाहिजे असे सांगितले.

beingmarathi

Related articles