अमृता सिंगचा ‘या’ क्रिकेटरशी साखरपुडा होऊन देखील केले सैफ लग्न, कारण वाचून व्याल चकित…!

अभिनय आणि क्रिकेट यांचे नाते हे खूप पूर्वीपासून राहिले आहे. बॉलीवूड आणि क्रिकेट या दोन्ही झगमगाटाच्या दुनियेतील क्षेत्रांमधील लोक एकमेकांना भेटतात व एकमेकांच्या सोबत काही वेळ घालवून एकमेकांच्या प्रेमामध्ये वेडेसुद्धा होतात व यामधील काही जोड्या या विवाह करून अगदी सुखा-समाधानाने नांदत आहेत जसे की मन्सूर अली खान पटौदी व शर्मिला टागोर हे याचे अगदी मूर्तिमंत उदाहरण आहे.
सध्याच्या काळातील अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सुद्धा क्रिकेट आणि बॉलिवुड मधील कनेक्शन ठळकपणे दाखवून देते. मात्र ऐंशीच्या दशकामध्ये हे समीकरण प्रेक्षकांसाठी अगदी नवीनच होते.अमृता सिंग त्यावेळी आपल्या करिअरच्या आलेखा मध्ये अगदी उंचीवर होती. रवी शास्त्री सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर नवनवे विक्रम रचत होता.
अशा या आपापल्या क्षेत्रांमधील यशस्वी प्रेम वीरांनी आपले प्रेम उघड न करण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न केला .अमृता सिंग साठी त्यावेळी चित्रपट सृष्टीमधील अगदी आघाडीचे अभिनेत्रीसुद्धा वेडावले होते मात्र तिला रवि शास्त्री आपल्या जोडीदाराच्या रुपात भावले .ती रवी शास्त्री यांच्या क्रिकेटच्या मॅचेस ला हजेरी लावू लागली होती.
इंडिया टुडे या अग्रगण्य मासिकाच्या कव्हर पेजवर रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांचा एकत्र फोटो झळकला आणि इतके दिवस हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या अफवा नसून त्यांचे खरोखरच एकमेकांवर प्रेम आहे याची जगजाहीर घोषणाच जणू या दोघांनी केली व त्यानंतर अगदी अचानकपणे त्यांनी एकमेकांशी साखरपुडा सुद्धा केला.
साखरपुडा होईपर्यंत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रवी आणि अमृता यांच्यामध्ये नंतर मात्र काहीतरी बिनसले व या साखरपुड्याची परिणीती विवाहामध्ये होऊ शकली नाही. रवी शास्त्री यांनी या प्रकरणाचे स्पष्टीकरण देताना सांगितले की त्यांना आपली बायको ही एक गृहिणी म्हणून घरासाठी वेळ देणारी स्त्री हवी आहे.त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये काम करणारी अभिनेत्री पत्नी म्हणून नको आहे व अशाप्रकारे या दोघांचे प्रेम संबंध संपुष्टात आले.
त्यानंतर रवी शास्त्री यांनी आपल्या अपेक्षेप्रमाणे हव्या असलेल्या भावी वधूची निवड करत रितू सिंग यांच्याशी 1990 साली विवाह केला. अमृता सिंग रवी शास्त्री यांच्या प्रेमात अगदी वेड्या झाल्या असल्या तरीही अभिनय हे त्यांचे पहिले प्रेम होते व आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअर त्या लग्नासाठी इतक्या उंचीवर असताना सोडू इच्छित नव्हत्या म्हणूनच त्यांनी रवी शास्त्री यांच्या निर्णयाचा पूर्ण सन्मान केला.
रवी शास्त्री यांच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर पूर्णपणे एकट्या पडलेल्या अमृताच्या आयुष्यामध्ये सैफ यांच्या रूपाने हवा तसा जोडीदार आला. सैफ अली खान हा त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये अगदी नवखा होता व अमृता सिंग यांच्यापेक्षा तब्बल बारा वर्षांनी लहान होता. मात्र वय किंवा अन्य कोणतेही समाजाने लादलेली बंधने अमृता आणि सैफ यांच्या प्रेमाच्या आड आले नाही आणि त्यांनी 1991 साली विवाह केला. सुरवातीच्या काळामध्ये सर्व काही आलबेल चालले असताना बारा वर्षांनंतर या दोघांमध्ये वाद-विवाद वाढू लागले. तोपर्यंत या दोघांना दोन मुले सुद्धा झाली होती .

आपले संबंध अधिक ताणले जाऊ नयेत यासाठी सैफ अली खान आणि अमृता सिंग 2004 साली विभक्त झाले. सध्या अमृतासिंग आपल्या मुलांसोबत राहत असून मुलांची देखभाल करण्यामध्ये आपला वेळ त्या व्यतीत करत असतात.सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची कन्या सारा अली खान ही सध्या बॉलिवूडमधील उदयोन्मुख अभिनेत्रींमध्ये गणली जाते. घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खान याने सुद्धा नवीन आयुष्याची सुरुवात केली व करीना कपूर हिच्यासोबत तो विवाहबद्ध झाला.