मराठमोळ्या श्रेयस तळपदे ह्यांच्या पत्नी आहेत प्रसिद्ध निर्मात्या, जाणून घ्या त्याच्या कॉलेज लाईफ प्रेमकहाणी विषयी माहित नसलेल्या काही गोष्टी

मराठमोळ्या श्रेयस तळपदे ह्यांच्या पत्नी आहेत प्रसिद्ध निर्मात्या, जाणून घ्या त्याच्या कॉलेज लाईफ प्रेमकहाणी विषयी माहित नसलेल्या काही गोष्टी

मराठी भाषिक चित्रपटांमधील काही कलाकारांनी आपला ठसा हिंदी चित्रपट सृष्टीमध्येसुद्धा निर्माण केला आहे व आपली स्वतंत्र अशी ओळख सुद्धा निर्माण केली आहे. या कलाकारांविषयी मराठी प्रेक्षकांना नेहमीच आदर वाटतो आणि त्यांच्या आयुष्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता ही असते .मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेकविध भूमिका साकारलेल्या आणि हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये सुद्धा बिग बॅनर चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवणाऱ्या श्रेयस तळपदे या कलाकाराने एक अभिनेता म्हणून निश्चितच खूप मोठी झेप घेतली आहे. श्रेयस ने आपल्या करिअरची सुरुवात ही मराठी टेलिव्हिजन वरील मालिकांमधून केली होती .

मराठी सिरियल्स मधील एक कलाकार ते एक प्रथितयश अभिनेता हा लांबचा पल्ला गाठणे मध्ये श्रेयसने प्रचंड असा संघर्ष केलेला आहे व या संघर्षामध्ये त्याला त्याच्या कुटुंबीयांनी नेहमीच साथ दिली व त्यामध्ये सुद्धा त्याच्या पत्नीने त्याला नेहमीच भक्कम असा पाठिंबा प्रत्येक पावलावर दिल्याचे दिसून येते. बॉलीवूड मधील अभिनेत्यांच्या अभिनेत्रींच्या प्रेम कहाण्या अगदी सुप्रसिद्ध असतात मात्र श्रेयसची लव्हस्टोरी सुद्धा या सर्व प्रेम कहाण्यांमध्ये अगदीच रंजक आणि मधुर अशीच आहे.श्रेयसच्या चाहत्यांसाठी आपण  श्रेयस आणि आणि त्यांची पत्नी दिप्ती यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

श्रेयस तळपदे यांचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला .अभिनयाची आवड त्यांना सुरुवातीपासूनच होती व ते याबाबतीत निश्चितच भाग्यवान होते की त्यांना अगदी करियरच्या सुरुवातीलाच मराठी टेलिव्हिजनवरील आघाडीच्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. श्रेयस तळपदे यांचा चेहरा हा तरुण वर्गामध्ये खूपच लोकप्रिय झाला होता. व यामुळे त्यांना निरनिराळ्या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलना मध्ये प्रमुख अतिथी म्हणून ही आमंत्रणे येऊ लागली होती.

असेच सन 2000 मध्ये त्यांच्या सध्याच्या पत्नी दिप्ती या ज्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत होत्या त्या स्नेहसंमेलनासाठी श्रेयस प्रमुख अतिथी म्हणून जाणार होते व यासाठीचे आमंत्रण घेऊन दीप्ती त्यांच्याकडे गेल्या व अगदी लव अँट फर्स्ट साईट प्रमाणे श्रेयस दिप्ती यांच्या  कडे आकृष्ट झाले व स्नेहसंमेलन पार पडल्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांनी दीप्ती यांना लग्नासाठी ची मागणी घातली.

एका  प्रसिद्ध सेलिब्रिटीनी आपल्याला मागणी घातली हे ऐकून देखील त्यावेळी महाविद्यालयात शिक्षण घेणारी एक तरुणी असलेल्या दिप्ती या स्वप्नात वाहवत गेल्या नाही तर त्यांनी या प्रस्तावावर विचार करण्यासाठी बराच वेळ घेतला व त्यानंतर घरच्यांच्या संमतीने श्रेयस यांच्यासोबत त्या विवाहबद्ध झाल्या. दीप्ती या केवळ श्रेयस तळपदे यांची पत्नी इतकीच ओळख समाजात घेऊन वावरत नाही तर त्या पेशाने सायकॅट्रिस्ट आहेत आणि श्रेयस यांच्यासोबत सध्या निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहेत.

दीप्ती या स्वतः सुद्धा काही चित्रपटांच्या निर्मितीमध्ये स्वतंत्रपणे सहभागी झाल्या आहेत. श्रेयस तळपदे यांचे सनई-चौघडे ,बाजी यांसारखे मराठी चित्रपट आणि हिंदीमधील गोलमाल, इक्बाल यांसारखे बिग बँनरसोबतचे चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते.श्रेयस तळपदे हे नेहमीच अभिनय क्षेत्रामध्ये निरनिराळे प्रयोग करत असतात व या प्रत्येक नवीन प्रयोगांमध्ये दीप्ती यांचा अगदी भक्कम पाठिंबा असतो हे नेहमीच दिसून आले आहे .एक यशस्वी डॉक्टर, पत्नी यांसोबतच दीप्ती  यांनी एका गोड मुलीला काही दिवसांपूर्वी जन्म दिला आहे. श्रेयस आणि दीप्ती हे आपल्या मुलीच्या सोबत बराचवेळ घालवण्यात सोशल मीडियावर नेहमीच दिसून येतात. वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांना सांभाळून घेत श्रेयस आणि दीप्ती यांची प्रेम कहानी ही सुखासमाधानाने मार्गक्रमण करत आहे.

beingmarathi

Related articles