ही सारेगमप लिटिल चॅम्प’ अडकली विवाह बंधनात .. प्राजक्ता गायकवाडने शेयर केले मैत्रीनीचे सुंदर फोटो

मराठी सारेगमप लिटिल चॅम्प प्रचंड गाजलं होतं. जवळपास 12 वर्षांनंतर देखील अजून त्या छोट्या कलाकारांची क्रेझ टिकून आहे. आर्या आंबेकर , केतकी माटेगांवकर, रोहित राऊत , कार्तिक गायकवाड असे सर्व लिटल चॅम्प’ अजून देखील सर्वांच्या लक्षात आहेत. आता ते बरेच मोठे झाले आहेत. अनेकांनी संगीत हेच करियर म्हणून देखील निवडले आहे. आर्या आता प्रसिद्ध गायिका झाली आहे. या बरोबरच या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड देखील नेहमी चर्चेत असते. नुकताच कार्तिक गायवाडचा साखरपुडा झाला होता.
तिने या संबंधीचा एक विडियो देखील शेयर केला होता. कार्तिकी आज विवाहबंधनात अडकली आहे. रोंनीत पिसे यांच्याशी कार्तिकी हिने लग्नगाठ बांधली आहे/ रोंनीत हा मूळचा पुण्याचा असून तो एक व्यवसायिक आहे. रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून कार्तिकीचे बाबा कल्याण गायकवाड आणि रोंनीतचे बाबा हे एकमेकांना आधीपासून ओळखत होते. त्यांच्या ओळखीतूनच हे लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमले आहे.
25 जुलैला कार्तिकीचा साखरपुडा संपन्न झाला होता. कार्तिकी ने देखील रोंनीत विषयी एका मुलाखतीत संगितले होते की रोंनीत आणि माझे क्षेत्र खूप वेगळे आहे, पण त्याला कलेची आवड आहे आणि तो उत्तम तबला देखील वाजवितो. तो माझ्या कलेचा खूप आदर करतो. कार्तिकीच्या लग्नाला स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील येसुबाई यांची भूमिका केलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड देखील उपस्थित होती. या बरोबरच गायिका आर्या आंबेकर देखील उपस्थित होती. कार्तिकीच्या बाबांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लग्नाचे निमंत्रण दिले होते.