कुणाला हवी असते जिम तर कुणी देत नाही किसिंग सिन! ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या शूटिंगसाठी असतात अजब अटी

कुणाला हवी असते जिम तर कुणी देत नाही किसिंग सिन! ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या शूटिंगसाठी असतात अजब अटी

कुणाला हवी असते जिम तर कुणी देत नाही किसिंग सिन! ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या शूटिंगसाठी असतात अजब अटी

बॉलीवुड आणि कलाकारांचे नखरे यावर अनेक किस्से फिल्मी दुनियेत आहेत. कलाकार कायम आपल्या मनमानीला समोरच्याला बळी पाडतात. एखादी मूव्ही करण्यासाठी त्यांच्या अनेक अटी असतात आणि त्या मान्य करणे दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला देखील भाग असते. अशा अनेक अफवा आहेत की फक्त अभिनेत्रींचा नखरा दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना झेलावा लागतो. काही अभिनेतेसुद्धा असे आहेत ज्यांना आपल्या अटींवर काम करायला आवडते आणि ते तसे करतात सुद्धा!

सलमान खान : सलमान खान मूव्ही साईन करण्यापूर्वी किसिंग सीन आणि बोल्ड सीन्स देणार नाही अशी अट घालतो. सलमान इंडस्ट्रीचा भाई आहे. त्याने चित्रपटात काम करावं म्हणून अनेक निर्माते आणि दिग्दर्शक वाट पाहत असतात मात्र, त्यांना ही अट मान्य करूनच मग पुढे शूट सुरू करावे लागते.

आमिर खान : आमिर खान परफेक्शनिस्ट आहे. त्याचे काम बोलते आणि म्हणून त्याला काम मिळते. त्याची एक अट असते आणि ती म्हणजे तो लो अँगल शॉट देणार नाही.

ऋतिक रोशन : ऋतिक रोशन हा उत्तम डान्सर आणि छान अभिनेता आहे. त्याची सिनेमा साईन करताना अट म्हणजे ही असते की, अशाच ठिकाणी शूट होईल जिथे उत्तम जिम असेल. त्याबरोबरच तो त्याचा शेफ सोबत घेऊन कामावर येईल.

करीना कपूर : करीना कपूर म्हणजे आपल्या बेगम साहेबा तर त्यांच्या नखर्यांमुळेच जास्त चर्चेत असतात असा अनेकांचा समज आहे. मात्र, तिची एकच अट असते आणि ती म्हणजे बी ग्रेड स्वॅक्टर सोबत काम करणार नाही.

कंगना रानोत : कंगना रानोतची एक अट असते आणि ती तिच्या इतकीच अजब आहे. ते म्हणजे कोणी तिला प्रश्न विचारू नयेत, जे काही विचारायचे असेल ते मॅनेजरला विचारावे.

सोनाक्षी सिन्हा : सोनाक्षी सिन्हा आपल्या एका अटीमुळे सर्वांना खामोश करते आणि ती अट असते, नो किसिंग सीन्स! आणि ती कोणतेही बोल्ड सीन्स सुद्धा देत नाही.

अक्षय खन्ना : अक्षय खन्ना निगेटिव्ह रोलसुद्धा अती निगेटिव्ह असेल तर करत नाही आणि त्याला स्वतः ला हिरो मारत आहे असे सिन असतील तर तो त्या सिनेमाला नाही म्हणतो.

Being Marathi

Related articles