यामुळे सुशांतच्या परिवाराने केली होती सीबीआय चौकशीची मागणी! सुशांतच्या बहिणीने सांगितले कारण

यामुळे सुशांतच्या परिवाराने केली होती सीबीआय चौकशीची मागणी! सुशांतच्या बहिणीने सांगितले कारण
अभिनेता सुशांतसिंग राजपूतने स्वतःचे आयुष्य संपवून आता दोन महिन्याहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र त्याने आयुष्य का संपवले याविषयीचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बॉलिवूडमधील प्रस्थापित मंडळी तसेच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांच्या छळाला कंटाळून सुशांतने आयुष्य संपवले असा आरोप करण्यात येत आहे. याच अनुषंगाने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी सुशांतच्या कुटुंबीयांनी केली आहे.
सीबीआय चौकशीची मागणी का करण्यात आली याविषयी खुद्द सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तिने आता खुलासा केला आहे. काल सुशांतच्या बहिणीने सुशांतसाठी प्रार्थनासभा आणि गायत्री मंत्राचा जप आयोजित केला होता. जगभरातून या मध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला होता. यानंतर श्वेताने आपल्या परिवाराकडून सीबीआय चौकशीची मागणी का करण्यात येत आहे हे ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.
यामध्ये श्वेताने म्हटले आहे कि, ‘आम्ही अनेक गोष्टींचा तपास करत असून, अनेक तथ्य समजून घेत आहोत. तपास पुढे सरकत आहे. सीबीआयच्या तपासातून सत्य जगासमोर यावे, असे आम्हाला वाटते.’ एकूणच श्वेताने म्हटलेल्या या गोष्टीमधून ‘सत्य उजेडात येण्यासाठी सीबीआय तपास करू शकते’ असे तिने सुचवले आहे.
दरम्यान, सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक मुंबईमध्ये दाखल झाले आहे. त्यांनी सुशांतचा कुक नीरज आणि इतर काही संबंधित लोकांची चौकशीदेखील केली आहे. दरम्यान लवकरच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचीदेखील सीबीआयकडून चौकशी होणार असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. याच अनुषंगाने बॉलिवूडमधील इतरही काही मंडळींची चौकशी केली जाण्याचीदेखील शक्यता आहे.
रिया सुशांतवर जादूटोणा करून त्याला भूत प्रेत आणि आत्मा अशा गूढ गोष्टींमध्ये अडकवून ठेवत असल्याचंदेखील आरोप करण्यात येत आहे. तसेच रियाचे वडीलदेखील सुशांतला त्याची तब्येत बिघडल्यावर कसल्याश्या औषधाच्या गोळ्या नियमित देत असल्याचा खुलासादेखील सुशांतच्या एक मित्राने केला आहे. सीसीबीआयची चौकशी पूर्ण झाल्यावरच आता सुशांतच्या मृत्यूचे गूढ उलगडले जाणार आहे.