आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नात हजर होती ही अभिनेत्री, आता बॉलीवुडमध्ये आहे आघाडीची अभिनेत्री

आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नात हजर होती ही अभिनेत्री, आता बॉलीवुडमध्ये आहे आघाडीची अभिनेत्री
बॉलीवुडमध्ये नाती तुटणे आणि नवी नाती जुळणे हे काही नवे नाही. अनेक बॉलीवुडच्या जोड्या आपल्या पहिल्या नात्यातून बाहेर पडून पुन्हा नव्याने नव्या जोडीदारासोबत आयुष्य काढताना आपण पाहतो. असे करताना ते स्वतःला अपराधी मानत नाहीत तसेच कधी त्याबद्दल आकस मनात बाळगत नाहीत.
सारा अली खान हीचा आज वाढदिवस आहे. ही अशी अभिनेत्री आहे, जी आपल्या वडिलांच्या म्हणजे सैफ अली खानच्या दुसऱ्या लग्नात हजर होती. होय! ही एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिने आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तिला खुद्द सैफच्या पहिल्या बायकोने म्हणजे अमृता सिंहने त्यासाठी आवरून दिले होते. अमृता आणि सैफची पहिली मुलगी सारा अली खान हीचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ मध्ये झाला. काहीच वर्षात तिला दुसरा भाऊ देखील झाला.
याच दरम्यान सैफ आणि अमृता यांचे वाद वाढायला सुरवात झाली. सैफचे सतत घरी असणे, कमी काम मिळणे याचा अमृताला त्रास व्हायला लागला. सैफच्या आई आणि बहिणींचे सतत असणारे या दोघांच्या संसारातील लक्ष, अमृता हिला सहन झाले नाही. तिच्या बोलण्यातून अनेकदा सासू आणि नंदेचा अपमान सैफ सहन करू शकला नाही, आणि दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. त्यावेळी सारा फक्त ५-६ वर्षाची असेल!
या सगळ्याचा परिणाम तिच्यावर होऊ लागला. तिला ‘पीसीओडी’चा त्रास होऊ लागला आणि तिचे वजन वाढले. नंतर तिला शिकायला परदेशी पाठवण्यात आले, तिकडे तिला आई वडिलांची खूप आठवण येत असे. सैफ आणि अमृता वेगळे झाले तरी सारा तिच्या वडिलांच्या आणि करिनाच्या खूप क्लोज आहे. ती तैमुरला देखील तिचा सख्खा भाऊ मानून राहते. आणि त्याचे लाड देखील करते. तिने करीनाला आई नाही तर मैत्रीण म्हणून मनात जागा दिली आहे, असे ती एका मुलाखतीत बोलली होती.
साराने ‘केदारनाथ’ या मूव्ही पासून आपल्या करियरचा शुभारंभ केला, यात तिच्या आणि सुशांत सिंग राजपूत याच्या प्रेमाच्या खूप चर्चा झाल्या. मात्र, असे कळते की अमृता सिंगने तिला सुशांतच्या जास्त जवळ जाऊ दिले नाही. आज सारा हिने रणवीर सिंग, कार्तिक आर्यन यांसारख्या हिरोबरोबर कामे केली आहेत. कार्तिक आर्यन आणि ती एकेमकांना डेट करत आहेत अशा चर्चा आहेत.