आपली बॉडी पूर्ण पेंट करून शूट करणारी एकमेव अभिनेत्री! जाणून घ्या पूजा भट्टविषयी खास माहिती

आपली बॉडी पूर्ण पेंट करून शूट करणारी एकमेव अभिनेत्री! जाणून घ्या पूजा भट्टविषयी खास माहिती

आपली बॉडी पूर्ण पेंट करून शूट करणारी एकमेव अभिनेत्री! जाणून घ्या पूजा भट्टविषयी खास माहिती

वय 48, निर्माती, दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि खूप सारे वादातीत किस्से… हे वर्णन आहे पूजा भट्ट हीचं! ‘दिल है के मानता नहीं’ या चित्रपटातून तिने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिचे अभिनयात पाय घट्ट जसजसे होत होते तसतसे तिच्या भोवतालचे वादातीत किस्से संपत नव्हते.

तिचे अफेअर्स, तिचे बोल्ड अंदाज आणि त्यात महेश भट यांची मुलगी म्हणल्यावर तिच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतोच. महेश भट आणि पूजा यांचे स्टारडस्ट साठी केलेलं फोटोशूट खूप वादात सापडलं होतं. त्या कव्हर फोटोसाठी महेश आणि पुजाने एकमेकांना लीप किस केलं होतं.

यामुळे समाजातून त्यांना खूप रोष पत्करावा लागला होता. वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासला अशी विधानं लोकं करत होती. आदित्य रॉय कपूर आणि पूजा यांच्या सोबत राहण्याची चर्चा होती. नंतर त्यांनी एकमेकांना सोडून दिले. आपले मार्ग वेगळे केले. रणवीर शोरी सोबत तिने आपले लव्ह लाईफ सुरू केले. त्याच्याशी मार्ग वेगळे केल्यावर तिने मनीष मखिजा सोबत लग्न केले.

११ वर्षांच्या सुखी संसारानंतर तिने मनीष मखीजाला डिव्होर्स दिला. नंतर ती आपल्या दारूच्या सवयीत बुडून गेली. मुळात पूजा वयाच्या १६ व्या वर्षांपासून दारूचे व्यसन करत होती. वयाच्या २३ व्या वर्षी सिगारेट ओढली होती. एक काळ असा होता जेव्हा ती दारुशिवाय राहूच शकत नव्हती. व्यसनाधीन पूजाला त्यातून बाहेर पडायला देखील ट्रीटमेंट घ्यावी लागली होती. नंतर, गेल्या दोन वर्षात तिने दारू पूर्ण सोडून दिली आहे.

आपली बॉडी पूर्ण पेंट करून शूट करणारी ती एकमेव अभिनेत्री आहे. या शूट मुळे सुद्धा ती खूप चर्चेत आली होती. निर्वस्त्र होऊन तिने बॉडी पेंट केली आणि तिच्या चारित्र्यावर अनेकांनी शिंतोडे उडवले. आता इतके वर्ष प्रकाशझोतात नसताना ती, आता ‘सडक-2’ चित्रपटामधून कमबॅक करत आहे.

Being Marathi