शांत स्वभावाचे अमिताभ चक्क यश चोप्रांवर भडकले होते. कारण वाचून चकित व्हाल.

शांत स्वभावाचे अमिताभ चक्क यश चोप्रांवर भडकले होते. कारण वाचून चकित व्हाल.

शांत स्वभावाचे अमिताभ चक्क यश चोप्रांवर भडकले होते. कारण वाचून चकित व्हाल.

अमिताभ बच्चन हे त्यांच्या शांत स्वभावामुळे प्रसिध्द आहेत. आपले काम उत्तम करावे, आणि कोणालाही विनाकारण दुखवू नये अशी त्यांची सेट वरची आणि खाजगी आयुष्यात सुद्धा नियमावली आहे. त्यानुसारच ते वागतात. मात्र, सामान्य माणसाला प्रश्न पडतो की, कसे काय ते इतके शांत असू शकतात? माणूस कधीच चिडत नाही असे काय होत असेल? तर असं नाहीये. आज आपण पाहणार आहोत एक अशी बाजू जी फक्त यश चोप्रा यांनी पाहिली आहे. होय! अमिताभ चिडतात!

गोष्ट ३९ वर्षापूर्वीची आहे. ‘सिलसिला’ चित्रपटासाठी अमिताभ यांना विचारणा झाली. आता प्रश्न होता, अमिताभ सारख्या कलाकाराबरोबर कोण अभिनेत्री घ्याव्या? दोन अशा अभिनेत्री, ज्या त्यांना सूट होतील! स्मिता पाटील आणि परवीन बाबी! या दोन नावांचा विचार सुरू झाला. ही नावे फायनल झाली, मात्र अचानक असे काहीतरी झाले की या दोघींचा पत्ता कट होऊन जया भादुरी आणि रेखा यांची वर्णी लागली.

त्यामुळे स्मिता पाटील भडकल्या आणि खूप दिवस यश चोप्रा आणि स्मितामध्ये वाद सुरू राहिले. पिक्चरचे शूट सुरू झाले. आता जया, रेखा आणि अमिताभ बरोबर सिनेमा शूट होणार म्हणजे ब्रह्मदेव असेल तरी वाद थांबवू शकत नव्हता. व्हायचे तेच, सतत सेटवर वाद. धुसफूस! रेखा शुटवर आल्या की, सिनेमॅटोग्राफरला भेट द्यायच्या.त्याच्या कानात सांगायच्या, “मी आले की पहिला शॉट माझा लाव, टेक १ मध्ये शॉट मिळाला तर ठीक नाहीतर मी लगेच निघून जाईल.”

याने सतत तणावात राहून यश चोप्रा यांनीसुद्धा सेट वरचे लक्ष कमी केले. याने झाले असे, की उत्तम गाणी, मसालेदार केमिस्ट्री आणि तीन रियल लाईफ लव्ह ट्रँगल मिस्ट्री असलेले कलाकार असून, चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. यश चोप्रा यांनी लक्ष न दिल्याने आणि सेटवर शिस्त न ठेवल्याने असे झाले, असे अमिताभला वाटले. त्यांचे वाद झाले. तब्बल १९ वर्ष अमिताभने यश चोप्रा बरोबर काम केले नाही. नंतर ‘मोहब्बते’मध्ये ते शक्य झाले. अमिताभ कामाबद्दल अत्यंत शिस्तबद्ध आहेत. त्यांना वेळ जाऊन काम असे निकृष्ट झाले तर चीड येते आणि कशी ते यश चोप्रांनी पाहिले आहे.

Being Marathi

Related articles