भारतीय क्रिकेट टीमचा असा कॅप्टन जो एका मुलीच्या होकारांसाठी सलग चार वर्ष गुलाब पाठवत होता .

क्रिकेट आणि बॉलीवुड एक वेंगळच नातं आहे. अनेक अभिनेत्री आहेत ,ज्यांनी आतापर्यंत अनेक क्रिकेटर सोबत प्रेम केले आहे आणि नंतर विवाह देखील केला आहे. सध्या विराट आणि अनुष्का हे देखील प्रचंड चर्चेत आहेत. असेच एक कपल आहे त्यांच्या प्रेमाचे असे एक् से एक किस्से आहेत , जे अजून देखील आणखी चविने चर्चा केले जातात. एक कपल म्हणजे मसूर अली पतोडी खान आणि शर्मिला टागोर.

आज आपण त्यांचीच एक आगळी – वेगळी प्रेम कहाणी पाहणार आहोत. १ जुलै १९६१ ची गोष्ट आहे मसूर इंग्लंड रस्त्यावर कोठेतरी चालले होते अचानक त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि खिडकीच्या काचा फुटून अक्षरक्षा मसूर यांच्या डाव्या डोळयांत गेल्या. मसूर यांना अगदी तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले तेव्हा समजले की मसूर यांचा डावा डोळा निकामी झाला आहे . त्यांना त्या डोळ्यांनी आता पाहता येणार नाही.एक डोळा जारी निकामी झाला असला तरी मसूरची स्वप्न ही खूप मोठी होती . त्यामुळे त्यांच्या रस्त्यांमध्ये किती जरी अडचणी आल्या तरी त्याला काही एक फरक पडणार नव्हता कारण त्याला एका स्वप्नाने एका ध्येयाने पछाडले होते आणि त्याला ते पूर्णच करायचे होते.

त्या नंतर मसूर यांनी डिसेंबर १९६१ रोजी मसूर यांनी त्याच्या क्रिकेटच्या करियरला सुरवात केली. इंग्लंड विरुद्ध भारत अशी वन डे मॅच होती.त्या आधी मद्रासमध्ये एक सामना झाला होता तेव्हा मसूर यांनी १०३ रन्स केले होते. जेव्हा त्यांनी एवढी दमदार कामगिरी केली तेव्हा अगदी इंदिरा गांधी पासून ते अगदी पहिली बिकिणी घालणारी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यावर देखील मसूर यांनी छाप पाडली होती. त्या नंतर मसूर यांना एक उपमा मिळाली आणि तेच त्यांचे नाव बनले टाइगर पटौदी हे. मसूर हे एक नवाब परिवारातून पुढे आलेले व्यक्तिमहत्व आहे. ते अतिशय प्रसिद्ध होते
. त्यावेळेसे त्यांची १५० खोल्यांची हवेली होती तसेच भोपाळ आणि गुडगाव येथे देखील त्यांची भरपूर जमीन होती.

त्यांचे पूर्वज नवाब असल्यामुळे त्यांच्याकडे ही सर्व शेती होती. मसूर यांचे वडील देखील इफ्तिखार अली खान हे क्रिकेटर होते. ते इंग्लंड तर्फे खेळत असतं. मसूर जेव्हा ११ वर्षांचे होते तेव्हा पोलो खेळताना त्याच्या वडिलांना मरण आले. तेव्हा तारीख होती ५ जावेवारी. मसूर यांचा त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता. मसूर २१ वर्षाचे असताना ते टीमचे कॅप्टन झाले. त्यांनी 4६ मॅच खेळल्या त्यातील जवळपास ४० मॅच च्या वेळेस ते कॅप्टन होते. त्यातील ९ मॅच ते जिंकले १९ मॅच हारले आणि १९ मॅच ड्रॉ राहिल्या. भारताबाहेर पहिली मॅच जिंकण्याचे क्रेडिट हे देखील मसूर यांनाच जाते. १९६८ न्यूजीलैंड विरुद्ध ही मॅच होती. १९६१ ते १९७५ साठी टीम इंडियासाठी ते खेळले त्यांनी २७९० रन्स त्यांनी बनविले. ते फक्त क्रिकेटमध्येच नव्हे तर इतर अनेक खेळामध्ये देखील ते खूप एक्स्पर्ट होते. हॉकी , बॅटमिंटन , रैकेट, सॉकर त्यांच्या वडिलांप्रमाणे पोलो खेळण्याचा देखील त्यांना शॉक होता.
आयपील च्या गवर्निंग काउंसिलवर देखील मसूर अली खान बऱ्याच दिवस होते. BCCI ने त्यांचे मानधन दिले नाही असा देखील आरोप मसूर यांनी केला होता. २०१० साली ते आयपीएल पासून दूर झाले. त्यांना राजकारणात देखील खूप रस होता १९९१ झाली कॉंग्रेसच्या तिकीटांवर ते निवडणूक लढले पण त्यांना ती निवडणूक जिंकता आले नाही. १९६७ साली आलेला सिनेमा ‘एन इवनिंग इन पेरिस’ हा खूपच चर्चेत होता. या सिनेमाने सिनेमा जगतात एकच खळबळ माजविली होती कारण या चित्रपटातील अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये चक्क बिकिणी घालून काही शॉटस दिले होते. त्यामुळे हा चित्रपट प्रचंड चर्चिला गेला. ही अभिनेत्री होती शर्मिला टागोर. टायगर आणि शर्मिला यांची ओळख काही ओळखीच्या मित्रांतून झाली होती.
शर्मिला ह्या मूळच्या बंगालच्या आणि बंगाली होत्या तर टायगर हे एक क्रिकेटर आणि नवाब होते. दोघांचे घराने हे दोन टोकांचे पण त्यांना जोडणारा एक महत्वाचा धागा म्हणजे प्रेम. ते त्यांनी जोडले गेले. नवाब मसूर अली खान यांना बॉलीवुडमधील सर्वात बोल्ड बिनधास्त आणि सुंदर अभिनेत्री शर्मिला आवडली होती मग काय तिला इम्प्रेस करण्यासाठी नवाब एक से एक आइडिया लढवू लागले. त्यांनी शर्मिला यांना एक सर्वात प्रथम गिफ्ट म्हणून एक फ्रीज पाठविला विचार करा त्या काळात फ्रीज ही किती वेगळी आणि महागडी गोष्ट होती. ही गोष्ट त्यांची मुलगी सोहा अली खान हिने एका मुलाखतीत संगितली. ती म्हणते अब्बा अम्मीला खुश करण्यासाठी एक नव्हे तर तब्बल ७ फ्रीज पाठविले होते.
पण शर्मिला यांना ते गिफ्ट काही आवडले नाही. शर्मिला काही केल्या मसूर यांना भेटण्यासाठी तयार होईना मग काय मसूर यांनी एक नवीन शक्कल लढविली त्यांनी शर्मिला यांना गुलाब पाठविण्यास सुरवात केली. ते शर्मिलाल रोज गुलांबाची फुले पाठवित एक नव्हे दोन दिवस नव्हे एक महिना किवा वर्ष नव्हे तब्बल चार वर्ष मसूर शर्मिलाला फुले पाठवित. शेवटी शर्मिला यांनी मसूर यांच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि अशा प्रकारे टायगर यांना त्यांची वाघीन मिळाली. शर्मिला एक बंगाली असून देखील त्यांनी मसूर यांच्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला.
दोन्ही परिवारांनी या प्रेम विवाहाला खूप विरोध केला पण शेवटी १९६७ साले सर्व तयार झाले. २७ डिसेंबर १९६९ रोजी दोघांनी विवाह केला. शर्मिला यांचे नाव बदलून आयशा ठेवण्यात आले पण शर्मिला अजून देखील त्यांच्या मूळ नावाने ओळखल्या जातात. या दोघांच्या विवाहास इंदिरा गांधी पासून ते अगदी बॉलीवुड मधील सर्व दिग्गज मंडळी उपस्थित होते. शर्मिला आणि मसूर यांनी ३ मुले आहेत. सैफ अली, सोहा अली आणि सबा अली खान. सोहा आणि सैफ हे दोन्ही देखील चित्रपटात काम करतात तर सबा हिचा सोन्या चांदीचा व्यवसाय आहे. सैफ याने देखील वाडिलांप्रमानेच हिंदू मुलीशी विवाह केला त्या नंतर दूसरा विवाह देखील केला. मसूर यांच्या विषयी हे देखील संगितले जाते की जेव्हा – जेव्हा शर्मिला क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी स्टेडीयमवर येतं तेव्हा – तेव्हा मसूर शर्मिला ज्या बाजूला बसल्या आहेत त्या बाजूस छक्का मारत आणि त्यांना खुश करत.