‘हे’ आहे अनुष्का आणि विराट कोहलीच्या मुलीचे नाव जाणून घ्या त्याचा अर्थ!

अनुष्का शर्मा ही बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहली जगप्रसिद्ध क्रिकेटर आहे. या दोघांचे लग्न आणि त्यानंतर त्यांना झालेले मूल हे देखील भारतातच नव्हे तर पूर्ण जगात चर्चेचा विषय ठरले.
11 जानेवारी रोजी त्यांनी एका मुलीला जन्म दिला, आणि त्यानंतर मिडीया प्लॅटफॉर्मवर तिचा चेहरा कधी बघायला मिळतो अशी उत्सुकता प्रत्येकाला लागली होती. अनेक लोकांनी फेक फोटो किंवा फेक व्हिडिओ टाकून ही त्यांची मुलगी आहे असे सांगितले. मात्र अनुष्का आणि विराट मीडियापासून आपल्या मुलीला दूर ठेवण्यावर ठाम आहेत.
आपल्या यशाचा किंवा आपल्या पैशाचा तिच्यावर दुष्परिणाम न होता ती इतर मुलांप्रमाणेच सामान्य आयुष्य जगायला प्रवृत्त व्हावे आणि आई-वडिलांच्या कुठल्याही गोष्टीचा तिच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय जरी कौतुकास्पद असला तरी देखील, त्यांच्या चाहत्यांना मात्र त्यांच्या मुलीचे फोटो पाहण्याची उत्सुकता आहे. त्यांनी मीडियाला देखील एक पत्र लिहून असे सांगितले आहे की, तुम्हाला हवं ते कन्टेन्ट आम्ही देऊ.
मात्र आमची मुलीची त्यामध्ये कुठेच दिसणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायला हवी. अनुष्का शर्मा सोबतचा एक फोटो टाकला. ज्या मध्ये विराट कोहली देखील दिसत आहे. तिचे नाव ‘वामिका’ असे नाव ठेवत, अनुष्काने पुन्हा एकदा तिची देवावरची श्रद्धा आणि अर्थपूर्ण गोष्टींचा असलेला दोघांना ध्यास याची पावती दिली आहे.
वामिका या शब्दाचा अर्थ शंकराच्या वामांगी बसते ती पार्वती किंवा मा दुर्गा असा होतो. त्यामुळे या नावाचा देखील अर्थ आणि त्यांनी घेतलेला निर्णय या चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.