‘या’ कारणामुळे डुबले विवेक ओबेरॉय चे करियर….!

‘या’ कारणामुळे डुबले विवेक ओबेरॉय चे करियर….!

बॉलीवुड ची दुनिया ही अगदी रंगीत आणि क्षणाक्षणाला बदलणारी आहे. तुमचे प्रसिद्धी टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला काही लोकांशी जवळीक साधावी लागते. तर काही लोकांपासून अगदी लांब राहावे लागते. आज आपण जाणून घेऊयात विवेक ओबेरॉय सारख्या गुणी अभिनेत्याचे करियर का डुबले त्यामागचे कारण!

2002 मध्ये कंपनी या चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे विवेक ओबेरॉय! याचे वडील देखील उत्तम अभिनेता होते. आता मात्र ते जास्त काम करत नाहीत. विवेकने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर चॉकलेट बॉय सारखी त्याची प्रतिमा पुढे येईल असे वाटत असतानाच, त्याच्या आयुष्यात असा टर्न आला ज्याने ज्याने त्याच्या आयुष्याची आणि करिअरची गाडी उताराला लावली.

1999 मध्ये आलेला चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ यामध्ये 1994 साली विश्वसुंदरी झालेली ऐश्वर्या राय झळकली. तिच्यासोबत दिसला सलमान खान. विश्वसुंदरी आणि त्यात बुद्धिमत्तेची अनोखी देणगी लाभलेली स्त्री कोणाला आवडणार नाही?

सलमानला तिच्या सौंदर्याची भुरळ पडली, आणि तो ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा झाला. त्याचा एककेंद्री स्वभाव आणि जीवघेणे प्रेम यांनी ऐश्वर्याला बंदिस्त झाल्यासारखे वाटू लागले. तिच्या करिअरची गाडी एकीकडे उंच शिखरे गाठत होती. तर सलमान मुळे तिच्यासोबत काम करताना अनेकांना घाबरायला व्हायचे.

जसा जसा वेळ जात होता तसं तसं सलमान तिच्या बाबतीत पजेसिव वागायला लागला. तिच्या फिल्म सेटवर जाऊन धिंगाणा करणे, तिला ताब्यात ठेवल्यासारखे वागवणे, यामुळे ती वैतागून गेली आणि तिने हे नाते तोडायचे ठरवले.

हे ब्रेकअप सलमानला जड जात होते. ह्याआधी त्याच्या आयुष्यात आलेल्या अनेक स्त्रिया होत्या. मात्र, ऐश्‍वर्याच्या बाबतीत तो खरच प्रेमात होता. ऐश्वर्याला देखील या नात्याने त्रास होत होता. मात्र नाते तोडल्यानंतर देखील ती फार खुश नव्हती त्यातच विवेक ओबेरॉय आणि तिची ओळख झाली. एका चित्रपटादरम्यान ते दोघे जवळ येऊ लागले. दुखावलेली ऐश्वर्या विवेक मध्ये आपला मित्र शोधत होती.

विवेक ला ऐश्वर्या आवडली आणि तो तिच्या प्रेमात पडला. या प्रेमाच्या भरातच त्याने एक अशी गोष्ट केली जी, त्याच्या करिअरला सूट झाली नाही. ऐश्वर्याला होणारा त्रास बघुन त्याने एका हॉटेल रूम मध्ये प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि त्याला आलेल्या सलमान खानच्या 46 कॉल वरून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे त्याने सांगितले.

या एका गोष्टीने सलमानच्या डोके फिरले आणि विवेक कडे असणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर लोक काढून घेऊ लागले. हा सगळा प्रकार झाल्यानंतर ऐश्वर्याने हळूच काढता पाय घेतला आणि तिने परत विवेक कडे कधीच वळून पाहिले नाही.

विवेक कडे असणारे चित्रपट गेले. त्यानंतर त्याने माफी मागूनही सलमान परत त्याच्याशी कधीच बोलला नाही. केवळ सलमानच्या भीतीने विवेकचे करियर रसातळाला लागले. त्याच्याकडे येणाऱ्या चित्रपटांना वेगळी वाट दाखवली गेली आणि आजही असे बोलले जाते की, सलमान मुळे विवेक ओबेरॉय बॉलीवूड मधून ‘ना के बराबर’ असा अभिनेता झाला!

Being Marathi

Related articles