देवाला जे मंजूर असेल ते होईल… असे का म्हणाली बिपाशा बासू? काय आहे या हतबल होण्यामागे कारण? जाणून घ्या

देवाला जे मंजूर असेल ते होईल… असे का म्हणाली बिपाशा बासू? काय आहे या हतबल होण्यामागे कारण? जाणून घ्या

देवाला जे मंजूर असेल ते होईल… असे का म्हणाली बिपाशा बासू? काय आहे या हतबल होण्यामागे कारण? जाणून घ्या

बिपाशा बासू म्हणजे बॉलीवुडमध्ये बोल्ड सीन्स, एखादी मर्यादा ओलांडून काम करणारी अभिनेत्री म्हणून जास्त तिचे नाव आहे. आपल्या अनोख्या अंदाजाने ती चर्चेत राहिली. चित्रपटात अभिनय कमी आणि अंगप्रदर्शन, सेंसेशनल सीन्स जास्त अशा प्रकारात तिने आपले करियर केले.

जॉन इब्राहिम सोबतचे नाते. तेही उघडपणे दोघांनी व्यक्त केलेल्या भावना. चित्रपटातसुद्धा अनेकदा या दोघांना त्यांच्या याच नात्यामुळे स्थान मिळाले आहे. आणि याच प्रकारे त्यांच्याकडून काम करून घेतले गेले की, प्रेक्षकांना काही मसाला पाहायला मिळेल. बरेच वर्ष त्यांचे नाते अस्तित्वात होते. मात्र, असे काही झाले की त्यांनी या जुन्या नात्याला संपुष्टात आणले. बिपाशा एकदम तुटली होती. तिने त्या नात्यात स्वतःला वाहवत नेले होते. याच कारणाने तिने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. आणि अचानक हे नाते संपल्याने ती एकटी पडली.

मग तिच्या आयुष्यात आला टिव्ही स्टार करण सिंग ग्रोव्हर. जो आपल्या आधीच्या २ तुटलेल्या लग्नाने प्रसिद्ध होता. त्याची दुसरी बायको म्हणजे जेनिफर विंगेट. तिला अचानक सोडून, त्याने बिपाशाची वाट धरली. त्यांनी एक चित्रपट सोबत केला आणि बिपाशाच्या जादूने त्याने आपला संसार मोडला. त्याच्या आई वडिलांना देखील त्याचे असे जेनिफर ला सोडणे पसंत नव्हते. त्यांनी बिपाशाला सुद्धा स्वीकारले नाही.

म्हणूनच करण सध्या बिपाशाच्या घरी घरजावई म्हणून राहतो. दोघांच्या लग्नाला ५ वर्ष झाली आहेत. आत्ता झालेल्या एका मुलाखतीत दोघे एका वेबसिरीजच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत. जिचे नाव ‘डेंजरस’ आहे. बिपाशाला फॅमिली प्लॅनिंगबद्दल प्रश्न विचारला गेला. ४५ वर्षीय बिपाशा हिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

“मुल व्हावं हे प्रत्येकाला वाटतं. आम्हाला पण वाटतं. आम्ही प्लॅनिंग करत आहोत. मात्र, देवाच्या मनात जे असेल, ते आयुष्यात होत असतं. त्यामुळे, त्याच्या मनात येईल तेव्हा होईल, नाही झालं तरी काही अडचण नाही”, तिच्या या वक्तव्याने तिच्या वयामुळे आणि शारीरिक अडचणीमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीने असे हतबलता पूर्ण विधान केले का? अशा चर्चा सुरू आहेत.

Being Marathi

Related articles