बिग बॉस फेम आस्ताद काळे या अभिनेत्रीवर करायचा जीवापाड प्रेम; परंतु झाले असे काही ही की गमावला त्या अभिनेत्रीने जीव!

बिग बॉस फेम आस्ताद काळे या अभिनेत्रीवर करायचा जीवापाड प्रेम; परंतु झाले असे काही ही की गमावला त्या अभिनेत्रीने जीव!

बिग बॉस मध्ये मराठी कलाकारांनी चांगला कल्ला केला. बिग बॉस मराठी चा पहिला सिझन तर बराच गाजला यामधून मेघा धाडे ही जिंकून बाहेर आली. मात्र चर्चा झाली ती आस्ताद काळे च्या प्रेमाविषयी! आस्ताद, स्वप्नाली पाटील या अभिनेत्री वर प्रेम करतो हे त्या वेळीच लक्षात आले. मात्र स्वप्नाली त्याच्या आयुष्यात येण्याआधी एक अभिनेत्री त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली होती. तिच्यावर त्याचे जीवापाड प्रेम देखिल होते.

मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि आस्तादला तिला गमवावे लागले. गमवावे लागले म्हणजे दोघांचे ब्रेकअप झाले असे नाही प्राची मते असे अभिनेत्रीचे नाव होते अग्निहोत्र मालिकेमध्ये या दोघांची जोडी लोकांनी डोक्यावर घेतली होती. त्या दोघांचे अफेअर प्रत्येकालाच माहीत होते. ते दोघे जण लिव्ह इन मध्ये होते, हे त्याने बिग बॉस मध्ये मान्य केले.

प्राची मते हिने वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी जीव गमावला तिला बोन मॅरो कॅन्सर होता. अगदी शेवटच्या टप्प्यात हा आजार लक्षात आल्याने, तिचे आई-वडील किंवा आस्ताद सुद्धा काहीच करू शकला नाही. त्याच्या डोळ्यासमोर तिचा जीव जाताना पाहून तो पूर्ण तुटून गेला होता. तिच्यासोबत संसाराच्या आणाभाका घेतल्या होत्या. लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा होती. घरी देखील दोघांबद्दल माहित होते. मात्र आयुष्याने असे वळण घेतले आस्ताद पुन्हा प्रेमात पडणारच नाही अशा भावनेतून वागत होता.

मात्र स्वप्नाली त्याच्या आयुष्यात आली आणि तिने त्याला सावरले. आता स्वप्नाली पाटील आणि आस्ताद काळे दोघेजण लवकरच लग्न करणार आहेत!

Being Marathi

Related articles