धर्मेंद्र ची मुले म्हणून सनी आणि बॉबी ची ओळख जेवढी बॉलिवूडमध्ये आहे, तेवढीच त्यांच्या कामामुळे आहे. अर्थात धर्मेंद्र आणि हेमामालिनी एवढी प्रसिद्धी सनी देओल, बॉबी, इशा यांना मिळाली नाही.

धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी त्यांचा काळ गाजवला होता मात्र धर्मेंद्र च्या पहिल्या पत्नीपासून झालेली दोन मुले म्हणजे सनी आणि बॉबी दोघेही तेवढे नाव कमावू शकले नाहीत तर हेमा मालिनीची मुलगी ईशा देखील अभिनयक्षेत्रात आली मात्र, तिलाही हवा तसा प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला नाही.

सनी देओल च्या आयुष्यात सुरुवातीच्या काळात अनेक चांगली कामे आली. गदर नंतरसुद्धा त्याची लोकप्रियता खूप वाढली. बॉबी देओल आता आश्रम या वेबसिरिज पासुन प्रचंड चर्चेत आहे.

याच वेबसिरिज च्या दरम्यान एकदा इंटरव्यू मध्ये हे बॉबीने लहानपणी त्याला बहन जी हाक मारली जायची असे सांगितले. याचे कारण असे की, लहानपणी त्याचा आवाज अगदी नाजूक होता. मग, फोन केल्यानंतर फोन वरूनही आवाज त्याचा बायकां सारखा यायचा.

घरी जेव्हा फोन यायचे तेव्हा लहानसा बॉबी जाऊन उचलायचा. समोरच्याला एखादी स्त्री बोलत आहे, असे वाटायचे. या आवाजाचा गैरफायदा घेत त्याने अनेकदा ट्रीप वर असताना हॉटेल रूममधून इतर रूम मध्ये किंवा रिसेप्शनवर बाईच्या आवाजात फोन केल्याचे गमतीशीर किस्से देखील त्याने सांगितले.