मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटासाठी पहिली निवड होता शाहरुख खान; या कारणामुळे सोडावा लागला चित्रपट!

मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटासाठी पहिली निवड होता शाहरुख खान; या कारणामुळे सोडावा लागला चित्रपट!

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान हा त्याच्या वेगळ्या चित्रपटाच्या निवडीसाठी ओळखला जातो. तो जरी रोमँटिक भूमिका करत असेल तरी देखील, प्रत्येक चित्रपटात आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडण्याची ताकद त्याच्यात आहे. करियर करत असताना अनेकदा असे प्रसंग येतात जिथे आपल्याला आवडलेले काम आपल्याला काही कारणाने सोडावे लागते.

शाहरुख खान आणि मुन्नाभाई चित्रपटाचा काय आहे संबंध हे जरा आपण जाणून घेऊया! राजकुमार हिरानी यांनी ही स्क्रिप्ट लिहील्यानंतरच शाहरुखच मुन्नाभाई होणार हे ठरवून टाकले होते.

शाहरूखला सुद्धा स्क्रिप्ट वाचल्यानंतर हा रोल खूप आवडला आणि त्याने देखील यामध्ये रस घ्यायला सुरुवात केली. शाहरुख खान असा अभिनेता आहे, जो काम करताना प्रत्येक विभागात काय काय सुधारणा होऊ शकतात आणि आपण अजून कसे चांगले दिसू शकतो, किंवा चांगल्या पद्धतीने कथा मांडू शकतो, यासाठी नेहमी काम करत असतो.

स्क्रिप्ट विषयी सुद्धा आपले विचार तो हिरानी यांना वेळोवेळी सांगत होता. तो त्या काळी देवदासचे शूटिंग करत होता. ही शूटिंग संपले की, आपण मुन्नाभाई वर काम सुरू करू असे त्याच्या डोक्यात होते. त्याच्या सांगण्यावरूनच स्क्रिप्टमध्ये मोठे बदल करण्यात आले. आज आपण जो मुन्नाभाई चित्रपट बघतो ती कथा शाहरुखच्या दिलेल्या इनपुट मुळे वेगळी जाणवते.

राजकुमार हिरानी यांना विधू विनोद चोप्रा यांनी चित्रपट करण्यास पैसे द्यायचे ठरवले. आता पैसे विधू विनोद चोप्रा लावणार म्हणल्यावर त्यांना त्यांच्या पद्धतीने काम हवं असणार. विधू विनोद चोप्रा हे त्यांच्या परफेक्शन साठी आणि स्वतःला हवे तसेच काम करून घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

शाहरुख सुद्धा स्वतःच्या अटींवर काम करणारा कलाकार आहे. दोघांमुळे सेटवर काही धिंगाणा नको. आणि एका म्यानेत दोन तलवारी राहू शकत नाहीत, हे ओळखून शाहरुखने स्वतः या चित्रपटातून काढता पाय घेतला.

या चित्रपटामध्ये संजय दत्त हा जहीरची भूमिका करणार होता. ही भूमिका नंतर शर्मन जोशी याने केली. मुन्नाभाई साठी नंतर विवेक ओबेरॉय ला सुद्धा विचारणा करण्यात आली होती, आणि ऐश्वर्या रायला या चित्रपटात हिरॉईन म्हणून घेण्याचा विचार सुरू होता. मात्र शाहरुखने काढता पाय घेतला की, ऐश्वर्याने देखील विवेक सोबत काम करायला नकार दिला. आपसूकच ही स्क्रिप्ट संजय दत्त याला मिळाली.

Being Marathi

Related articles