‘या’ हॉट आणि सुंदर अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये वाईट प्रसंग आल्यामुळे थेट साऊथच्या चित्रपट ठेवले पाऊल… बघा कोण आहे ती अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीला खूप समृद्ध असा वारसा आहे व या चित्रपटातील कथानक ब-याच हिंदी चित्रपट सृष्टीतील निर्माता दिग्दर्शकांना भावल्यामुळे या चित्रपटांचे रिमेक सुद्धा बनवले जातात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नेपोटिझम चालत नाही व ज्या व्यक्तीमध्ये गुणवत्ता आहे त्या व्यक्तीला आपल्या अभिनयाला दाखवण्याची समान संधी मिळते.
याउलट बॉलिवूडमध्ये फिल्मी पार्श्वभूमी असेल तर नवोदित असाल तरी अगदी सहजपणे बॉलीवूडच्या बिग बँनरची दारे त्यांच्यासाठी उघडली जातात व तेसुद्धा रेड कार्पेट घालून. याउलट ज्या अभिनेत्यांना किंवा अभिनेत्रींना कोणत्याही प्रकारचे फिल्मी बॅकग्राऊंड असते त्यांना निर्माते आणि दिग्दर्शकांच्या सर्व प्रकारच्या मागण्या झेलाव्या लागतात मात्र या उपरही चांगल्या संधी मिळेलच याची खात्री नसते.

दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक प्रसिद्ध स्टार बॉलीवुड कडे वळल्याचे दिसून येते मात्र नुकतेच काही दिवसांपूर्वी बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री बॉलिवुडमध्ये आपल्याला कुणीही गॉडफादर नाही म्हणून भूमिका मिळत नाही या कारणास्तव तेलगू इंडस्ट्रीतील चित्रपटांकडे वळली आहे व आपले लक्ष ती यापुढे दाक्षिणात्य चित्रपटांवर देणार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला आहे.सुरुवातीला उर्वशीला काही भूमिका दिल्या गेल्या मात्र नंतर कुणीही गॉडफादर नसल्यामुळे तिला जणू काही चांगल्या संधी पासून डावलले गेले.याउलट तिच्या आगामी काळामध्ये येऊ घातलेल्या दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक संपत नंदी यांनी निर्माण केलेल्या चित्रपटामध्ये उर्वशी ची अतिशय रोमांचक व अभिनव अशी भूमिका आहे व यासाठी ही खूपच उत्साही दिसून येते.या अगोदर कन्नड चित्रपटांमध्ये तिने भूमिका केली असून काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या व्हर्जिन भानुप्रिया या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.