शक्तिमान मालिकेतील ‘गीता विश्वास’ सध्या करते ‘हे’ काम, लूक पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!

शक्तिमान मालिकेतील ‘गीता विश्वास’ सध्या करते ‘हे’ काम, लूक पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका शक्तिमान आज सुद्धा सर्वांच्या स्मरणात आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. या मालिकेमध्ये गंगाधर ज्या मुलीच्या मागे देवी जी म्हणत मागे पुढे फिरत असतो ती मुलगी म्हणजे गीता विश्वास आणि हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजे वैष्णवी महंत होय.

ही गीता विश्वास सध्या काय करते याची उत्सुकता सध्या सगळ्यांनाच आहे. शक्तिमान ची प्रेमिका गीता विश्वास ची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैष्णवीला या मालिकेने खूप लोकप्रिय केले. या मालिकेनंतर लोक वैष्णवी महंतला गीता या नावाने ओळखू लागले. 1988 साली वैष्णवीने वीराना या चित्रपटांमध्ये काम केले होते मात्र तिला खरी ओळख ही शक्तिमान या मालिकेने मिळवून दिली.

1998 ते 2005 या काळामध्ये शक्तिमान या मालिकेच्या स्पर्धेमध्ये अन्य कोणतीही मालिका उभी राहू शकत नव्हती. मात्र 2005 साली जेव्हा शक्तिमान मालिका बंद पडली तेव्हा वैष्णवीने आपल्या अभिनयासाठी काही अन्य पर्याय शोधले.शक्तिमान या मालिकेनंतरही वैष्णवीने अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले व तिचे काही मालिका ह्या चांगल्याच लोकप्रियही झाल्या.

मिले जब हम तुम’ और ‘सपने सुहाने लड़कपन के या त्या  मालिका होत. मात्र या सर्व मालिकांमधून तिला म्हणावे तशी लोकप्रियता व यश मिळत नव्हते. म्हणून तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीकडे आपला मोर्चा वळवला.

वैष्णवी ने  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले .सध्या वैष्णवी तशन ए इश्क या मालिकेमध्ये काम करत आहे या मालिकेमध्ये तिचा रोल हा सहाय्यक भूमिका आहे.

beingmarathi

Related articles