लग्नाआधीच प्रेग्नंट होती श्रीदेवी? संधी देणाऱ्या दिग्दर्शकाशीच केले लग्न!

लग्नाआधीच प्रेग्नंट होती श्रीदेवी? संधी देणाऱ्या दिग्दर्शकाशीच केले लग्न!

लग्नाआधीच प्रेग्नंट होती श्रीदेवी? संधी देणाऱ्या दिग्दर्शकाशीच केले लग्न!

हवाहवाई, मिस्टर इंडियाची गर्लफ्रेंड, चालबाज अभिनेत्री श्रीदेवी ही आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने आजही अनेकांची लाडकी आहे. तिच्या डोळ्यातील खट्याळपणा प्रेक्षकांना तिच्याकडे आकर्षित करत असे. सावळे रूप आणि त्यावर बोलके डोळे याने श्रीदेवी अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाली. तिचा अभिनय आणि तिचे आयुष्य यामुळे ती कायम चर्चेत राहिली.

केवळ प्रेक्षकच नाही, तर अगदी सहकलाकारही तिच्या रूपाचे दिवाने होते. प्रत्येकाला तिला प्रपोज करावे असे वाटायचे. श्रीदेवी इतकी मन लावून काम करे, की एखादा लव्ह सिन देताना समोरच्याला ही खरंच आपल्यावर प्रेम करते असे गैरसमज व्हायचे. आणि यातूनच अनेक रुमर्स निर्माण व्हायचे. मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांच्या प्रेमाच्या किस्स्या‌ने तर मॅगझिन पटापट विकले जायचे. मिथुन आणि श्रीदेवी यांनी लग्न केल्याचे देखील अनेकदा बोलले गेले. मात्र, मिथुन यांची पत्नी गीता बाली यांनी कायम या नात्याचा विरोध केला आणि मिथुन यांनी श्रीदेवी हिला धोका देऊन घरची वाट धरली.

श्रीदेवी एकटी पडली आणि त्यातून तिला मिळणारे काम यावर त्याचा परिणाम होऊ लागला. तो होऊ नये म्हणून ती जोमाने पुन्हा कामाला लागली आणि नावारूपाला आली. २ जून १९९६ मध्ये ‘बोनी कपूर बरोबर श्रीदेवी विवाहबद्ध!’ ही हेडलाइन् धडकली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. श्रीदेवी बोनी यांच्यापासून गरोदर होती आणि म्हणून दोघांनी लग्न केले अशा बातम्या येऊ लागल्या.

दोघांनी त्याला विरोध केला नाही. बोनी कपूर विवाहित होते. अर्जुन आणि अंशुला या मुलांचे पिता होते. श्रीदेवीने हा निर्णय का घेतला? हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला. त्याचे उत्तर स्वतः बोनी कपूरने दिले. ” मी श्रीदेवीसाठी वेडा होतो. तिला पडद्यावर पाहून मी तिच्या कामामुळे आणि तिच्या सौंदर्याने वेडा झालो होतो. तिच्या मागे मी स्वित्झरलँडला गेलो, ती चांदनीचे शूट करत होती. १२ वर्ष तिच्यासोबत काम करण्यासाठी मी वाट पाहिली, आणि मिस्टर इंडियामध्ये तिला कास्ट केले.”

असे म्हणतात अनिल कपूर बोनी कपूरवर नाराज होते. बोनी कपूर यांनी श्रीदेवीला ११ लाख रुपये मानधन दिले आणि मिस्टर इंडिया करायला लावला. जेव्हा की, त्या काळी इतके पैसे कोणीही देत नसायचे. १० लाख ठरवून १ लाख जास्त दिले म्हणून अनिल यांनी बोनी कपूर बरोबर वाद घातले होते. बोनी कपूर यांनी आपली पत्नी मोना कपूर यांना सोडले, त्यावेळी मोना कपूर यांनी धीर सोडला होता. श्रीदेवीसाठी आपली साथ सोडली याचा त्यांना खूप धक्का बसला. २०१२ मध्ये कॅन्सरने त्यांचे निधन झाले आणि श्रीदेवी या देखील वर्षभरापूर्वी जग सोडून गेल्या. आता बोनी आपल्या ४ मुलांसमवेत आयुष्य व्यतीत करत आहेत.

Being Marathi

Related articles