…अन म्हणून हृतिकला स्वतःला र डण्यापासून आवरता आले नाही ! तुम्हीदेखील कारण वाचून हैराण व्हाल

…अन म्हणून हृतिकला स्वतःला र डण्यापासून आवरता आले नाही ! तुम्हीदेखील कारण वाचून हैराण व्हाल

हृतिक रोशन हा बॉलीवुडमध्ये आपल्या डान्समुळे प्रसिद्ध आहे. त्याची बॉडी, फिटनेस यामुळे तो दोन मुलांचा बाबा आहे हे देखील खोटे वाटते. त्याची चर्चा विविध कारणांमुळे होत असते. यात पाहिले कारण म्हणजे त्याच्यावर या गोष्टीने टीकेचा भडिमार होतो की, तो फक्त त्याच्या वडिलांच्या चित्रपटात काम करतो.

दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे आणि त्याच्या बायकोचे बिघडलेले नाते. ज्यामुळे त्यांनी डिव्होर्स देखील घेतला आणि आता दोघे वेगळे झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये तरीदेखील मुलांसोबत वेळ घालवता यावा म्हणून दोघे एकत्र राहिले आणि सूझेन त्याच्या घरी शिफ्ट झाली.

तिसरी गोष्ट म्हणजे त्याचे आणि कंगणाचे चव्हाट्यावर आलेले नाते. ज्यावर तिने खूप गाजावाजा केला आणि हृतिकसुद्धा शांतपणे बाजू मांडून बाजूला झाला. मात्र, आज तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. आणि ही चर्चा आहे, त्याच्या अचानक रडण्याची! तेही ढसाढसा! होय, तुम्ही बरोबर वाचलं आहे. हृतिक रडला आणि तेही प्रचंड! त्याने स्वतः ही गोष्ट सोशल मीडियावर मान्य केली.

असे करण्यामागे काय कारण असावं? असा विचार करत बसू नका, त्याचे उत्तर असे आहे की, हृतिक ला दुःख वगैरे नाही झालंय. तर, त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला गुंजन सक्सेना हा जान्हवी आणि पंकज त्रिपाठी यांचा मूव्ही पाहिला.

त्याला यात त्या दोघांची ऍक्टिंग इतकी आवडली, की त्यातील काही सीन्स पाहून त्याचे डोळे भरून आले, कधी तो खळखळून हसला आणि अनेकदा ढसाढसा रडला! हे बोलताना त्याने पूर्ण टीमचे खूप कौतुक केले. त्यांच्या कामाची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे असंही तो म्हणाला.

Being Marathi

Related articles