का मारली गौहर खानला एका माणसाने झापड? काय होती तिची यावर रिअक्शन जाणून घ्या

का मारली गौहर खानला एका माणसाने झापड? काय होती तिची यावर रिअक्शन जाणून घ्या

का मारली गौहर खानला एका माणसाने झापड? काय होती तिची यावर रिअक्शन जाणून घ्या

गौहर खान हे नाव बिग बॉस मधून जास्त लोकांपर्यंत पोहोचले. तिचे नखरे, तिचे तोकडे कपडे, मजा-मस्ती, रुल्स न पाळणे, कुशल टंडन बरोबरची तिची अति जवळीक याने ती प्रेक्षकांच्या डोळ्यात भरू लागली. बिग बॉस हा शोच असा आहे ज्यात तुम्ही मसालेदार कृत्य केली तर तुम्ही लोकांच्या नजरेत भरता आणि लोक तुम्हाला मत देऊन जिंकून देतात. बिग बॉसच्या ७ व्या सिजनची ती विजेती आहे. सलमान खान बरोबर देखील तिची अनेकदा ‘तू तू मैं मैं’ झाली पण तिला लोकांनी निवडून दिले आणि ती जिंकली.

पण तिचे करियर हे बिग बॉसपासून सुरु झाले असे नाही. ती एक यशस्वी मॉडेल आहे. तिचे सौंदर्य आणि बोल्ड अंदाजाने ती या क्षेत्रात नावाजली गेली. १८ व्या वर्षी मिस इंडियासाठी तिने प्रयत्न केला. जिथे ती ४ थ्या स्थानावर होती. ती मिस इंडिया झाली नाही तरी तिला मनीष मल्होत्रा सारख्या अनेक डिझायनर्ससाठी मॉडेल म्हणून काम करता आले. याच्यामागचे रहस्य काही उलगडले नाही. तरी देखील, तिची आणि कुशल टंडनची अति जवळीक लोकांना भावली, तिचे मॉडेलिंग लोकांना भावले.

यानंतर तिला बॉलिवूडमध्ये ‘मेरा आशिक झल्ला’ हे आयटम सॉंग मिळाले. या गाण्याने तिच्यातील मादकता जगासमोर आली, तिचे डान्स मूव्ह्स अनेकांची झोप उडवून गेले आणि ती पुन्हा चर्चेत आली. ईशकजादे या चित्रपटातच तिने आणखी एक आयटम नंबर करून अर्जुन कपूर बरोबर ‘हुवा छोकरा जवान रे’ हे गाणं फेमस केलं. इतकी प्रसिद्धी मिळत असून सुद्धा, तिने कसे राहायला हवे, तिने कसे कपडे घालायला हवे यावर लोक सोशल मीडियावर तिला ज्ञान देऊ लागले.

ती स्वतः मुस्लिम धर्मात जन्माला आलेली असल्याने, तिने बुरखा सोडून हे असे अंग प्रदर्शन करणे तिच्या धर्मातील लोकांना मान्य नव्हते. जोपर्यंत हा वाद सोशल मीडियावर असतो तोपर्यंत ठीक मात्र, जेव्हा हाच वाद समोर होतो तेव्हा लोक आपली बाजू सिद्ध करण्यासाठी वाट्टेल ते करतात आणि हेच तिच्या सोबत झाले. एक सिंगिंग शो होस्ट करण्याची ऑफर तिला मिळाली.

एका एपिसोडमध्ये तिने तोकडे कपडे घेतले होते. ऑडियन्समध्ये जाऊन ती अँकरिंग करत होती. एक प्रेक्षक अचानक उठला आणि काही कळायच्या आत त्याने तिला तोंडात लगावून दिली. तिला नंतर सिक्युरिटी वाले घेऊन गेले मात्र, त्या माणसाला जेव्हा पोलिसात दिले गेले तेव्हा तिने पत्रकार परिषद घेऊन तिने आपली बाजू मांडली.

हा व्यक्ती एका मुस्लिम मुलीने असे कपडे घालू नये या विचारांचा असल्याने त्याने असे कृत्य केले आणि यावरच तिने असे लोक बाहेर सोडता काम नये. ते मुलींसाठी घातक आहेत असे सांगितले. आपल्याला या लोकांची प्रसिद्धी दिसते मात्र त्यामागे अशी अनेक प्रसंगी होणारी निंदा आणि अपमान देखील असतो हे आपण विसरतो.

Being Marathi

Related articles