म्हणून तब्बूने जॅकी श्रॉफ बरोबर काम न करण्याची घेतली होती शपथ…जाणून घ्या त्यामागचे कारण

म्हणून तब्बूने जॅकी श्रॉफ बरोबर काम न करण्याची घेतली होती शपथ…जाणून घ्या त्यामागचे कारण
ज्योतिषाच्या पोटी जन्म घेऊन मुंबईमध्ये करीयरच्या सुरवातीला चाळीत राहिलेला आणि आज 170 कोटी प्रॉपर्टीचा मालक म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफ होय. वडील गुजराती आणि आई कजाकिस्थानी! वडील गुजराती ज्योतिष्य पाहून घर चालवत होते. चाळीत राहताना एकदा त्याला मॉडेलिंग करण्याची संधी मिळाली आणि त्यानेही संधीचे सोने केले. त्यातूनच पुढे चित्रपटसृष्टीत त्याने आपले नशीब आजमावले. एका मागे एक चित्रपट करत ८०-९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट त्याने दिले.
हिरो, परिंदा, मालिक एक, अशा अनेक चित्रपटातून त्याने आपली जादू प्रेक्षकांना दाखवून दिली. हिरो या चित्रपटाचे गाणे तर आजही अनेक जण आवडीने ऐकतात. हिरोच्या वेळचा किस्सा तर फार मस्त आहे. हिरोसाठी स्क्रीनवर नाव देताना जॅकी श्रॉफचे खरे नाव जयकिशन हे फार मोठे आहे असे दिग्दर्शक सुभाष घई यांना वाटले, आणि मग नावाचा शोध सुरू झाला. शेवटी होय नाही करत जयकिशनचा जॅकी श्रॉफ झाला.
प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतातच. जॅकीचे आयुष्य सुद्धा सरळ साधे नव्हते. त्याच्या आयुष्यात हिरो म्हणून काम मिळणे जेव्हा बंद झाले तेव्हा त्याच्या करीयर ला उतरती कळा लागली. आणि तेव्हा तो दिवाळखोर झाला होता.
एका मित्राच्या मदतीने पुन्हा गाडी रुळावर आली मात्र तब्बू सोबतचे प्रकरण त्याच्या चांगलेच अंगाशी येता येता राहिले. तब्बू १४ वर्षांची होती जेव्हा एका पार्टीमध्ये जॅकी श्रॉफ याने तिच्याशी गैरव्यवहार केला आणि हीच तब्बू जेव्हा सिनेमात आली, तेव्हा तिने त्याच्या सोबत काम करणार नाही अशी शपथ घेतली.
१९९८ मध्ये देखील पोलिओ लसीकरण मोहीम सुरू असताना तो ब्रँड अंबेसेडर असताना त्याच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप लागला आणि अनेक माध्यमांतून त्याच्यावर आरोप देखील झाले. आज मराठी, हिंदी, उडिया, पंजाबी, मल्याळम, तेलगू, बंगाली अशा अनेक चित्रपटातून त्याने २१० भूमिका बजावल्या आहेत. त्याचा मुलगा टायगर श्रॉफ हा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे आणि मुलगी कृष्णा श्रॉफ ही फिटनेस ट्रेनर आहे.