आता अभिनेता संजय दत्त होणार अमेरिकावासी. जाणून घ्या संजय दत्त अमेरिकेत 5 वर्षांसाठी का चालला आहे?

आता अभिनेता संजय दत्त होणार अमेरिकावासी. जाणून घ्या संजय दत्त अमेरिकेत 5 वर्षांसाठी का चालला आहे?

आता अभिनेता संजय दत्त होणार अमेरिकावासी. जाणून घ्या संजय दत्त अमेरिकेत 5 वर्षांसाठी का चालला आहे?

संजय दत्त. नुसतं नाव जरी उच्चारलं तरी एकीकडे त्याची भारदस्त कारकीर्द दिसते तर दुसरीकडे त्याचे वादग्रस्त आयुष्य दिसते. एकंदरीत संजय दत्तला बऱ्याच काळापासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये त्याचे राजकीय पार्टीसोबत असलेले संबंध असोत कि 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात त्याने स्वतःजवळ शस्त्रास्त्र बाळगल्याने प्रकरण असो. या सर्व प्रकारांमुळे संजय दत्त चर्चेचा विषय बनला आहे.

मात्र मागील काही दिवसांमध्ये संजय दत्ताचे आयुष्य रुळावर येऊन सर्व ठीक ठाक चालले असतानाच नुकतेच त्याला कँसर असल्याचे निदान झाले आहे. यामुळे आता संजय आणि त्याच्या कुटुंबीयांपुढे नवीन अडचण उभी राहिली असून संजय आता कॅन्सरच्या इलाजासाठी अमेरिकेत जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

मात्र संजय एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 5 वर्षांसाठी अमेरिकावासी होणार असल्याचे समजत आहे. याचे कारण म्हणजे संजयने अमेरिकेत जाण्यासाठी 5 वर्षांचा व्हिसा काढला हे होय. त्याच्या या व्हिसावरून तो कुटुंबियांसह अमेरिकेत 5 वर्षांसाठी जाणार असल्याची चर्चा आहे. असे असले तरी तो हे 5 वर्ष चित्रपटांमध्ये काम करणार कि नाही याविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र त्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे.

संजय इलाजासाठी 5 वर्ष अमेरिकेत जाणार असला तरी तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात येत राहणार आहे. म्हणजेच तो काही काळ अमेरिका तर काही काळ भारत अशा वाऱ्या करत राहणार आहे. त्यामुळे त्याचे चित्रपटातील कामही थांबणार नाही आणि त्याचा इलाजही सुरु राहील. संजय दत्तकडे सध्या बॉलिवूडमधील मोठे प्रोजेक्ट असून साऊथ मधीलही अनेक चित्रपट त्याच्याकडे आहेत.

Being Marathi

Related articles