‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रिमूळे एका साधा ‘मिठाईवाल्याने’ उभा केले चक्क १०० करोड चे प्रोड्क्शन हाऊस…!

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रिमूळे एका साधा ‘मिठाईवाल्याने’ उभा केले चक्क १०० करोड चे प्रोड्क्शन हाऊस…!

बॉलीवुडमध्ये काही मोठे बॅनर आणि प्रोड्क्शन हाऊस  यांच्या जोरावर अनेक चित्रपट करोडो रुपये जमा करतात.  यश चोप्रा , धर्मा  प्रोड्क्शन हाऊस हे बॉलीवुडमधील शंभर टक्के यश मिळवून देणार बॅनर आहेत . सध्या करण जोहर हे नाव देखील अगदी विश्वासाने घेतले जाते. करण जोहरने 90 च्या शतकात असे अनेक हीट सिनेमे दिले आहे. करण जोहरचे धर्मा  प्रोड्क्शन हाऊस हे तर सर्वांचा माहीत आहे.

पण हे  प्रोड्क्शन हाऊस करणने चालू केलेले नसून त्याचे वडील यश  जोहर यांनी सुरू केलेले आहे. त्यामुळे फिल्मी जगतात जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला नक्कीच कोणीतरी गॉड फादर असावा. करण जोहरचे गॉड फादर हे त्याचेच फादर यश जोहर हे आहेत. यशजीने धर्मा  प्रोड्क्शन हाऊसच्या माध्यमांतून अनेक हीट चित्रपट दिले आहेत.

अनेक नवीन चेहरे समोर आणून त्यांना संधि दिल्या आहेत. काही लोकांना जन्मताच प्रसिद्धी , पैसा सर्वकाही मिळते परंतु काही  लोकांना मेहनत आणि कष्ट यांच्या जोरावर ते मिळवावे लागते. यशजी जोहर हे त्यातीलच एक एका सर्वसामान्य कुटुंबात यश यांचा जन्म झाला होता. 6 सप्टेंबर 1929 रोजी यश यांचा जन्म लाहोर येथे झाला.

यश हे त्यांच्या सर्व बहीण भावांत सर्वाधिक शिकलेले होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी घराची सर्व जबाबदारी यश यांच्यावर सोपावली. यश जबाबदारी पार पाडत होते. तेव्हा अचानक एकदा यश यांच्या वडिलांचे  निधन झाले. आता तर संपूर्णच जबाबदारी यश यांच्या खांद्यावर आली. यश यांच्या वडिलांचे मिठाईचे छोटे से दुकान होते. यश ते दुकान सांभाळू लागले , परंतु त्यांचे मन त्यात रमत नसे. त्यांना मुंबईला जाण्याची ओढ लागली होते.

ही गोष्ट यश यांच्या आईच्या लक्षात आली. त्यांनी त्यांच्याकडचे सोने घाण ठेवले , या बरोबरच काही पैसे जमा केले. आणि ते यश यांना दिले आणि त्यांना संगितले की जा स्वताच स्वप्न  पूर्ण कर. यश यांनी लाहोर सोडले आणि मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर त्यानी एका मोठ्या इंग्लिश वर्तमान पत्रात फोटो ग्राफर म्हणून काम करण्यास सुरवात केली. यश यांचे इंग्लिश भाषेवर उत्तम प्रभुत्व होते. त्यामुळे त्यांचे एक वेगळेच इम्प्रेशन पडत. तेव्हा अशीच एक घटना घडली डायरेक्टर आसिफ मुगल हे एका स्टुडियोमध्ये

मुगले ए-आज़म चित्रपटांची शूटिंग सुरू होती. त्यावेळेस यश यांनी मधुबाला यांचा खूप सुंदर फोटो काढला. असे म्हटले जाते की मधूबाला या कोणालाच फोटो काढून देत नसत , पण यश यांनी काढेलेला फोटो मधुबाला यांना फार आवडले. यश यांना  उत्तम फोटो  जमंतच या बरोबर ते उत्तम इंग्लिश बोलत त्यामुळे मधूबाला यांनी यश यांना फोटो काढून देण्यास परवानगी दिली.

यश यांनी इतका सुंदर फोटो काढला की तो मधूबाला यांना देखील प्रचंड आवडला. त्या नंतर यश आणि मधूबाला एकदा गार्डन मध्ये देखील गेले. यश यांचे नाशिबच  बदले. त्या नंतर त्यानी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाय ठेवला. अमिताब बच्चन आणि शत्रूगण सिन्हा एकत्र घेऊन दोस्ताना हा चित्रपट काढला तो देखील सुपर हिट झाला या नंतर मात्र यश आणि मागे वळून पाहिले नाही.

यश यांच्या चित्रपटांची एक खासियत म्हणजे की त्यांचे अनेक सिनेमे  हे परदेशात शूट होत. या बरोबरच चित्रपटात पूजा- पाठ  हे तर ठरलेले असंत. यश यांनी देवानंद  यांच्या सोबत देखील अनेक हिट  सिनेमे केलेत. यामध्ये  हरे – कृष्णा  हरे रामा, प्रेम पुजारी. 1970 साली त्यानी धर्मा प्रोड्क्शन हाऊस  सुरू केले. आता त्यांचा मुलगा करण सर्व काम  पाहत आहे.

Being Marathi

Related articles