नखे दाखवतात आरोग्याचा आरसा; तुम्हाला काय सांगतायत तुमची नखे?

नखे दाखवतात आरोग्याचा आरसा; तुम्हाला काय सांगतायत तुमची नखे?

आरोग्याकडे दुर्लक्ष करणे अनेकदा बरेच महागात पडते. मात्र, असे म्हटले जाते की, आपले शरीर आपल्याला वेळोवेळी आत मध्ये चालू असणाऱ्या घडामोडींची माहिती देत असते. ते कोणत्या पद्धतीने आपल्याला कळते यावर आपले लक्ष असले की, आपण निरोगी राहण्यास सक्षम होतो. आपण जाणून घेऊयात की, आपल्या लाखांच्या रंगावरून किंवा एकूणच ठेवणीवरून आपल्याला आरोग्याविषयी नेमका कोणता मार्ग दिसतो!

फिकट गुलाबी रंगाची नखे हे जसे सुंदर वाटतात, तेवढीच आरोग्यासाठी गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात. अशक्तपणा, किंवा हार्ट फेल्‍युअर, कुपोषण, यकृताच्या संबंधित असणाऱ्या अडचणी, अशा आजारांच्या मागे फिकट गुलाबी रंगाची नखे असू शकतात.

तुमची नखे जर निळसर वाटत असतील तर, शरीरात ऑक्सिजन कमी आहे आणि फुफुसाची समस्या निर्माण होऊ शकते. असा संकेत तुमचे शरीर तुम्हाला देत असते.

नखे पांढरे असतील तर तुमच्या यकृता संबंधित किंवा हिपॅटायटीस आजाराची लक्षणे नखे देतात. कधीकधी यामध्ये नखे पिवळी पडतात.

अनेक लोकांची नखे पिवळी दिसायला लागतात किंवा कालांतराने तसे व्हायला लागतात. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर, फंगल इन्फेक्शन सारखे प्रकार वाढून याचे संक्रमण शरीरभर पसरून शकते. असे काही प्रकार होत असतील तर, नक्कीच तुटायला लागतात किंवा त्यांचा चुरा व्हायला लागतो. कधीकधी थायरॉईड आणि फुफ्फुसांच्या आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये असे प्रकार आढळून येतात.

नखांवर गडद रेषा दिसायला लागल्यास लवकरच तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. कारण अशामुळे कर्करोगाचा धोका किंवा त्वचेशी संबंधित मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

Being Marathi