आपण 2 शब्दांद्वारे जीवन कसे परिभाषित करू शकता ?

आपण 2 शब्दांद्वारे जीवन कसे परिभाषित करू शकता ?

आपण 2 शब्दांद्वारे जीवन कसे परिभाषित करू शकता ?

दोन वर्षांपूर्वी आम्ही एक कथा वाचली . ऐका तर मग !

संध्याकाळी दोन भिक्षू मठात परत जात होते . पाऊस पडला होता आणि रस्त्याच्या कडेला पाण्याचे खड्डे पडले होते . एका ठिकाणी एका सुंदर युवतीला तलावाच्या पाण्यामुळे चालता येत नव्हते . दोन भिक्षूंपैकी मोठे जे होते ते तिच्याकडे गेले , तिला उचललेआणि तिला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सोडले आणि मठाकडे जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवला .

संध्याकाळी धाकटा भिक्षू थोरल्या भिक्षूकडे आला आणि म्हणाला , “ महाराज , भिक्षु म्हणून आपण एका महिलेला स्पर्श करु शकत नाही . ”

थोरल्या भिक्षूने उत्तर दिले , “ होय भाऊ ” .

मग धाकटा भिक्षूने पुन्हा विचारले , ” पण मग सर , तूम्ही त्या बाईला रस्त्याच्या कडेला कसे उचललेत ? “

थोरला भिक्षू त्याच्याकडे पाहून हसला आणि त्याला सांगितले “ मी तिला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सोडून , परंतु तू आजून तिलाच घेऊन फिरत आहेस . “

जवळजवळ नेहमीच , आपण गोष्टी , आठवणी , मागील घटना , लोक हे डोक्यात ठेवतो आणि नंतर कुरकुर करतो .

‘ मीच का ? ’

जर आपण आम्हाला 2 शब्दांद्वारे जीवन परिभाषित करण्यास सांगितले त्याचे उत्तर ‘ सोडून द्या ‘ असं असेल .

आपल्या आयुष्यापासून निराशेचे ओझे ‘ सोडून द्या ’ .

ज्यामुळे तणाव निर्माण होतो अशा गोष्टी ‘ सोडून द्या ’ .

राग आणि कडवटपणा ‘ सोडून द्या ’ .

वेदनादायक संबंध आणि आठवणीं ‘ सोडून द्या ’ .

कारण जीवन ‘आत्ता’ आहे.

“ जर तुम्ही थोडे सोडून दिले तर तुम्हाला थोडी शांती मिळेल . जर तुम्ही बरेच काही सोडले तर तुम्हाला खूप शांती मिळेल . ” ~ अजन चह

Being Marathi

Related articles