बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचा हा उपाय एकत्र करावा कधीच नाही होणार पैश्याची कमी….

बुधवारचा दिवस हा विघ्नहर्ता भगवान गणेशांचा दिवस मानला जातो. असा समज आहे, की भगवान गणेशांचा जो कोणी भक्त खर्या मनाने व श्रद्धेने त्यांची आराधना किंवा पुजा करतो, त्यांचे सर्व कष्ट भगवान गणेश नाहीसे करतात. गणेशाबरोबरच माता लक्ष्मीची पण पुजा केली जाते. तसे तर, देवांची पुजा रोजचं केली पाहिजे, परंतु, त्यांच्या खास दिवशी काही हेतु मनात धरून जर पुजा केली, तर नक्कीच आर्थिक फायदा तर होतोच, आणि बुद्धीबरोबरच धन आणि धान्याची काहीही कमी राहात नाही. चला तर मग जाणून घेऊया, गणपतीचा वार असलेल्या बुधवारी करावयाचे काही उपाय:
बुधवारी करावयाचे काही खास असे ५ उपाय : तृतीयपंथीचा आशीर्वाद :असे म्हटले जाते, की ज्या कोणी व्यक्तिला तृतीयपंथी आशीर्वाद देतात, त्या व्यक्तीचे भले होते, त्याच्या अडचणी दूर होतात. किंबहुना त्या व्यक्ति यशस्वी होतात. म्हणूनच, बुधवारच्या दिवशी कोणत्याही तृतीयपंथीयाला पैसे देऊन त्या पैशातील एक नाणे आशीर्वाद म्हणून घेऊन ते जर आपण पूजेत ठेवावे, आणि धूप दाखवून हिरव्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा आपल्या पर्स मध्ये ठेवावे. या उपायाने घराची भरभराट होईल. पण फक्त इतकेच लक्षात ठेवावे, की त्या हिरव्या रंगात गुंडाळलेल्या नाण्याला घाणेरड्या हाताने स्पर्श करू नका.
मंत्राचा जप : पुजा करताना माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा. परंतु, हे लक्षात असू दे, की ज्या बुधवारपासून तुम्ही हा उपाय सुरू कराल, त्यानंतर तुम्हाला पुढच्या २१ दिवस हा मंत्र जप करावयाचा आहे. माता लक्ष्मीला कमळाचे फूल प्रिय आहे, म्हणून त्यांना कमळाचे फूल नेहमी अर्पण करा. असे केल्याने, माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक अडचण किंवा समस्या समाप्त होतील.
जावित्री: विघ्नहर्त्या भगवान गणेशाला बुधवारी २१ किंवा ४२ जावित्री अर्पण करा, असे केल्याने, धन प्राप्ती होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. त्याचबरोबर, जर अथर्वशीर्ष पठन केले, तर गणेशांचा विशेष आशीर्वाद पण मिळतो.
मोदक आणि लाडू: भगवान गणेशांना मोदक आणि लाडू खूपच आवडतात. म्हणूनच, बुधवारच्या दिवशी त्यांना लाडू किंवा मोदक हे प्रसाद म्हणून ठेवावेत आणि दूर्वा पायावर वाहाव्यात. जे भक्त दूर्वा अर्पण करतात, त्यांच्यावर भगवान गणेश प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात.
मूंग: बुधवारच्या दिवशी सात सलग कौड़िया घेऊन एक मुट्ठी अख्खे मूंग त्याबरोबर हिरव्या कपड्यात बांधा. तो कपडा कोणत्याही मंदिराच्या पायर्यांवर नेऊन ठेवा. लक्षात असू दे, की हा उपाय तांत्रिक आहे आणि म्हणूनच कोणालाही न सांगता करावयाचा आहे.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.