पित्ताचा त्रास होतोय , करा हे उपाय पुन्हा कधीच पित्त होणार नाही

पित्ताचा त्रास होतोय , करा हे उपाय पुन्हा कधीच पित्त होणार नाही

पित्त म्हणजेच अॅसिडिटी  10 पैकी जवळपास 8 लोकांना तरी पित्ताचा त्रास होतो. बदलत  चालेली जीवनशैली , खाण्याच्या वेगळ्या पद्धती यामुळे अनेकदा पित्त होत. पित्त एकदा झाल की त्याचा त्रास नेहमीच चालू जातो. मळमळ होणे , डोकं दुखण , करपट ढेकरा येणे असे अनेक त्रास होतात. अनेकदा आपण चमचमीत पदार्थ खातो. त्यामुळे पित्ताचा खूप त्रास होतो. आज आपण असेच काही झटपट आणि लगेच आराम देणारे उपाय पाहणार आहोत ,ज्यामुळे आपल्याला लगेच थोडेस तरी बरं वाटेल. आपण आपल्या काही सवयी बदल्या आणि थोडीशी जरी काळजी घेतली तरी अॅसिडिटीकचा त्रास डॉक्टरांकडे न जाता देखील कमी होऊ शकतो.

1 ) थंड दूध – दूध हे पित्तवार अतिशय उपयुक्त आहे. जर तुमचे जागरण होत असेल तर तुम्हाला पित्ताचा  वारंवार त्रास होणर हे नक्की आहे. पित्तासाठी थंडगार दूध हे खूप उपयुक्त ठरते. थंड दुधामुळे मळमळ होणे कमी होते. तसेच शरीरातील आम्ल देखील कमी होते. पोटात पडणारी आग देखील कमी होते. जर तुम्हाला झोपायला उशीर  होणार असेल आणि काम देखील अधिक असेल तर झोपण्याअगोदर तुम्ही थंड दूध घ्या. यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही. थंड दुधामुळे  तुमचे पित्त बऱ्यापैकी कमी होईल.

2 ) कमी आणि मोजका आहार – आपल्याला जितकी भूक असेल तितकेच खावे ,त्याहून अधिक भूक असेल त्यापेक्षा थोडेसे कमी खावे. असे म्हटले जाते. आहार कोणता घ्यावा , कोणत्या वेळेत घ्यावा हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. अनेक वेळा आपण जास्त खातो, यावेळी खातो त्यामुळे अपचन होते. अपचन झाले की पित्त देखील होतेच. रात्री जर तुम्ही फार उशिरापर्यंत काम करणार असाल  तर कमी आणि मोजकांच आहार घ्यावा. आधीच्या काळापासून संगितले जाते , सकाळी नाष्टा भरपेठ करावा , दुपारचे जेवण व्यवस्थित करावे आणि रात्रीचे जेवण अगदी साधे , कमी तेलकट , पचायला सोप्पे असे करावे. रोजच्या जेवणात चमचमीत , चीज , तळलेले पदार्थ शक्यतो टाळा. आमटी , भाजी , भात, चपाती असे सात्विक जेवण घ्या. यामुळे पोटाला खूप कमी त्रास होतो. पित्त देखील होत नाही.

3 ) चालायला जाणे – तुम्ही दररोज स्वतासाठी काही वेळ काढून किमान थोडे चालायला हवे. चालणे हा शरीरासाठी सर्वात उत्तम उपाय आहे. किमान आपण 5 किलोमीटर तरी चालायला हवे. चालायला जाण्यामुळे शरीराचा खूप चांगला व्यायाम होतो. पचन  शक्ति सुधारते. जर  तुम्ही सतत बैठे काम करत असाल  तर तुम्ही नक्की चालायला हवे. सतत एक जागेवर बसून काम केल्यामुळे पचन शक्ति मंदावते. जर तुम्ही चालायला गेला नाही तर अन्न तुमच्या घशासी आल्यासारखे वाटेल. त्यामुळे चालायला हवे. चालणे हा नेहमीच चांगला व्यायाम आहे.

4 ) भरपूर पाणी  प्यावे – पाणी पिणे आरोग्यासाठी सर्वात चांगले आहे. पाणी प्यायल्यामुळे सर्व व्याधी दूर होतात. अनेक आजार पोटांपासून सुरू होतात. जर पोट चांगले असेल तर सर्व शरीर चांगले राहते. तुम्हीला तहान लागो किंवा न लागो पण तुम्ही दर एक तासाने एक ग्लास पाणी प्यायला हवे. पाणी प्यायलाने तुमचे पोट व्यवस्थित साफ होईल. जर पोट व्यवस्थित साफ झाले तर नक्कीच तुम्हाला पित्त होणार नाही. जर तुमचे पोट नीट साफ झाले तर तुम्हाला कधीच पित्त होणार नाही

Being Marathi