25 वर्ष पोलिसांच्या हाती न लागलेला महाराष्ट्राचा रॉबिनहुड- बापू बिरू वाटेगावकर

25 वर्ष पोलिसांच्या  हाती न लागलेला महाराष्ट्राचा रॉबिनहुड- बापू बिरू वाटेगावकर

रॉबिन हुड जो स्वताच्या वेगळ्या स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. जिथे -जिथे अन्याय होते तेथे -तेथे रॉबिनहुड जातो आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा देतो. महाराष्ट्रात देखील असाच एक रॉबिन हुड आहे जो तब्बल 25 वर्ष पोलिसांच्या हाती लागला नाही. ज्यांनी अन्याया विरुद्ध आवाज उठवला. ज्या व्यक्तिच्या आयुष्यावर एक मराठी चित्रपट देखील बनला कोण आहे तो व्यक्ती ? असं काय झालं त्याच्या सोबत की तो गुंड बनला. चला तर मग जाणून घेऊ या अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीला पोलिस 25 वर्ष पकडू शकले नाही. तो व्यक्ति दूसरा -तिसरा कोणी नसून तो व्यक्ति आहे बापू बिरु वाटेगावकर .
बापू हे मूळचे सांगली जिल्हयातील वाळवा तालुक्यातील बोरगावचे. त्यांचा जन्म एक 1922 साली सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्या काळी शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचली नव्हती त्यामुळे बापू यांचे देखील शालेय शिक्षण झाले नाही. एकूणच काय तर बापू हे शाळेची पायरी देखील चढले नाहीत. घरात ते सर्वात मोठे , बापूंचे आधी पासून एक तत्व होते जो कोणी आपल्याशी जसा वागेल तसे आपण त्यांच्याशी वागायचे.

बापू रोज सकळी लवकर उठून आपला दिनक्रम उरकून ते शेळ्या – मेंढयाना घेऊन ते माळावर जात आणि हसत – खेळत जीवन जगत. संध्याकाळी घरी परतल्या नंतर पुन्हा जेवणे मंदिरात जाणे , कीर्तन भजन करणे असा एकूण दिनक्रम असत. त्यांचा सर्वात आवडत छंद होता, व्यायाम करणे, जे अधिक -अधिक वेळ तालमीत घालवत, पण बापुच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की बापुच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली. 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि देशात एका नवीन विकास पर्वाची सुरवात झाली होती. लोक व्यवसाय , नोकरी यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत. गरीब मंजूर मिळेल ते काम करीत मिळेत त्या निवाऱ्यात राहतं. अशा प्रकारे आपल्या पोटाची खळगी भरत. जेव्हा काळ बदलत होता , तेव्हा प्रत्येक गावांमध्ये काही ठराविक लोकं त्यांच्या पैशाच्या जोरावर मनमानी करत. सांगली जिल्हा हा देखील सधन जिल्हा बनत चालला होता. या मागील मूळ कारण म्हणजे नदी. नदीकाठचा प्रदेश असल्यामुळे येथील शेती उत्तम पिकत. ऊस व इत्यादि चांगला पैसा देणारी पिके घेऊ लागली. त्यामुळे अनेकांनी पैश्यांच्या जोरावर सत्ता देखील मिळवली. अशा प्रकारे या अनेक गावात अनेक गुंडांचे ग्रुप तयार झाले. हे सर्व गुंड एकत्र येऊन गरीब शेतकरी , मजूर यांच्यावर अत्याचार करू लागले. त्यांना मारहाण करत , शेकऱ्यांच्या वस्तीवर जाऊन त्यांना मारहाण करत त्यांच्या कोंबड्या , शेळ्या ,मेंढया घेऊन जात. महिलनांची छेड काढत, त्यांच्यावर जबरदस्ती करत , अत्याचार करत. एके दिवशी तर चक्क एका गुंडाने एका महिलेवर जबरदस्ती केली.

ही गोष्ट सर्वाण समोर घडली परंतु कोणीच त्या गोष्टीला विरोध केला नाही. हे पाहून बापुना फार त्रास झाला. त्यानी या अत्याचारा विरोध करण्याचे ठरविले. या गुंडांच्या टोळीचा मोरक्या होता रंगा शिंदे. बापूनी या रंगाचा काटा काढण्याचे ठरविले. गणपती बसले होते , भजन -कीर्तन करत महिला बसल्या होत्या , तिथे अचानक रंगा महिलांच्या घोळक्यात घुसला आणि त्यांची छेड काढू लागला. बापू देखील तेथेच लपून बसले होते. ते तेथे आले त्यांनी तो गोंधळ शांत केला. पान – सुपारी देतो जरा बाजूला चला असे कारण सांगून त्यानी रंगाला बाजूला घेतले आणि त्याच्या पोटात चाकू खुपसला. रंगाचे तर आतडेच बाहेर आले. तेथे एकच गोंधळ उडाला. बापूंनी तेथून पळ काढला. असे देखील म्हटले जाते की रंगाच्या खुणा नंतर लोकांनी अक्षरक्षा पूरण पोळीचे जेवण बनविले. आणि आनंद उत्सव साजरा केला. कारण रंगा हा इतका क्रूर होता. या घटनेनंतर पोलिस बापूंच्या मागे हात धुवून लागले. शिंदे बंधूच्या मामाने देखील बापूंनी मारून टाकण्याची शपत घेलती. त्यासाठी त्यानी बंदुकीचे शासन मान्य लायसन्स देखील मिळवले. बापूंनी एका जागेवर राहणे शक्यत नव्हते ते सतत गावे बदलत राहत. बापू एकदा ताकारी गावत थांबले होते. तेथे बस स्टॉपवर अचानक मामांनी बापूंनी हल्ला केला. गोळ्या झाडण्यास सुरवात केली. बापू देखील पूर्ण तयारीनिशी बस स्टॉपवर आले होते. तयारीनिशी आले होते त्यानी मामांवर दोन गोळ्या चालविल्या मामाना त्या गोळ्या लागल्या मामा जागीच ठार झाले. या घटने नंतर बापूंची दहरशत आणखीच वाढली.

पोलिस देखील हात धुवून मागे लागले. बापू त्यावेळी एका गावात कधीच राहत नसत. सह्याद्रीच्या कुशीत त्यांनी अनेक गावे पालती घातली तेथील सर्व गुंडगिरी संपवली. त्यांना प्रत्येक गावात अनेक जिवाभावाचे साथीदार मिळू लागले. परंतु यातील काहीनी बापूंच्या नावाखाली गरीब लोकांना धान्य , पैसे ,इतर गोष्टीसाठी बापुनच्या नावाचा वापरत करत. बापूना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा बापूना प्रचंड राग आला. बापूनी अशा साथीदारांचा हल्ला केला. स्वताच्या मुलाला देखील त्यानी माफ केले नाही.जनसामन्यात बापुची चुकीची प्रतिमा निर्माण करणे. हे बापुना कदापी मान्य नव्हते. दमदाटी करून पैसे लुटणे , मारहाण करणे , स्त्रियांवर अत्याचार करणे हे बापुना मान्य नव्हते. पोलिस असे म्हणतात की बापूनी आता पर्यन्त 12 खून केले आहेत. परंतु यांची संख्या बाराहून अधिक आहे. बापुना रंगा यांच्या खुनाची शिक्षा जन्म ठेप म्हणून झाली. रंगा शिंदेचा खून झाल्या पासून बापू तब्बल 25 वर्ष फरार होते. ते एका गावातून दुसऱ्या गावात जात. याकाळात अनेक शेतकऱ्यानी बापूना त्यांच्या बांधावर जेवायला घातले. कित्येकदा बापू गावातील मारुतीच्या मंदिरात आसरा घेत. पोलिस बापुच्या जवळ पोचण्याच्या अगोदर बापूना खबर मिळत आणि बापू तेथून निघून जात.

अशा प्रकारे बापू पोलिसांच्या तावडीत सापडत नसत. बापू हे फक्त शेतकऱ्यांचे मित्र नव्हते तर पोलिस देखील त्यांचे मित्र होते. साताऱ्याच्या एका पोलिसाची बंदूक बापूनकडे होती. पोलिस बापुना बंदुकीच्या गोळ्या पुरवत. बापूनी ही गोष्ट चौकशी दरम्यान सांगितली. त्यांना जेव्हा त्या पोळीसाचे नाव विचारण्यात आले , तेव्हा मात्र त्यानी एका आजाराने मृत झालेल्या पोलिसांचे नाव सांगून वेळ मारून नेली. बापू चे मित्र पोलिस देखील होते. हे मात्र खरं आहे. 1990 मध्ये बापूला तत्कालीन पोलिस मदन पाटील यांनी जुनखेड परिसरात बाभळीच्या बनात जेरबंद केले. कळंबा जेलमधील पोलिस बंदोबस्त असताना बापूनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही सफल झाला नाही. सांगली कोर्टात सुनावणी आटोपून कोल्हापूरला परताना शिवगावचा गुंड रवी कांबळे याने तमलगेज जवळ एसटी आडवून बापूला थांबविण्याचा प्रयत्न केला.

बापूची सुटका देखील झाली. परंतु परंतु काही वेळातच पोलिसानी बापूला जेरबंद केले. जन्म ठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु बापूंची चांगली वागणूक असल्यामुळे त्यांची शिक्षा कमी करण्यात आली. रंगा शिंदेचा खून केल्याबद्दल त्यांना चार एकर जमीन मिळाली होती. शिक्षा भोगताना त्यांना अध्यात्माची गोडी लागली. शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्याने आणि मंगला बनसोडे यांच्या तमाशातील वगनाट्याने मंगला बनसोडे यांच्या तमाशातील वगनाट्याने बापू जनसामान्यत प्रसिद्ध झाले. तुरुंगात बापूना भजन , कीर्तन यांचे वेड लागले. वाईट लोकांची संगत सुटली त्यामुळे बापू सुधारले. शिक्षा भोगून झाल्यानंतर ते पुन्हा बाहेर आले. त्यानी कीर्तन करायला सुरू केले. त्यांच्या कीर्तनातून ते स्वताच्या आयुष्यातिल घटना रंगून सांगत , यातून त्यांना खूप सहानभूती मिळत. वयाच्या 96 वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. अन्याया विरुद्ध लढणारा ढाणा वाघ अशी प्रतिमा त्यानी निर्माण केली होती.

Being Marathi