आयुर्वेदात अमृतासमान महत्व आहे या औषधी वनस्पतीला , जाणून घ्या काय आहेत उपयोग

गुळवेलचा उपयोग अनेक आजारांनाच्या उपचारसाठी केला जातो. प्रतिकारशक्ति वाढविण्यासाठी गुळवेल अतिशय उपयुक्त आहे. डेंगूसाठी गुळवेल अतिशय प्रभावी औषध ठरते. ज्याना डेंगूची थोडीफार लक्षणे आहेत , किंवा ज्यांना डेंगू झाला आहे अशा रुग्णांना गुळवेलचा रस दिला जातो. कारण डेंगू या आजारात मानवाची प्रतिकार शक्ति सर्वाधिक कमी होते. आणि प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी गुळवेल अतिशय उपयुक्त आहे. गुळवेलचे जसे अनेक फायदे आहेत , तसे अनेक तोटे देखील आहेत , त्यामुळे आजच्या या लेखात आपण गुळवेलचे फायदे आणि तोटे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. गुळवेल ही वनस्पती बेल या प्रकारात येते. गुळवेल हे शक्यतो आड -रानात किंवा जंगलात उगवतात परंतु डेंगूवर जेव्हा गुळवेल प्रभावी ठरले , तेव्हा पासून अनेक लोक आपल्या परसात किंवा आजूबाजूला गुळवेल लावू लागले. गुळवेलची पाने ही गडद हिरव्या रंगाची असतात , या बरोबरच आपण ही पाने खातो त्यासारखीची ती असतात.
आयुर्वेदात गुळवेलला अमृताची उपमा दिली आहे. अनेक शारीरिक व्याधीसाठी गुळवेल अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये एंटी-पायरेटिक, एंटी-इंफ्लेमेटरी, एंटी-ऑर्थरिटिक आणि एंटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. पचन संबंधी समस्या असो किंवा इंफ्लेमेशन जसे की सूज , रक्त शुद्धीकरण , यासारख्या अनेक समस्यांसाठी गुळवेल अतिशय उपयुक्त आहे. हदयासंबंधी अनेक समस्यांसाठी गुळवेल उपयुक्त आहे. कृष्टरोग , कावीळ , एनिमिया आदी आजारांसाठी गुळवेल अतिशय उपयुक्त आहे. डेंगू, स्वाइन फ्लू यासारख्या अनेक आजारांसाठी देखील गुळवेल उपयुक्त आहे. गुळवेलचे फक्त पानेच नव्हे तर फांद्या व इतर अवयव देखील अतिशय उपयुक्त आहेत. गुळवेलमध्ये एंटीऑक्सीडेंट, एंटी-इंफ्लेमेटरी आणि कैंसर रोधी गुणधर्म असतात. अर्थराइटिस, डायबिटीज, कब्ज, एसिडिटी, अपचन , ताप , कावीळ यासाठी देखील गुळवेल अतिशय उपयुक्त आहे. गुळवेलच्या सेवनाने वात , पित , कफ या तीनही गोष्टीवर नियंत्रण मिळवतात येते. या तीनही प्रकृतीसाठी गुळवेल अतिशय उपयुक्त आहे. गुळवेलमध्ये अतिशय महत्वपूर्ण आयुर्वेदिक गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात. यामध्ये ग्लूकोसाइड, पामेरिन, टीनोस्पोरिन, टीनोस्पोरिक एसिड महत्वपूर्ण इत्यादि महटपूर्ण घटक असतात. आयरन, फॉस्फोरस, कॉपर, कैल्शियम, जिंक, मैंगनीज यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. अनेक रोगांपासून वाचण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
गुळवेलचे काही तोटे देखील आहेत-
पोटाच्या समस्या – गुळवेलचे जसे फायदे आहेत तसे त्याचे अनेक तोटे देखील आहेत ,जर गुळवेलचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केले तर पोटामध्ये आग पडते. त्यामुळे गुळवेलचे अधिक सेवन करू नये. ज्यांना पोटाच्या आधीपासूनच समस्या आहेत अशा लोकांनी गुळवेल सेवन करू नये. पोटात दुखणे , पोटात आग पडणे , पोट खराब होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. ज्याना ब्लड शुगरचा त्रास आहे अशा लोकांनी गुळवेलचे सेवन करू नये कारण गुळवेलच्या सेवनाने शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढू शकते. त्यामुळे ज्याना शुगरचा त्रास आहे अशांनी गुळवेलचे सेवन करू नये. गूळवेल हे जरी प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी उपयुक्त असले तरी याचे जर प्रमाणापेक्षा अधिक सेवन केले तर मात्र तुम्हाला ऑटोइम्यून डिसऑर्डरचा त्रास होऊ शकतो , जसे की ल्यूपस, मल्टीपल स्केलेरोसिस आणि रूमेटाइड अर्थराइटिस असे त्रास होऊ शकतात.
गर्भ अवस्थेत करू नये सेवन – डिलेव्हरी अगोदर किंवा डिलेव्हरी नंतर गुळवेलचे सेवन करू नये. कारण ज्या माता स्तनपान करतात अशा माताना यांचे दुष्परिणाम दिसू कारण गुळवेल तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढविते. जर तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढलेली असेल तर तुमच्या शरीरावरील जखमा लवकर भरून येत नाहीत. बाळांतपणात तुम्हाला टाके पडतात आणि जर तुम्ही गुळवेलचे सेवन केले तर हे टाके लवकर भरून येणार नाहीत.
गुळवेलचे काही फायदे पुढील प्रमाणे आहेत – अनिमियासाठी उपयुक्त – ज्यांच्या शरीरात रक्ताची कमी असते अशांना अनिमियाचा त्रास होतो. रक्ताच्या कमीमुळे अनिमिया होतो. गुळवेलच्या पानाचा रस जर पिला तर तुमच्या शरीरातील रक्ताची वाढ होईल. गुळवेलच्या पानाचा रस अर्धा चमचा तूप आणि एक चमचा मध हे सर्व एकत्र करून जर घेतले तर रक्ताची वाढ होते. रक्त वाढण्यासाठी गुळवेल अतिशय उपयुक्त आहे.
जर तुम्हाला कावीळ असेल तर तुम्हाला गुळवेल अतिशय उपयुक्त आहे. गुळवेची पाने सुकवून त्याचे चूर्ण बनवावे आणि त्या चूर्णचे सेवन करावे. गुळवेलची दोन -तीन पाने पाण्यात उकळून ते पानी थंड करावे आणि ते पानी प्यावे. गुळवेलच्या पानाची पेस्ट करून त्या पेस्टचे सेवन मधासोबत करावे यामुळे देखी; तुम्हाला खूप फरक पडतो. जर तुमच्या हाथ – पायांना मुंग्या येत असतील तर तुम्ही गुळवेच्या पानाचा रस प्यावा त्याचा देखील तुम्हाला खूप फायदा होतो. अनेकांच्या हात – पायांच्या तळव्यांची आग होते अशा लोकांनी गुळवेलचा रस काढून काही वेळ तळव्याना लावावा त्यामुळे हात – पायांचा दाह कमी होतो. गुळवेलच्या पानाचा काढा देखील तुम्ही घेऊ शकता तो देखील अतिशय उपयुक्त आहे. अशा प्रकारे गुळवेल तुमच्या अनेक आजारांसाठी उपयुक्त आहे.