अष्टगंधाचे हे पाच चमत्कारिक फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

आपल्या घरात कोणतीही पूजा असो किंवा इतर कोणतेही धार्मिक कार्य अष्टगंध आणि कुंकू हे वापरतातच . कुंक आणि अष्टगंध हे नाम ओढण्यासाठी म्हणजेच तिलक करण्यासाठी वापरतात. तिलक करण्यामगे देखील एक चांगले वैज्ञानिक कारण आहे. आज आपण या लेखात अष्टगंध त्याचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घेणार आहोत. अष्टगंध हा कुंकू , अगर , कस्तूरी , चंद्रभाग, त्रिपुरा,गोरोचण , तमाल आणि पाणी या आठ गोष्टीपासून बनवतात. सर्व ग्रहांना शांत करण्यासाठी ही तत्व अतिशय उपयुक्त आहेत. ग्रहांचा दुष्परिणाम दूर करण्यासाठी अष्टगंध अतिशय उपयुक्त आहे. मानसिक शांती व तनाव मुक्तीसाठी उपयुक्त अनेकदा काही कारण नसताना मानसिक स्वास्थ बिघडते. आपली चिडचीड होते जेव्हा आपण रागात असतो ,तेव्हा आपले संपूर्ण शरीर गरम होते.
अशा वेळेस जर आपल्या डोक्यावर अष्टगंध लावलेला असेल तर आपला राग लवकर नियंत्रणात येतो. कारण अष्टगंध उष्णता शोषून घेते. अष्टगंधामध्ये चंदन असते जे आपल्या शरीरातील उष्णता शोषून घेते. अष्टगंधाच्या सुगंधाने आपले मन विचलित होत नाही. एक वेगळ्या प्रकारची मानसिक शांतता लाभते. जेव्हा शरीरातील उष्णता कमी होते तेव्हा चिडचिड देखील कमी होते. आपल्या घरांमध्ये दररोज लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. लक्ष्मी मातेस अष्टगंध खूप प्रिय आहे. कारण अष्टगंधास एक वेगळ्या प्रकारचा सुवास असतो. त्यामुळे त्या सुवासामुळे लक्ष्मी माता आपल्या घरात वास करते. पूजेसाठी अष्टगंध वापरण्यामागे हे देखील महत्वाचे एक कारण आहे की अष्टगंधास एक मंद आणि मन शांती करणार सुगंध असतो. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही या गोष्टीवर सर्वांचा विश्वास असेल नाही. घरात जर वास्तु शांती किंवा ग्रह शांती करायची असेल तर कर्मकांड अथवा यंत्र लेखनासाठी अष्टगंध वापरतात. अष्टगंधाचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे वैष्णव आणि दूसरा म्हणजे शैव.
पूजा ज्या प्रकारची असेल त्या प्रकारचा अष्टगंध वापरला जातो. मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी अष्टगंध शक्यतो नियमीत लावला कारण त्याच्या राशीसाठी तो अतिशय फायदेशीर आहे. राशी अभ्यासानुसार असे संगितले जाते की या दोन राशीना अतिशय राग येतो. त्यांचा राग शांत करण्यासाठी अष्टगंध अतिशय उपयुक्त आहे. अष्टगंध हा कोणत्याही शुभ कार्यासाठी अतिशय फलदायी मानला जातो. आयुर्वेदात देखील अष्टगंधाचे अनेक फायदे सांगितले आहेत. अष्टगंध हा त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण यामध्ये कुंकू , अगर , कस्तूरी , चंद्रभाग, त्रिपुरा,गोरोचण , तमाल आणि पाणी हे महत्वपूर्ण गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त आहेत. दररोज आंघोळ केल्यानंतर जर तुम्ही कपाळा जर अष्टगंधाचा तिळा लावला तर तुम्हाला कोणताही त्वचा रोग होणार नाही. तुरटी , चंदन पाऊडर , कापरांची पाऊडर हे सर्व जर अष्टगंधा सोबत मिक्स करून लावले तर अंगाला दिवसभर चांगला सुगंध येतो. तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी होणार नाही. त्वचेच्या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी अष्टगंध उपयुक्त आहे. आपण कधी आपल्या जुन्या रिती रिवाजाचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्या प्रत्येक गोष्टीमागे काही तरी वैज्ञानिक कारण नक्की असते. जसे की आपण रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्या जवळपासच्या मंदिरात जातो दर्शनाला ,त्या मंदिरात दर्शन घेतल्या नंतर तेथे बाहेर अष्टगंध बनवून ठेवलेला असतो. आपण त्याचा टिळा आपल्या माथी लावतो. आज हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला समजले असेल त्या मागे किती मोठे वैज्ञानिक कारण आहेते. त्यामुळे आपण शक्यतो रोज सकाळी अष्टगंध माती लावायला हवा.