जर एखादा व्यक्ती तुमच्याशी खोट बोलत असेल तर पकडण्याची सोप्पी आइडिया

अनेकदा समोरचा व्यक्ती आपल्याशी खोट बोलतो , पण आपल्या लक्षात देखील येत नाही. पण आपण जर थोडस बारीक निरीक्षण केलं तर तुमच्या लगेच ही गोष्ट लक्षात येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आयडिया सांगणार आहोत ,ज्यांनी तुम्ही सहज ओळखू शकता ,की समोरचा व्यक्ती तुमच्याशी खोट बोलत आहे. चला तर मग जाणून घेणार आहोत समोरचा व्यक्ति तुमच्याशी खोटं बोलत आहे , हे ओळखण्याची सोप्पी आइडिया.
जर एखादा व्यक्ति तुमच्याशी खोटं बोलत असेल तर , तो तुमच्या नजरेला नजर नाही मिळवू शकणार. तो तुमच्याशी बोलता सतत डावीकडे किंवा इकडे -तिकडे बघेल. कारण जो व्यक्ति खोटं बोलतो तो व्यक्ति नजेरला -नजर भिडवून नाही बोलू शकत. तो खोटं बोलत असतो त्यामुळे जर एखादा व्यक्ति तुमच्याशी बोलताना ,तुमच्या नजरेला – नजर मिळवून बोलत नसेल तर तो तुमच्याशी नक्कीच खोट बोलत आहे. जेव्हा एखादा व्यक्ति खोट बोलतो ,तेव्हा त्याला फार विचार करावा लागतो पण जेव्हा माणूस खर बोलत असतो तेव्हा मात्र त्याला ,काहीच विचार करावा लागत नाही.
एखादा व्यक्ति जेव्हा तुमच्या समोर बसून खोटं बोलतो , तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या पायांची हालचालीचे देखील निरीक्षण करू शकता. जेव्हा तो व्यक्ती खोटं बोलतो ,तेव्हा तो सतत पाय हालवत असतो, किंवा [पायाची हालचाल करत असतो. कधी -कधी उलटी मांडी घालून बसने किंवा आपलं बोलणं लवकर संपण्याचा जर प्रयत्न करत असेल तर तो व्यक्ती नक्कीच तुमच्याशी खोटं बोलत आहे. कारण जेव्हा तो विषय संपवण्याची घाई करतो तेव्हा तो थोडासा घाबरलेला असतो आणि त्याला तो विषय संपवायचा असतो. जेव्हा एखादा व्यक्ति खोटं बोलतो तेव्हा त्यांचे नाक गरम होते , त्यांच्या हदयाची गती वाढते. श्वास देखील जलद घेतला जातो.
एखादी घटना किंवा चोरी झालेली असेल आणि संशयित व्यक्ति खरं बोलत आहे की खोटं हे ओळखन्यायासाठी लाई डिटेक्टर हे मशीन वापरतात , या , मशीनमध्ये देखील हृदयाचे ठोके यांच्या आधारे तो व्यक्ति खरं बोलत आहे की खोटं हे ओळखल जात. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा व्यक्ति आपल्याशी खरंच खोटं तेव्हा त्या व्यक्तीला लगेच तिची चूक दाखवून देऊ नका त्याला विनम्रपणे त्याची चूक दाखवून द्या. जेव्हा तुम्हाला खरंच एखाद्या व्यक्तीकडून सत्य जाणून घ्यायचे असेल ,तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करा आणि वरील सर्व निरीक्षणे नोंदवा आणि मग ठरवा की तो व्यक्ति खर बोलत आहे की खोटं.