जाणार 2020 आणि येणार 2021 या राशीच्या लोकांना करणार मालामाल तर या राशीना करणार कंगाल

जाणार 2020 आणि येणार 2021 या राशीच्या लोकांना करणार मालामाल तर या राशीना करणार कंगाल

2020 अवघ्या काही दिवसांत संपणार आहे. त्यामुळे प्रत्येकजणाला या नवीन वर्षात काय घडणार आहे यांची उत्सुकता असणार आहे. नवीन वर्ष नवीन आशा नवीन दिशा असं सर्व काही घडणार आहे. 2020 मध्ये लोकांना खूप काही अपेक्षा होत्या पण अतिपाऊस , रोगराई यामुळे लोक पुरते खचून गेले अनेकांना आर्थिक फटका देखील बसला. त्यामुळे येणारं नवीन वर्ष सर्वांनाच कसं असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या राशीसाठी कसं असेल हे जाणार हे वर्ष आणि येणार नवीन 2021 वर्ष . येणाऱ्या 2021 शनि हा जागा बदलणार नसून तो एका जागेवर स्थिर असणार आहे. संपूर्ण वर्ष शनि त्यांच्या स्वराशी मध्ये म्हणजे मकर राशीमध्ये राहणार आहे. मिथुन , सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांनी यावर्षी सांभाळून राहावे.

मेष – यावर्षी मेषराशीच्या लोकांना समिश्र परिणाम मिळणार आहेत. यावर्षी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अधिक मेहनत करावी लागणार आहे.परंतु मेहनत करताना मात्र मागे – पुढे पाहू नका कारण तुम्हाला या गोष्टीचे फळ मिळणार आहे. परंतु या काळात तुमचे पित्याशी थोडेस वाद होऊ शकतात. परंतु तुम्हाला त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या वडिलांना काही शारीरिक व्याधी होऊ शकतात. काही कारणास्तव तुमच्या घरात गृह कलह देखील होऊ शकतात. 22 जानेवारी नंतर मात्र तुमचे ग्रहमान बदलणार आहेत. त्यानंतर तुमचे व तुमच्या पित्यानचे नाते संबंध काही प्रमाणात सुधारतील. परंतु आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु तुमच्या कार्यक्षेत्रात मात्र तुम्हाला चांगली संधी मिळले.

वृषभ – शनि उत्तराषाढ़ा नक्षत्रमध्ये असल्यामुळे या राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळणार आहेत. जसे की नवीन प्रॉपर्टी किंवा नवीन वाहन घेण्याची संधि उपलब्ध होणार आहे. उच्च शिक्षणासाठी देखील चांगल्या संधी मिळणार आहेत. उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर नक्कीच प्रयत्न करावेत. या बरोबरच तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. हे वर्ष आर्थिक बाबीसाठी देखील खूप उत्तम राहणार आहे कारण यावर्षी आर्थिक उत्पनाचे अनेक नवीन स्त्रोत तुम्हाला मिळणार आहेत. तसेच जर तुम्हाला परदेशी शिक्षणासाठी जायचे असेल तर दिवाळी नंतर तुम्हाला अनेक संधि मिळू शकता यासाठी प्रयत्न करावेत. तुम्हाला जरी आर्थिक वर्ष उत्तम असले तरी तुमच्या बहीण -भावांडाना मात्र काही समस्या येऊ शकता. त्यासाठी तुम्ही त्यांना मदत करण्यासाठी तत्पर राहावे. तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल तितके अधिक यश तुम्हाला मिळेल.

मिथुन – मिथुन राशीच्या व्यक्तिना हे वर्ष तितकेसे चांगले नसणार नाही ,आयुष्यात अनेक चढ उतार येऊ शकतात आणि तुम्ही त्याचा सामना करावा. अपयश देखील येऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमचे मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवावे. तुमच्या प्रतिकूल ग्रहांचा परिणाम हा तुमच्या बहीण – भावांवर देखील होणार आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील तितकीच काळजी घ्यावी. तुम्हाला काही गंभीर समस्यांना देखील सामोरे जावे लागेल. या बरोबरच आर्थिक हानी देखील होऊ शकते. तुमच्या सासरच्या लोकांशी देखील नाते व्यवस्थित ठेवावे नाहीतर अधिक त्रास होऊ शकतो. या वर्षी तुम्हाला खूप धैर्याने सामना करावा लागणार आहे.

कर्क – कर्क राशीच्या लोकांना शनि गोचरमुळे संमिश्र परिणाम मिळू शकतात. वैवाहिक आणि व्यवसायिक क्षेत्रात वाद होऊ शकतात. तुमच्या जीवनसाथीला देखील अनेक शारीरिक समस्या होऊ शकतात. त्यांची काळजी घ्यावी. दाम्पत्य जीवनात देखील लहान मोठ्या कुरबुरी होऊ शकतात. तुम्ही तुमच्या दांपान्त्य जीवनात सर्व सांभाळून घेण्याचा प्रयत्न करा.जे लोक व्यवसाय करतात त्यांना मोठी काळजी घेण्याची गरज आहे काही आर्थिक हानी होऊ शकते. परंतु जर थोडी काळजी घेतली तर मात्र तुम्हाला चांगले यश मिळू शकते. जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर मात्र तुमच्या भागीदारासोबत वाद होऊ शकतात. सासरवाडीच्या लोकांचा चांगला सहयोग तुम्हाला मिळू शकतो. प्रेमी युगलांना हा काळ खूप चांगला असणार आहे. तुमच्या विश पूर्ण होतील. काही भांडण झाले ते देखील मिटून जातील.

सिंह – सिंह राशीच्या व्यक्तिना आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. कारण तुम्हाला अनेक शारीरिक समस्या सतावू शकतात. तसेच तुमच्या जीवनसाथी सोबत तुमचे संबंध बिघडू शकतात. व्यवसायात मात्र तुम्हाला चांगले यश मिळू शकते प्रतिस्पर्धी व्यक्तीवर मात्र तुम्ही चांगला दबबव निर्माण करू शकता. बँकेतून जर तुम्ही काही कर्ज घेणार असाल तर नक्कीच तुम्हाला ते मिळेल. व्यवसायात तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. त्या बरोबरच या वर्षी तुमचा खर्च जास्त व कमाई कमी असे काही होणार आहे. कोर्ट कचेरीचे मामले मार्गी लागणार आहेत. त्या बरोबरच विदेशी यात्रा घडण्याचे देखील चांगले योग आहेत.

कन्या – कन्या राशीच्या लोकांना देखील काही संमिश्र परिणाम मिळणार आहेत. जर तुमच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी जायचे असेल तर नक्कीच नवीन संधि मिळू शकतात. सहजीवन साथी सोबत देखील तुमचे खटके उडू शकतात. विद्यार्थ्याना मात्र अभ्यासात काही अडचणी येऊ शकतात. बुद्धीचा योग्य वापर करून जर तुम्ही योग्य प्रकारे काम केले तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. मानसिक तान मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. प्रेमासाठी चांगला काळ आहे. काही लोकांना अनेक नवीन संधी मिळणार आहेत. या बरोबरच व्यवसायाचे अनेक नवीन मार्ग मिळू शकतात

. तुला – तुला किंवा तूळ राशीच्या व्यक्तिना येणारे नवीन वर्ष हे काही बाबतीत चांगले तर काही बाबतीत हे अनुकूल – प्रतिकूल असे असणार आहे. जसे की जर तुम्हाला प्रॉपर्टी मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर अतिशय फायदेशीर ठरेल. तुमचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणर आहे. त्यासाठी तुम्हाला थोडी अधिक मेहनत करावी लागेल पण हे सर्व तुम्ही अगदी आनंदाने कराल कारण तुमचं घराचं स्वप्न साकार होणार आहे. तुमची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढणार आहे. तुम्हाला समाजात एक वेगळ्या प्रकारचा मान – सन्मान मिळणार आहे. पण यासंपूर्ण काळात तुमची आर्थिक बाजू बरीच मजबूत होणार आहे. त्यामुळे आर्थिक चिंता तुम्हाला जास्त सतावणार नाहीत. या बरोबरच तुमच्या आईचे आरोग्य तितकेसे चांगले राहणार नाही. यासाठी तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल अनेकदा आपण खूप मेहनत करतो पण त्याप्रमाणे यश मिळत नाही अशा वेळेस निराश होऊ नका. आई – वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे आर्थिक वर्ष खूप चांगले राहणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. अनेक वर्षापासून तुमच्या ज्या आर्थिक बाबीपूर्ण होऊ शकल्या नाहीत त्या देखील पूर्ण होणर आहेत. तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत होणार आहे. कुटुंबातील सदस्याशी तुमचे नाते संबंध अधिक सुधारणार आहेत. तुमच्या लहान बहीण भावांडापासून तुम्हाला थोडासा त्रास होणार आहे. तुमच्या आई – वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांना जपा. तसेच योग्य आर्थिक रक्कम गुंतवा यांचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. तुमच्या अनेक चांगल्या यात्रा होऊ शकतात. तुम्हाला अचानक आर्थिक धन लाभ देखील होऊ शकतो.

धनू – धनू राशीच्या लोकांसाठी हे आर्थिक वर्ष चांगले राहणार आहे. कौटुंबिक वातावरण देखील चांगले राहणार आहे. तुमचे अनेक कामे मार्गी लागणार आहेत. कामा निमित्त तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर देखील राहावे लागू शकते. तुमचं असं एखाद काम असेल जे अनेक दिवसांपासून मार्गी लागत नसेल तर त्या कामाला चांगली गती मिळू शकते. ते काम लवकर मार्गी लागून तुम्हाला चांगला फायदा देखील होऊ शकतो. तुम्हाला अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो , तसेच तुमच्या बहीण -भावांकडून तुम्हाला चांगला सपोर्ट मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या पिढीजात संपत्ति मधून देखील हिस्सा मिळू शकतो. तुमच्या आई – वडिलांच्या आरोग्याची चांगली काळजी घ्या त्यांना एखादी शारीरिक समस्या सतावू शकते. तुम्ही तुमच्या बोलण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवा. त्यामुळे अनेकजण दुखावले जातात. तसेच तुम्ही तुमच्या कामावर अधिक फोकस करा त्यामुळे तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात.

मकर- या राशीच्या लोकांसाठी हा येणार वर्ष हे संमिश्र असणार आहे. कारण तुम्हाला काही गोष्टी चांगल्या घडणार आहेत तर काही गोष्टी या मनाप्रमाणे घडणार नाहीत. जसे की तुम्हाला चांगले आर्थिक लाभ होऊ शकतात. तसेच तुमचे काही प्रवास देखील होऊ शकतात. तुम्हाला देखील तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या देखल आरोग्याची देखील काळजी घ्या . नाहीतर मागे लागलेले दुखणे तुम्हाला खूप त्रास देते. संपत्ति तुमच्याकडे भरपूर येणार आहे. तुमच्या पती – पत्नीच्या जीवनात दुरावा निरामन होऊ शकतो. या बरोबरच व्यवसायात नवीन संधि मिळतील यासाठी प्रवास देखील करावा लागू शकतो.

कुंभ – कुंभ राशीच्या लोकांना हे वर्ष तितकेसे चांगले नसणार नाही आर्थिक समस्या तर थोड्यापार असणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्यवसायात खूप लक्ष ठेवावे लागणार आहे. तुमच्या जीवनसाथीच्या आरोगयास देखील कमी जास्त होणार आहे. तुमच्या दांपत्य जीवनाथ अनेक चढ – उतार येणार आहेत.तुमच्या व तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात.
तुमचे खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्या हिशोबाने खर्च करा. तुम्हाला हाडांची दुखणी देखील लागू शकतात. तुमचे पाय देखील दुखू शकतात. या बरोबरच तुम्हाला बाहेर फिरायला जाण्याचे योग देखील लाभू शकतात. जर तुम्हाला कोठे पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तसेच व्यापार करणाऱ्या लोकांसाठी देखील हा उत्तम कालावधी आहे.

मीन – मीन राशीच्या लोकांसाठी हा उत्तम कालावधी आहे.तुम्ही तुमच्या विरोधकांवर देखील विजय मिळवणार आहात. हा येणारा काळ शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे. त्यांना यातून खूप नाव लौकिक मिळणार आहे. मीन राशीच्या लोकांसाठी एकूणच हे येणारे वर्ष अतिशय लाभदायक असणार आहे. तुम्ही जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. कारण तुमच्या राशीसाठी शनि हा अतिशय लाभदायक आहे. परदेशी आयात निर्यात व्यवसाय देखील तुम्ही करू शकता. तुम्हाला अनेक नवीन उत्पन्नाचे स्त्रोत मिळणार आहेत. त्यांचा तुम्ही नक्कीच चांगला फायदा घेऊ शकता. बुद्धी आणि कष्ट या जोरावर तुम्ही नक्कीच यश संपन्न करू शकता. तुम्हाला अनेक नवीन संधि मिळतील. आज पर्यत तुम्ही जी काही मेहनत घेतली आहे. त्याचे योग्य ते फळ तुम्हाला मिळणार आहे. मीन राशीच्या लोकांसाठी शनि अतिशय लाभदायक ठरणार आहे. हात लावले ती गोष्ट सफल होणार आहे.

Being Marathi

Related articles