ओ काका आमचा फोटो काढता का ? मरीन ड्राइव्हवर फिरायला गेलेल्या ठाकरे सरकारच्या मंत्र्याच्या हातात दिला मुलांनी मोबाइल .. जाणून घ्या कोण आहेत ते मंत्री

ओ  काका आमचा फोटो काढता का ? मरीन ड्राइव्हवर फिरायला गेलेल्या ठाकरे सरकारच्या मंत्र्याच्या हातात दिला मुलांनी मोबाइल .. जाणून घ्या कोण आहेत ते मंत्री

दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे . हे अधिवेशन सध्या आरोप प्रत्यारोप यांनी प्रचंड गाजत आहे. नवीन ठाकरे सरकारवर विरोधक म्हणजे फडणवीस तूफान ठिका करत आहेत. मंत्री मंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्या नंतर मंत्री – मंडळी देखील फिरण्यासाठी बाहेर जातात. काल मरीन ड्राइव्हव देखील असाच किस्स घडला.

इंदापूर चे आमदार सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्त भरणे आणि कोपरगावचे आमदार आशीतोष काळे हे मरीन ड्राइव्हवर फिरत होते. तेव्हा तिथे अनेक ग्रुप देखील फिरण्यासाठी आले होते. लहान मुले , अबला वृद्ध असे सर्व मस्त एंजॉय करत होते. मामा आणि काळे देखहील निवांत चर्चा करत फिरत होते. तेव्हा अचानक काही तरुण मुलांचा ग्रुप दत्ता मामांकडे आला आणि त्यांना म्हणाले ओ काका आमचा एक ग्रुप फोटो काढता का ? बहुधा त्यांनी मंत्री दत्त मामा भरणे यांना ओळखले नसावे. दत्ता मामा यांनी देखील अगदी कोणतीही ओळख न दाखवता त्यांच्या ग्रुपचा फोटो काढला.

दत्ता मामा जेव्हा ग्रुप फोटो काढत होते तेव्हा आमदार आशीतोष काळे यांना देखील मामा फोटो काढत असतानाच फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. काळे यांनी देखील मामांचा तो फोटो काढला आणि सोशल मिडीयावर पोस्ट करत एक पोस्ट देखील लिहिली. ती पोस्ट अशी होती. आशीतोष यांना मामांचा साधेपणा खूप भावला. सोशल मिडियावर देखील या फोटोची खूप चर्चा झाली. मामांचा हा साधेपणा सर्वांचा खूपच भावला.

आज विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मा.ना.श्री. दत्तात्रय भरणे मामा यांच्यासोबत मरीन ड्राईव्हला फेरफटका मारत असताना काही मुलांनी भरणे मामांना न ओळखता आमच्या ग्रुपचा फोटो काढता का म्हणून विचारणा केली. मामांनी लगेच त्या मुलांचा मोबाईल हातात घेऊन त्यांच्या ग्रुपचा फोटो काढला. त्यावेळी भरणे मामा मुलांचा फोटो काढत असताना त्यांचा फोटो काढण्याचा मोह मलाही आवरला नाही. महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याचे मंत्रिपद सांभाळणाऱ्या भरणे मामांचा साधेपणा मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला.

मोठी माणसे उगाच मोठी होत नाहीत. पदाचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा सामान्य माणसात सामान्य होऊन राहण्यात देखील मोठेपणा असतो. आदरणीय पवार साहेब यांच्याकडून ही गोष्ट नेहमी शिकायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेला प्रत्येक जण त्यांनी दिलेल्या विचारांनीच वाटचाल करत आहे यात शंका नाही.

AshutoshKale

Being Marathi