तुमच्या देवघरात असायला हवेतच हे देव – देवतांचे फोटो मग होतील अनेक लाभ

तुमच्या देवघरात असायला हवेतच हे देव – देवतांचे फोटो मग होतील अनेक लाभ

देवघर हा घरातील प्रत्येकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे देवघरात कोणत्या मूर्ती असाव्यात , कोणत्या नसाव्यात हे देखील तितकेच महत्वाचे आहे. कारण प्रत्येक मूर्ती आणि त्या पासून होणारे लाभ हे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत देवघरात कोणत्या मूर्ती असाव्यात आणि त्यांचे महत्व काय. तुमच्या देवघरात सर्वात महत्वाचे बाळकृष्णाची मूर्ती असावी. गणपती , सरस्वती ,, महालक्ष्मी यांच्या उभ्या मूर्ती असू नयेत.

त्यांच्या शक्यतो बसलेल्या आणि पूर्ण भरलेल्या मूर्ती असाव्यात. कोणत्याही मूर्ती आतून पोकळ असू नयेत. लक्ष्मी आणि कुबरे यांच्या मूर्ती देवघरात उत्तर दिशेला ठेवाव्यात. गणपतीचे वस्त्र हे शक्यतो पिवळ्या किंवा केशरी रंगाचे असावेत. घरात शिवलिंग ठेवू नये. त्या पेक्षा तुम्ही मूर्ती किंवा फोटो यांची पूजा करू शकता. सूरीदेवताचा फोटो किंवा मूर्ती न ठेवता त्यांची प्रतिमा ठेवावी म्हणजे ते अधिक लाभदायक असते. तुम्ही जर देवघरात रामाची मूर्ती ठेवणार असाल तर त्या सोबत सीता आणि हनुमान हे देखील असावे.

नारायनांची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीची देखील मूर्ती ठेवावी. काली मातेची विक्राळ रूप असलेली मूर्ती शक्यतो घरात ठेवू नये कारण ते शुभ मानले जात नाही. तुमच्या करता जर हनुमानाची मूर्ती असेल तर ती मूर्ती शक्यतो पर्वत उचलताना अशी असावी.देवघरात मूर्ती या जमिनीवर ठेवू नये. त्या खाली शक्यतो एखादे वस्त्र खाली अंथरावे. ते शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे असावे. तुम्ही जितक्या उत्तम रीतने कोणतीही गोष्ट कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील.

Being Marathi