Articles Celebrities Entertainment Featured

सुप्रसिद्ध खलनायक रणजितच्या प्रेमात वेडी झाली होती ही ,अभिनेत्री पण राजेश खन्ना यांनी केले त्यांचे ब्रेकअप

Sharing is caring!

बॉलीवुड आणि तेथील अफेअर्स हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. बॉलीवुडमध्ये अनेक ब्रेकअप आणि नवीन प्रेमप्रकरणं सुरू असतात. पण काही ब्रेकअपस खूपच लक्षात राहतात. असंच बॉलीवुडमधील एक ब्रेकअप खूप चर्चेत राहतात. बॉलीवुड मधील 80 च्या शतकातील खलनायक रणजीत त्या वेळेस प्रसिद्धीच्या शिखरावर होता. एकाहून – एक चांगले चित्रपट तो देत होता. पण त्यांचे सर्व रोल हे नेगटीव्हच होते.

त्यामुळे तो अनेकांना आवडत नसे. पण एक अभिनेत्री मात्र त्यांच्या प्रेमात प्रचंड वेडी झाली होती. ती अभिनेत्री दुसरी – तिसरी कोणी नसून राजेश खन्ना यांची मेव्हणी सिम्पल कपाडिया होय. सिम्पल रणजीत यांच्या प्रेमात अक्षरक्षा वेडी झाली होती. रणजीत हे एक उत्तम खलनायक होते. अनेक हिरॉईन्स त्यांना घाबरत पण सिम्पल मात्र त्यांच्यावर प्रेम करत. रणजीत यांच्या जन्म 12 नोव्हेंबर 1947 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यानी अनेक दिग्गज अभिनेत्या सोबत खलनायकांचे पात्र केले आहे. राजेश खन्ना यांच्या सोबत देखील रणजीत यांनी काम केले आहे.

सिम्पल यांना राजेश यांची प्रत्येक स्टाइल खूप आवडायची जसे की त्यांची केसांची स्टाइल असो किंवा बोलण्याची स्टाइल. राजेश खन्ना सिम्पल यांच्या बाबतीत खूपच पंजेसिव्ह होते , त्यांना रणजीत अजिबात आवडत नसे कारण रणजीत करत असलेल्या नकारात्मक भूमिकांची राजेश यांच्यावर देखील कोठे तरी वाईट छाप पडलेली असावी त्यामुळे राजेश यांना रणजीत आवडत नसे. त्यांनी सिम्पल यांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला , पण सिंपल मात्र काही केल्या समजावून घेतच नव्हती. एकदा तर या दोघांच्या प्रेमाच्या चर्चेना इतके उधाण आले की राजेश खन्ना यांना त्यांचा राग अनावर झाला. ते सिम्पलला खूप चिडले आणि ओरडले देखील. अनेक दिवस तिच्यावर अबोला देखील धरला होता. राजेश खन्ना आणि रणजीत यांनी एक चित्रपट छैला बाबू दरम्यान राजेश आणि रणजीत यांचे वाद फारच टोकाला गेले आणि मग शेवटी सिम्पल आणि रणजीत यांचे ब्रेकअप झाले.