घरात देवघर कोठे असावेत ? जाणून घ्या कोणती आहे योग्य दिशा आणि कोणत्या असाव्यात मूर्ती

घरात देवघर कोठे असावेत ? जाणून घ्या कोणती आहे योग्य दिशा आणि कोणत्या असाव्यात मूर्ती

घर म्हणजे सर्वांच स्वप्न असंत. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यभराची पुंजी लावून घर बांधतो त्या साठी अगदी पै – पै जमावतो. आणि शेवटी मेहनत फळाला येते आणि सुंदर घर बनून जातं. घरात काही जागा या असतात जसं की सर्वात प्रथम दिवाणखाना म्हणजे हॉल, हॉल सर्वांसाठी असतो त्या बरोबरच येणारे सर्व पाहुणे , बाहेरची लोक हे हॉलमध्ये बसतात. त्यामुळे हॉल शक्यतो मोठा असतोच. त्या नंतर स्वयंपाक घर त्या विषयी कितीही लिहिले तरी कमीच आहे. घरात सर्वाधिक वेळ जर कोठे महिला घालवीत असतील तर तो स्वयंपाक घरात. घरातील सर्वांचा आनंद पोटातून जातो आणि पोटाचा मार्ग स्वयंपाक घरातून जातो. पुढे बेडरूम म्हणजे प्रत्येकाची स्वताची स्पेस असते. त्या नंतर असते देवघर घर छोटे असो किंवा अगदी मोठे देवघर सर्वत्र असते. अगदी छोटे असो किंवा मोठे सर्वांची श्रद्धा जर कोठे असेल तर ती फक्त आणि फक्त देवघरात. मानसिक शांतीचा स्त्रोत म्हणजे देवघर. त्यामुळे तुमचे देवघर लहान असो वा मोठे पण ते योग्य जागेवर असावे. देवघरात कोणत्या मूर्ती असाव्यात. देवघरची रचना कशी असावी अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

स्वयंपाक घरातील देवघर – अनेकदा छोटे घर असते त्यामुळे देवघर बनविण्यासाठी वेगळी जागा नसते त्यामुळे देवघर शक्यतो स्वयंपाक घरात ठेवतात. त्यासाठी दोन कारणे असावीत , एक म्हणजे स्वयंपाक घरात फक्त घरातीलच लोकं जातात. या बरोबरच तेथे चांगली सफाई ठेवली जाते. हॉलमध्ये बाहेरच्या लोकांचा वावर देखील अधिक असतो. त्यामुळे तेथे आपण देवघर ठेवत नाही. जर तुमच्या घरात पुरेशी जागा नसेल तर तुम्ही तुमचे देवघर किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकता. कारण देवाच्या ज्या ईश्वरी शक्ती असतात त्या या कोपऱ्यातून असतात. त्यामुळे देवघर ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. देवघर पश्चिम – दक्षिण कोपऱ्यात नसावे कारण तेथून ईश्वरी शक्ती बाहेर जातात. देवघर शक्यतो अशा जागेवर असावे जेथे सूर्य प्रकाश किमान काही काळ तेथे असेल. कारण असे मानले जाते की ज्या घरात सूर्यप्रकाश जास्त असतो तेथील दोष हे आपोआप दूर होतात.ज्या घरात उत्तम सूर्यप्रकाश असतो त्या घरातील नकारात्मकता आपोआप कमी होते आणि सकारात्मकता वाढीस लागते. दिवा हा नेहमी आग्नेय कोपऱ्यात असावा किंवा लावावा तर उदबत्ती ही नेहमी वायव्य कोपऱ्यात असावी. देवघरात पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाची मार्बरल बसवावी म्हणजे संगमरवरी बसवावी. त्यामुळे देखील चांगली सकारात्मकता येते.

देवघरातील मूर्ती – देवघरात मूर्ती कोणत्या असाव्यात. त्यांचे तोंड कोणत्या दिशेने असावे असे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. देवघरातील देवाचे फोटो हे शक्यतो दक्षिण भिंतीला लावू नयेत. घरात खूप सारे देवाचे फोटो असू नयेत. देवघरासमोर तिजोरी नसावी अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो. पूजा – अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपला खूप पसारा असतो , मोठी अडगळ करतो आपण जसे की सुकलेल्या फुलांच्या माळा. काडीपिटी इतर साहित्य पण हे सर्व चुकीचे आहे. देवघरावर अशा वस्तु ठेवू नयेत. प्राचीन मूर्तीनचे भग्न अवशेष देखील येथे ठेवू नये. जास्त फोटो , जास्त मूर्ती किंवा एका देवाचे डबल फोटो किंवा मूर्ती असू नयेत. जसे की अनेकदा गणपतीच्या आपल्याकडे अनेक मूर्ती असतात कारण अनेकजण आपल्याला गणपती भेट देखील देतात. तुम्ही सर्व मूर्ती देवघरात ठेवू नका काही मूर्ती तुम्ही वेगळ्या जागेवर ठेवा. कुलदेवीचा टाक, मूर्ती अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंच धातूची असावी.सर्व मूर्तीची तोंडे ही पश्चिमेस असावीत म्हणजे पूजा करण्यास ते बसतात त्यांचे तोंड बरोबर पूर्वेस होईल.शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे असावे तर शंखरांच्या पिंडीचे टोक उत्तरेकडे असावे. पूजा घराला उंबरा असावा त्या बरोबरच तोरण देखील असावे.

देवघरात शिवलिंग ठेवावे का ? देव घरात शिव लिंग शक्यतो ठेवू नयेत असे म्हटले जाते पण जर ठेवायचे असेल तर अंगठ्या इतके शिवलिंग असावे त्याहून अधिक मोठे शिवलिंग असू नये. तसेच अनेक मुरट्या देखील ठेवू नयेत. कारण त्यांची तितकी काळजी घेतली जातं नाही. देवघरात चमड्यांच्या वस्तु ठेवू नयेत. कारण त्या वस्तु या प्राण्यांच्या चमड्या पासून बनविलेल्या असतात. चप्पल , बूट , बॅग या वस्तु शक्यतो देवघरात ठेवू नये. त्यांचे पावित्र्य राखले जावे. जर तुमच्या घरात पुरेशी जागा असेल तर शक्यतो देवाला लागणारे सामना सोडून इतर सामान तेथे ठेवू नये. उलट तेथे तुम्ही सुंदर वातावरण निर्मिती करून ध्यान साधना करू शकता. ध्यान . चिंतन , मनन करावे. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत ते दुसरीकडे पश्चिमेस लावावेत. पूजेशी संबंधित सामान फक्त देवघरात ठेवावे. जसे की काही धार्मिक पुस्तके , कापुर. उदबत्ती , देवाचे काही कपडे, दिवे , तेल , तूप, असे काही मोजके सामान देवघरात ठेवावे. अनावशक फोटो आणि सामान तेथे ठेवू नये.

देवघरात काय करू नयेत – देवघरात शंकरांची मूर्ती असू नये. तसेच शनीची देखील पूजा देवघरात करू नये. या बरोबरच मारुतीची देखील पूजा देव घरात करू नये. मारुतीचे फोटो तुम्ही घरात इतरत्र कोठेही लावू शकता पण देवघरात शक्यतो. त्याची पूजा करू नये. देवघरात गायत्री मातेची देखील पूजा करू नये. गुरु शिष्य यांनी देखील देवघरात एकत्र पूजा करू नये. एका देवाचे दोन फोटो किंवा दोन मूर्ती असू नयेत. जर एक फोटो आणि एक मूर्ती असेल तर चालू शकते.

देवघर साफ असावे – देव घर नेहमी साफ सूत्रे असावे. देवाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य जसे की तेल , तूप,अगरबत्ती हे सर्व जागेवरच असावे. त्यासाठी काही कप्पे देखील बनवावेत. देवघराच्या जवळ नेहमी एक नॅपकिन ठेवावा. त्या बरोबरच तेथे हवा देखील थोडीशी खेळती असावी. जागेच्या अभावामुळे आजकाल देवघर वरती टांगांवे लागते पण त्याचा फारसा काही परिणाम होतं नाही. शेवटी देवाची मनोभावे पूजा करणे गरजेचे असते. शक्यतो प्रत्येक घरात देवघर असावे यामुळे प्रचंड सकारात्मकता येते. वातावरण देखील प्रसन्न आणि आनंदी राहते.

Being Marathi