धर्मेंद्र शूटिंगच्या वेळेस ‘या’ कारणामुळे कांदा खाऊन येत असे, शेवटी वैतागून ‘या’ अभिनेत्रीने…

बॉलीवुडमध्ये एक चित्रपट बनतो. तो प्रदर्शित होतो. बरंच काही घडत. वर्षानुवर्ष तो चित्रपट अगदी आपल्या हदयाच्या जवळ राहतो. त्यातील डायलॉग , त्यातील गाणी , हीरो हिरॉईयनिस सर्व काही लक्षात राहत. जसं आपल्या प्रेक्षकांच्या लक्षात असंत अगदी तसंच किंवा त्याहून अधिक त्या कलाकारांच्या लक्षात असंत. चित्रपट बनतो , त्यांच्या मेकिंगच्या अनेक घटना असतात. अनेक किस्से असतात आणि ते प्रचंड गाजतात.
चित्रपटांचे हे किस्से नंतर मात्र एखाद्या रिअलिटी शो मधून किंवा चॅट शो मधून समोर येतात. असेच काही किस्से सध्या धर्मेंद्र यांनी एका शोमध्ये शेयर केले आहेत. आशा पारेख आणि धर्मेंद्र यांनी काही चित्रपटात एकत्र काम केले होते. आशा पारेख या त्या काळातील एक नावाजलेली आणि प्रसिद्ध अशी अभिनेत्री होती. त्यानी अनेक हीट सिनेमे दिले आहेत.
आशा पारेख यांची प्रत्येक फिल्म ही सुपरहिट होत असे. त्यामुळे धर्मेंद्र त्यांना जुबली पारेख म्हणून बोलवत. 1966 मध्ये फिल्म ‘आए दिन बहार के हा चित्रपट आशा आणि धर्मेंद्र आणि एकत्र केला. तेव्हा ते दार्जीलिंग मध्ये शूटिंग करते होते. शूटिंग संपल्यानंतर काही प्रोड्यूसर्स आणि क्रू मेंबर एकत्र येऊन पार्टी करत. तेव्हा धर्मेंद्र प्रचंड दा रू पित.
सकाळी शूटिंग करताना दा रूचा वास येऊ नये म्हणून. धर्मेंद्र भरपूर कांदा खात. शूटिंग चालू झाले की आशाजी आणि धर्मेंद्र एकत्र शॉट देत असताना आशाजी यांना कांद्याचा प्रचंड वास येत. तरीही त्या सहन करत पण एक दिवस त्यांना राहवलेच नाही. त्यांचे दिग्दर्शक यांच्याकडे तक्रार केली. धर्मेंद्र यांनी आशाजी यांच्याकडे स्वताची चूक मान्य केली. आणि यापुढे दा रू पिणार नाही अशी कबुली दिली.
आशाजी यानी धर्मेंद्र यांच्याकडून एक वचन घेतले , जर धर्मेंद्र यांनी जर सेटवर दा रू प्यायले तर त्या शूटिंग अर्ध्यावर सोडून जातील. त्या नंतर धर्मेंद्र यांनी तो चित्रपट पूर्ण होईपर्यंत एकदा ही दारु.ला हात लावला नाही. ते जेथे शूटिंग करत होते , तेथे प्रचंड थंडी होती अनेकदा त्यांना दा रू देखील ऑफर केली जातं पण धर्मेंद्र यांनी हात देखील लावला नाही. एकदा तर एका गाण्यांचे शूटिंग सुरू होते , ते गाणे संपूर्णता पाण्यात शूट होणार होते.
धर्मेंद्र यांना परफेक्ट शॉट देण्यासाठी अनेकदा पाण्यात जावे लागले. शेवटी ते पाण्यात भिजून – भिजून काळे निळे पडले. त्यानं त्या वेळेस दा रू ऑफर करण्यात आली पण त्यानी त्याला देखील हात लावला नाही. अशा प्रकारे धर्मेद्र यानी दिलेले वचन पाळले. आशा पारेख देखील या गोष्टीला कबुली दिली. धर्मेंद्रने मला दिलेलं प्रॉमिस पाळले. यासारखे दुसरे काही महत्वाचे नाही. गेल्या वर्षीपासून धर्मेंद्र कुठेच दिसत नाहीत. सर्व प्रेक्षकांना यांचे उत्तर मिळाले धर्मेंद्र . त्याच्या शेतीवर तो मेहनत करत आहे.