चारोळी चे सेवन केल्यामुळे मिळतात ‘हे’ 9 फायदे, जाणून घ्या…

चारोळी चे सेवन केल्यामुळे मिळतात ‘हे’ 9 फायदे, जाणून घ्या…

भारतीय व्यंजने ही संपूर्ण जगभरात खूप प्रसिद्ध आहेत.भारतामधील निरनिराळ्या भागांमध्ये खीर हा गोड पदार्थ खूप वेगळ्या प्रकारे बनवला जातो आणि आवडीने खाल्ला सुद्धा जातो. खीर हा एक पौष्टिक असा पदार्थ आहे ज्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या सुक्‍या मेव्याचा वापर केला जातो .या सुक्यामेव्याच्या मध्ये  चारोळी हा एक सुक्यामेव्याच्या प्रकार सजावटीसाठी वापरला जातो .

चारोळी चा वापर हा केवळ सजावटीसाठी नसून त्या पदार्थाचे पोषण मूल्य वाढविण्यासाठी सुद्धा आहे .चारोळीचे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदे होतात .त्यामध्ये वजन कमी करण्यापासून ते प्रजनन संस्था अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी देखील चारोळीचा उपयोग होऊ शकतो. चारोळी ही भारतीय उपखंडामध्ये मूलतः उत्पादित केली जात असून चारोळी हा एक महाग पदार्थ मानला जातो. आज आपण चारोळीचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत.

1) चारोळी ही निसर्गत: हा शितल गुणधर्म असलेला पदार्थ मानली जाते. चारोळी चा वापर हा विविध पदार्थांमध्ये यासाठी केला जातो जेणेकरून आपल्या शरीरातील अतिरिक्‍त उष्णता शमवली जाईल व शरीराचा दाह कमी होऊन शरीराला थंडपणा प्राप्त होईल. पूर्वीच्या काळी शरीराची उष्णता दूर करणे आणि घामोळ्या पासून बचाव करण्यासाठीच्या औषधांमध्ये चारोळीचा वापर केला जात असे.

2) चारोळीचे सेवन करण्यासोबतच चारोळीची बारीक पूड करून तिचा फेस पॅक सारखा ही वापर केला जाऊ शकतो.चारोळीचा फेस पॅक चेहर्‍याची कांती उजळण्यासाठी सोबतच चेहऱ्यावरील डाग आणि काळवंडलेपणा दूर करण्यास सहाय्य करतात. चारोळी पासून तेल सुद्धा काढले जाते या तेलाने चेहऱ्याला मालिश केली असता अक्ने व तारुण्यपीटिका पासून सुटका मिळते. चारोळीची पूड दही, लिंबू, बेसन पीठ यामध्ये एकत्र करून चेहऱ्याला लावले असता निश्चितच काही काळानंतर त्वचेचा पोत सुधारला याचे दिसून येते.

3) चारोळीचा उपयोग हा आपल्या पचन प्रक्रिया वरही खूपच प्रभावी रीत्या होऊ शकतो.चारोळीच्या या सेवनामुळे पोटामधील दाह कमी होतो आणि डायरीयासारख्या आजारांवर ही चारोळी खूपच गुणकारी ठरते. चारोळी मध्ये एस्ट्रिंजंटसारखे गुणधर्म असतात ज्यामुळे डायरिया चा त्रास होत असेल तर मल रोखून धरण्यास सहाय्य मिळते.

4) चारोळी मुळे प्रजनन क्षमता वाढवण्यास सहाय्य मिळते.‌चारोळी मध्ये जे गुणधर्म असतात त्यामुळे काम जीवनाशी निगडित समस्यांपासून सुटका होते. कामेच्छा वाढवण्यास चारोळीचे सेवन करणे खूपच फायदेशीर ठरते.

5) सर्दी पासून आराम मिळण्यासाठी चारोळी पासून बनवलेले तेल वापरले जाते.सर्दी मध्ये जेव्हा नाक चोंदते आणि श्वास घेण्यासही त्रास होतो अशा वेळेला कपड्यांमध्ये चारोळीचे तेल एक ते दोन थेंब सोडले असता लगेच आराम मिळतो.

6) वजन कमी करण्या मध्ये सुद्दा खूपच गुणकारी ठरते. चारोळी मध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे वारंवार खाण्याची इच्छा निर्माण होत नाही. चारोळी मध्ये जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क हे मुबलक प्रमाणात असतात.चारोळीमध्ये नायासिन यांचाही समावेश असतो यामुळे वजन कमी करण्यास सहाय्य मिळते.या व्यतिरिक्त चारोळी मध्ये मॅग्नेशियम ,फॉस्फरस आणि कॅल्शियम यांचा सुद्धा साठा असतो म्हणूनच आपल्या आहारातील खीर, हलवा ,शिरा यांसारख्या पदार्थांमध्ये चारोळी चा समावेश अवश्य करावा.

7) चारोळी मध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. मात्र प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते यामुळे आपल्या शरीराची प्रथिनांची गरज भागवण्या करता चारोळी हा उत्तम पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्तींना अशक्तपणा जाणवतो त्यांनी दुधामध्ये चारोळीचे सेवन करावे.

8) चारोळी मध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम आणि  फास्फरस असते. मॅग्नेशियम मुळे आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहते तर फॉस्फरस हे शरीरातील हाडे आणि दातांच्या वाढ आणि विकासासाठी खूप आवश्यक असते. त्यामुळे चारोळी मधील फास्फरस द्वारे शरीरातील हाडांची आणि दातांची आरोग्यही नीट ठेवले जाते.

9) चारोळीचे केवळ बी नव्हे तर चारोळीचे झाडाची पाने, मूळ फांद्या ही सर्वच आरोग्यदायी मानली जातात.चारोळीच्या झाडाच्या पानांद्वारे मधुमेहावर उपाय केला जाऊ शकतो असे काही सर्वेक्षणांमध्ये सिद्ध झाले आहे.

beingmarathi