‘या’ कारणांमुळे लग्नानंतर वाढते नवविवाहित जोडप्यांचे वजन, ‘हे’ आहे खर कारण …

‘या’ कारणांमुळे लग्नानंतर वाढते नवविवाहित जोडप्यांचे वजन, ‘हे’ आहे खर कारण …

नवविवाहित जोडप्याचे त्यांचे नव्या नवलाईचे दिवस संपतात, ओढ संपते तेव्हा जेव्हा लग्नानंतर वाढू लागलेल्या वजनाची जाणीव होऊ लागते. नव्याने विवाह झालेल्या जोडप्यांचे त्यांच्या वजनामध्ये झपाट्याने वाढ होते असे दिसून येते. काही जोडप्यांच्या वजनामध्ये अशी वाढ झालेली दिसून येत नाही मात्र बहुतांश जोडप्यांमध्ये लग्न झाल्यावर वजन का वाढते यामागची कारणे जाणून घेऊया.

एकत्रितपणे सर्व कार्य करणेः नवविवाहित जोडप्यांमध्ये सगळा वेळ एकत्र घालवण्यात प्राधान्य दिले जाते. अशावेळी नव्याने लग्न केलेली जोडपे सर्व कामे एकत्र करत असतात.या मध्ये खाणे पिणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो आणि लग्न झालेली जोडपी एकमेकांसोबत एकत्रितपणे खातात अशावेळी आपल्या जोडीदाराच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा प्रभाव परस्परांवर पडतो.त्यामुळेच जेव्हा नवीन लग्न होते तेव्हा आपल्या जोडीदाराच्या खाण्याच्या आग्रहाला टाळता येत नाहीये त्यामुळे बऱ्याचदा बाहेर खाणे, वेळी-अवेळी बाहेरून ऑर्डर करून खाणे, चमचमीत खाणे ,गोड पदार्थ खाणे यांसारख्या वजन वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात घडतात.

नवीन लग्न झाल्यावर बऱ्याच वेळा पतीच्या वजनात ही वाढ झालेली दिसून येते याचे कारण म्हणजे नवीन लग्न झालेले असताना पत्नी आपल्या पतीचे वरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आपले पाककौशल्य पणाला लावते व यातूनच बऱ्याचदा गोड पदार्थ व तेलकट पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवले जातात व ते आपल्या पत्नीवरील प्रेमापोटी पतीला खावेच लागतात व यामुळे अनावश्यक फँट शरीरात जाऊन वजन वाढते.

लग्नानंतर आलेल्या नवीन जबाबदाऱ्या, कर्तव्य यांच्यामुळे बर्‍याचदा पती आणि पत्नी या दोघांवरही दबाव किंवा तणाव असतो.त्यामुळे या तणावातून मन हलके करण्यासाठी खूपदा आपल्या विचारांना दूर सारण्यासाठी गोड पदार्थ खाल्ले जातात यातूनच भूक नसतानाही असे पदार्थ खाल्ले गेल्यामुळे वजन वाढते.

आपल्या समाजव्यवस्थेमध्ये अविवाहित मुलं आणि मुलींना लग्न जमेपर्यंत फिट राहण्यास भाग पाडले जाते. विवाह जुळेपर्यंत तरुण आणि तरुणी दोघेही आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी ,व्यायाम यांच्याकडे खूप जास्त लक्ष देतात. किंबहुना लग्न जमल्यानंतर ही आपल्या भावी पती किंवा पत्नी ला आकर्षित करण्यासाठीसुद्धा फिटनेस कडे लक्ष दिले जाते. मात्र विवाह झाल्यानंतर जणूकाही या सर्व बंधनातून मुक्तता झाल्याप्रमाणे काही जोडपी आपल्या फिटनेस कडे कानाडोळा करू लागतात व परिणामी वजन वाढते.

लग्न झाल्यानंतर देखील आधुनिक काळात पती आणि पत्नी दोघेही सुद्धा नोकरी करत असतात. अशा वेळी विरंगुळ्याचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणजे टीव्ही पाहत एकत्र वेळ घालवणे होय व सध्याच्या काळामध्ये टीव्ही बघताना जंक फूडचे सेवन करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.टीव्हीसमोर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणे व शरीराला फारशी हालचाल नसणे यामुळे वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो.

 शारीरिक संबंध हे नवविवाहीत जोडप्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोनल बदल घडून येतात व या हार्मोनल बदलांमुळे  सुद्धा खूपदा वजन वाढू शकते. विवाहानंतर आपल्या जोडीदारासोबतचे संबंध हे आनंदी तणावविरहित असतील तर ऑक्सिटोसिन  हे संप्रेरक स्त्रवते यामुळे वजन वाढीस चालना मिळते.

विवाह नंतर वजन वाढीला आळा घालण्यासाठी काही छोट्या-छोट्या टिप्सचे पालन करणे खूपच फायदेशीर ठरते. अशाच काही टिप्स  आज आपण पाहणार आहोत.

  • लग्नानंतर वजन नियंत्रणात ठेवणे आणि फिटनेस राखणे हे केवळ बाह्य सौंदर्य आकर्षक दिसण्यासाठी नव्हे तर आपल्या सर्वांना आरोग्याच्या एक आवश्यक दिनक्रम म्हणून पाळण्यास पती आणि पत्नी दोघांनी एकमेकांना प्रोत्साहन द्यावे व यासाठी पोषक आहार घेण्यास प्राधान्य द्यावे.
  • जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवण्यासाठी केवळ टीव्ही बघणे किंवा एकत्र जेवण करणे या गोष्टी व्यतिरिक्त ज्या कार्याद्वारे शारीरिक हालचाल घडू शकते अशा व्यायाम प्रकारांना एकत्र जाणे कपल गोल होऊ शकते.उदाहरणार्थ योगासनांचा क्लास जोडीदारासोबत जाऊन चांगल्याप्रकारे करता येऊ शकतो.
  • सुट्टीच्या दिवशी एकमेकांच्या आवडीच्या जागी  ट्रेकला जाणे ,पळणे किंवा एखाद्या खेळा मध्ये सहभागी होण्यासारख्या साहसी कार्यामध्ये सहभाग घेतला जाऊ शकतो.

beingmarathi

Related articles