विवाहित पुरुषांसाठी ‘हे’ फळ आहे वरदान,नियमित सेवन केल्यास मिळतात ‘हे’ फायदे…!

अंजीर हे अगदी प्राचीन काळापासून खाल्ले जाणारे फळ आहे.अशा दंतकथा सुद्धा सांगितल्या जातात की ऍडम आणि इव्ह यांनी सर्वप्रथम खाल्लेले फळ सफरचंद नव्हते तर ते अंजीर होते.क्लिओपात्रा चे सर्वात आवडीचे फळ म्हणजे अंजीर होय.इतक्या प्राचीन काळापासून इतके लोकप्रिय आणि आवडीचे हे फळ नक्की का खाल्ले जाते याचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.
ताजे अंजीर हे जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये उपलब्ध असतात तर वाळवलेले किंवा सुकलेले अंजीर वर्षभर कोणत्याही हंगामात सहजपणे उपलब्ध होते.अंजिर या फळाची गोड चव आणि त्याच्या अगदी सहजपणे पचन होणयाच्या गुणधर्मामुळे सर्वच वयोगटातील व्यक्तींना खाण्यासाठी हे फळ योग्य असते.अंजिराच्या फळातील गराचा मऊपणा आणि बियांचा कडकपणा यामुळे खाण्यामध्ये वेगळीच चव निर्माण होते.
१) बद्धकोष्टते पासून सुटका :- अंजिर हे बद्धकोष्टता आणि एकंदरीतच पचनसंस्थेच्या विकारांवर अतिशय प्रभावी असे फळ मानले जाते.बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून दोन ते तीन अंजिर रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालावीत व सकाळी मधासोबत ही अंजीर खावीत यामुळे बद्धकोष्ठतेपासून कायमची सुटका होते.अंजिरा मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात.फायबर मुळे शरीरातील मलनिस्सारण याच्या प्रक्रियेला सहजगत्या मार्ग उपलब्ध होतो.आतड्यांच्या हालचालीसही सहाय्य मिळते.अपचन यासारख्या विकारांवर सुद्धा अंजिरा मुळे आराम मिळतो व पचनसंस्थेला थंडावा प्राप्त होतो.अतिरिक्त खाण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी अंजिराचे सेवन अवश्य करावे यामुळे आपल्या पचनक्षमते पेक्षा जास्त अन्नाचे सेवन करण्यास रोखले जाते.
२) ह्रदय विकारांवर प्रभावी उपाय :- ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अंजिराचे सेवन अवश्य करावे.अंजिराचे सेवन केल्यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराईड ची पातळी वाढण्यापासून प्रतिबंध केला जातो.ट्रायग्लिसराईड च्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे रक्ताभिसरणाशी निगडित धमन्यांना रक्ताभिसरण यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या घटकांपासून बचाव केला जातो.कोलेस्टेरॉलचे प्रमाणही अंजिराचे सेवन केल्यामुळे नियंत्रणात राखले जाते.अंजीरमध्ये अँटीऑक्सीडेंट मुबलक प्रमाणात असतात.तसेच अंजीर मध्ये असलेल्या फेनोल आणि ओमेगा-3 आणि ओमेगा सिक्स मुळे हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.
३) कोलेस्टेरॉल निर्मिती स प्रतिबंध :- अंजीरमध्येअसलेल्या पेस्टीन या पाचक फायबर च्या मुबलक प्रमाणामुळे पचनसंस्थेमध्ये कोलेस्टेरॉल या निर्मितीला नियंत्रणात ठेवले जाते. पचनसंस्थेमध्ये कोलेस्टेरॉलच्या अतिरिक्त प्रमाणामुळे निर्माण होणारा धोका दूर होतो.अंजीर मध्ये असलेल्या बी,सी या जीवनसत्वामुळे अतिरिक्त कोलेस्टेरॉलच्या निर्मितीवर निर्बंध घातले जातात तसेच हार्मोनच्या हार्मोनच्या निर्मितीमुळे व्यक्तीचा मूड चांगला राहतो व त्यामुळे कोलेस्टेरॉलच्या निर्मितीस आळा घातला जातो.
४) मधुमेहावर गुणकारी :- केवळ अंजीर च नाही तर अंजिराच्या झाडाची पाने सुद्धा खूप आजारांवर गुणकारी असतात. विशेषतः मधुमेहाचि त्रास असलेल्या व्यक्तींसाठी अंजिराच्या झाडाची पाने खूपच उपकारी ठरतात.अंजिराच्या पानांचा काढा करून दिला असता शरीरातील ग्लुकोज आणि साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
५) अंजीर मध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम,पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक असतात.कॅल्शियम,पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम हे बळकट हाडे आणि हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असतात.कॅल्शियम मुळे हाडांना मजबूत बनवण्या सोबतच हाडांची घनता वाढविण्यासही सहाय्य मिळते.हाडांना मोडण्या पासूनही या घटकांच्या सेवनामुळे रोखता येते.शरीरातील व हाडांमधील कॅल्शिअमचे प्रमाण जसजसे वय वाढत जाते तसे कमी होते म्हणूनच अंजीर हा कॅल्शिअमचा एक परिपूर्ण असा स्त्रोत मानला जातो.अंजीर मध्ये असलेल्या पोट्याशियम मुळे मूत्र विसर्जन ना द्वारे शरीरातील कॅल्शिअमचे निघून जाणे रोखले जाते.
६) सध्याच्या धावपळ आणि दगदगीच्या आयुष्यामध्ये उच्च रक्तदाबाच्या समस्या खूप कमी वयातच निर्माण होतात.अंजीर मध्ये असलेल्या फायबर मुळे उच्च रक्तदाबाच्या समस्यांपासून बचाव होतो.अंजीरमध्ये असलेल्या पोटॅशियम ओमेगा-3 आणि ओमेगा सिक्स मुळे रक्तदाबाचे प्रमाण स्थिर राखण्यासाठी साहाय्य मिळते.
७) शरीरामधील सोडियम आणि पोटॅशियम चे संतुलन राखणे तनाव विरहीत आयुष्य जगण्यासाठी खूप आवश्यक ठरते. सोडियम आणि पोटॅशियम चे प्रमाण संतुलित राखण्यास अंजीर मदत करते.कारण अंजीर मध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते.शरीरामधील सोडियम आणि पोटॅशियम चे संतुलन योग्य प्रकारे राखले गेले असता हायपरटेन्शन सारख्या समस्या निर्माण होत नाहीत.
८) जगभरातील काही समुदायांमध्ये अंजिर या फळाला प्रजनन क्षमतेचे प्रतीक मानले जाते.याला कारण म्हणजे अंजिरा मध्ये लैंगिक क्षमतेला उत्तेजन देणारे अ टेसँटेस्टेराँन व इस्ट्रोजन हे संप्रेरके सक्रिय करण्यासाठी आवश्यक असलेल्या पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांचे प्रमाण अंजिरा मध्ये खूप जास्त असते.त्यामुळे अंजिराचे सेवन आपली लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी नक्की करावे. प्रजननक्षमते मध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या समस्यांवर उपाय करण्यासाठी दोन ते तीन अंजिरे रात्रभर दुधामध्ये भिजत घालावीत व सकाळी अनाशा पोटी सेवन करावीत.
९) श्वासोच्छ्वासाशी निगडित आजारांवर सुद्धा अंजीर खूप प्रभावी ठरते. अस्थमाचा त्रास अंजिराच्या सेवनाने मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.यासाठी मध आणि अंजिराचे एकत्रितपणे सेवन सकाळी उठल्याबरोबर करावे.घसा दुखत असेल तर अंजिराचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.यामुळे घशाच्या दुखण्यावर त्वरित आराम मिळतो.घशावर सूज असेल तरीसुद्धा अंजिराच्या दुधाचे सेवन करावे यामुळे सूज कमी होण्यास सहाय्य मिळते.टॉन्सिल सारख्या आजारांमुळे घशाला व मानेला दुखत असेल तर ज्या ठिकाणी वेदना होत आहेत अशा ठिकाणी अंजिराची पेस्ट करून ती लावावी वेदनांवर त्वरित आराम मिळतो.
१०) अंजिरा मध्ये जीवनसत्व सुद्धा मोठ्या प्रमाणात असते.जीवनसत्त्व अ हे डोळ्यांचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते.त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अंजिराचे सेवन अवश्य करावे.लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अंजीर खूपच गुणकारी आहे.
११) हृदयाच्या आरोग्यासाठी अंजीर उपयुक्त ठरते.यक्रुतामधील विषद्रव्ये बाहेर पडण्यासाठी अंजीर साहाय्य करते.अंजिरा मध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट मुळे यकृताचे कार्य प्रभावीपणे चालू राहते व शरीरातील नकोशी असलेली विषद्रव्य शरीराबाहेर पडून अन्य समस्यांपासून सुटका मिळते.
१२) मुळव्याध हा अत्यंत वेदनादायी आणि त्रस्त करणारा आजार आहे. अंजिराच्या बियांमध्ये मूळव्याधीला बरे करण्याचे गुणधर्म असतात.म्हणूनच मूळव्याधीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी कोरडे अंजीर साधारण 12 तास पाण्यामध्ये भिजत ठेवावेत व सकाळी आणि रात्री झोपण्याअगोदर असे दोन वेळा नियमितपणे अंजिराचे सेवन करावे.अंजीर भिजत घातलेले पाणी सुद्धा घ्यावे यामुळे गुद्वारावर येणारा ताण कमी होतो व मूळव्याधीमुळे होणारा रक्तस्राव सुद्धा नाहीसा होतो.
१३) आरोग्यविषयक समस्या नसताना अचानक आपल्याला थकवा आल्यासारखे वाटते.कोणतेही काम करण्यासाठी ताकद उरली नाही असे वाटू लागते.अशा वेळी शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता भासते.शरीरामधील ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी अंजीर हा एक अतिशय विश्वासार्ह स्रोत आहे.कारण अंजीर मध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट आणि नैसर्गिक शर्करेच्या रूपात शरीराला आवश्यक ती ऊर्जा योग्य प्रमाणात मिळते व थकवा दूर होतो.