पपईच्या बिया ने होतात अनेक आरोग्यदायी फायदे; कर्करोगासारख्या आजाराशी लढायची मिळते ताकद!!

पपईच्या बिया ने होतात अनेक आरोग्यदायी फायदे; कर्करोगासारख्या आजाराशी लढायची मिळते ताकद!!

पपई या फळाचे जितके फायदे आहेत तेवढे जास्त त्याच्या सालीचे आणि बियाचे फायदे होतात. कर्करोगासारख्या आजारापासून मुक्ती मिळणे कठीण असते. मात्र, त्या आजाराशी लढण्यासाठी लागणारी ताकद यामुळे आपल्याला मिळू शकते.

पचनक्रियेच्या बाबतीत असणाऱ्या कोणत्याही समस्या ह्या पपईमध्ये असणाऱ्या अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे बऱ्या होतात. पपईच्या बिया जर तुम्ही खाल्ल्या किंवा त्याची भुकटी बनवून पाण्यात घेतली तर, तुम्हाला पचनक्रियेस संबंधित असणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

लिव्हर कमजोर आहे असे वाटत असल्यास, पपई च्या बिया मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून नियमितपणे प्या याने लिव्हरची ताकद वाढते.

फुप्फुसाचा कर्करोग, किंवा प्रोस्टेटचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग या कर्करोगाचे दोन हात करण्याची ताकद या बिया आपल्याला देतात. जे लोक निरोगी आहेत त्यांनी देखील या बियांचे सेवन केले तर, कर्करोग होण्याची शक्यता हळूहळू कमी होते.

त्वचेवर कोणत्याही प्रकारची जळजळ किंवा सूज असेल तर, या बिया आराम देतात. अंतीबॅक्टरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने या बियांचे तेल किंवा रस आपल्याला थंडावा पोहोचवतात.

Being Marathi