केली खाऊन झाल्यावर साल फेकत असाल तर थांबा, साल फेकण्याआधी सालीचे ‘हे’ फायदे वाचून चकित व्हाल..!

केली खाऊन झाल्यावर साल फेकत असाल तर थांबा, साल फेकण्याआधी सालीचे ‘हे’ फायदे वाचून चकित व्हाल..!

निरनिराळ्या हंगामांमध्ये निरनिराळ्या प्रकारची फळे ही जगभरामध्ये पिकवली जातात. या प्रत्येक फळाचे आपल्या शरीरासाठी काही विशिष्ट असे फायदे असतात.केळी हे एक बाराही महिने पिकवणारे पिकवले जाऊ शकणारे फळ आहे. केळीचे सुद्धा आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. केळी हा कॅल्शियम,पोटॅशियम, मॅग्नेशियम यांचा अतिशय समृद्ध असा स्त्रोत आहे. त्यामुळे शरीरातील कॅल्शियमची गरज भागून हाडे आणि दात मजबूत होण्यास साहाय्य मिळते.

बद्धकोष्ठते सारख्या त्रासापासून मुक्तता मिळते. पचनासाठी मदत मिळते .केळीचे फळ शरीराचे स्वास्थ्य निरोगी राखण्यासाठी अवश्य सेवन करावे. मात्र केळीचे फळच नाहीतर केळीची पाने ,केळीचा खांब आणि केळीच्या सोललेल्या सालापासून सुद्धा आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात हे ऐकले तर नक्कीच आश्चर्य वाटेल म्हणूनच आज आपण केळी खाल्ल्यानंतर राहिलेल्या सालापासून आपल्याला काय फायदे होऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.

1) केळाची साल चेहऱ्यावर घासल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर होतात.
2) डोळ्यांवरील सूज आणि काळी वर्तुळे कमी होण्यासाठी डोळे बंद करून त्यावर केळ्याची साल ठेवावे. चेहऱ्यावरील ओलावा कायम ठेवण्यासाठी माश्चरायजर म्हणून केळाच्या सालाचा वापर केला जाऊ शकतो.

3) केसांच्या आरोग्यासाठी सर्व नैसर्गिक उत्पादने वापरण्यावर भर द्यावा असे सांगितले जाते. केळीच्या सालाचा वापर केसांसाठी नैसर्गिक मास्क म्हणून खूपच प्रभावी ठरतो असे सांगितले जाते त्यासाठी केसांवर केळीचा सालाला लावावे यामुळे केसांचा पोत सुधारतो असा दावा संशोधकांकडून केला जातो.

4) दातांवर पिवळे पणा येणे,दातां वर डाग पडणे यांसारख्या समस्या जंक फूड चे सेवन, धूम्रपान या सवयींमुळे वारंवार उद्भवत आहेत. दातांच्या समस्यांवर उपाय करण्यासाठी आणि हिरड्यांना मजबूत करण्यासाठी केळ्याची साल घासण्याचा सल्ला दिला जातो.

5) केळीचृया साली मध्ये असलेल्या हायड्रोजनच्या गुणामुळे अतिनील किरणांमुळे त्वचेवर आलेला काळवंडलेपणा दूर होतो. केळ्याची साल याठिकाणी चोळून काही काळ ठेवले असता त्वचेवरील डाग व काळवंडलेपणा निघून जाते. केळीच्या साला मध्ये असलेल्या नैसर्गिक ओलाव्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.

6) केळी सोलुन झाल्यावर उरलेल्या सालीला कच-या मध्ये टाकण्याअगोदर त्याचे काही घरगुती कामांसाठी चे उपयोग अनेक जणांनी शोधून काढले आहे .त्यामध्ये लेदर चे शूज किंवा चांदीच्या भांड्यांना केळीच्या सालीने घासले असता वेगळीच चमक प्राप्त होते.

7) बाग कामामध्ये केळाच्या सालीला खूपच महत्त्व आहे. तसे बागकाम करणाऱ्या तज्ञांकडून सांगितले जाते .केळीच्या सालापासून खूप उत्कृष्ट असे कंपोस्ट खत तयार केले जाऊ शकते. पाण्यामध्ये केळीची साल घालून ते झाडांना घातले असता झाडांना पोषण मिळते.गांडूळ खत बनवतानाही केळीचे साल त्यामध्ये टाकले जाऊ शकते. तसेच केळीचे साल खत म्हणून वापरले असता परागीभवनाचे प्रक्रियेमध्ये मुख्य भूमिका बजावणाऱ्या फुलपाखरांनाही झाडांकडे आकृष्ट केले जाऊ शकते.

8) औषधी गुणधर्म असलेल्या केळीच्या सालाचे सेवन हे केळीप्रमाणेच करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत.यासाठी केळीच्या सालापासून ग्रीन टी प्रमाणे चहा बनवला जातो किंवा साखर आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये केळीचे साल मिसळून त्यापासून कॅंडीज बनवून त्याचे सेवन केले जाते काही ठिकाणी केळीच्या  साला पासून चटणी बनवली जाते.
9) केळीप्रमाणे सालीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते केळीचे साल खाल्यामुळे आपल्या शरीराला हे दोन्ही घटक मिळतात मिळतात व रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत मिळते.

10) केळीच्या सालामध्ये सेरोटोनिन हे मानसिक आजाराशी निगडित संप्रेरक असते ज्यामुळे नैराश्य सारख्या समस्यांपासून बचाव केला जातो.डोपामिन हे घटक सुद्धा केळीच्या सालीमध्ये असतात.ज्यामुळे हृदयाचे ठोके योग्य गतीने पडतात आणि हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी साहाय्य मिळते.
11) केळीच्या साला मध्ये एंटीऑक्सीडेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे रोग प्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

12) कच्चे केळी आणि पिकलेल्या केळी  यांचेमध्ये  पिकलेल्या  केळीच्या साला मध्ये कॅन्सर पासून बचाव करणारे गुणधर्म असतात तर  कच्च्या केळीच्या मध्ये अमिनो ऍ सि ड भरपूर प्रमाण असते.
13) चेहऱ्यावर जेव्हा चामखीळ किंवा मस येण्यास सुरुवात होते तेव्हा त्या ठिकाणी केळीच्या सालाला चोळून लावावे यामुळे ते चामखीळ  व त्याचे डाग राहत नाही.

beingmarathi