आहारातील हे पदार्थ भरून काढतील शरीरातील लोहाची कमतरता

आहारातील हे पदार्थ भरून काढतील शरीरातील लोहाची कमतरता

शरीरात लोह कमी झाले की, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रास व्हायला लागतात. यापासून सुटका हवी असेल तर, आपल्या आहारामध्ये लोहयुक्त पदार्थांचा समावेश असणे गरजेचे असते. हे पदार्थ कोणते कोणते आहेत आणि त्यामुळे काय फायदा होतो हे जाणून घेणे गरजेचे आहे.

तुमच्या आहारामध्ये बीट असणे गरजेचे आहे. याने लोहाची कमतरता भरून निघते. आणि शरीरात रक्त देखील वाढते त्यामुळे रोज जेवणामध्ये बीट किंवा बीटाची कोशिंबीर अवश्‍य असावी.

अनेकांना पालकाची भाजी आवडत नाही. मात्र, यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते त्याचबरोबर कॅल्शियम, सोडियम, क्‍लोरिन, फॉस्फरस, भरपूर प्रमाणात खनिजे आणि प्रथिने हे देखील असतात. त्यामुळे पालक खरतर शक्तीवर्धक आहे आणि त्याचा आहारात वापर अतिशय फायदेशीर आहे.

डाळींबाचे सेवन देखील आरोग्यास भरपूर फायदेशीर असते. लोहाचे प्रमाण शरीरात वाढवण्यासाठी डाळिंब खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. दररोज डाळिंबाचा ज्यूस किंवा डाळिंब शरीरात गेल्याने कधीच लोहाची कमतरता जाणवत नाही.

तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र पेरू खाल्ल्याने देखील शरीरात लोह वाढते आणि आपले वचन क्रियेच्या दृष्टीने सुदृढ मार्गक्रमण सुरु होते. दररोज पेरू खाणे शक्य असेल तर ते अवश्य खावे.

या पैकी काहीच शक्य झाले नाही तर सुकामेवा आपल्याला लोह प्रदान करतो. त्यामुळे तो तरी अवश्य रोज खावा. याशिवाय तुम्ही शेंगदाणे आणि गूळ खाऊन देखील लोहाचे प्रमाण शरीरात वाढवू शकता.

Being Marathi