उन्हाळ्यात जाणवत असेल पिंपल्सचा त्रास असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय…!

उन्हाळ्यात जाणवत असेल पिंपल्सचा त्रास असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय…!

उन्हाला लागला कि चेहऱ्यावर सनबर्न, पिंपल्स आणि पुरळ उठू लागतात. उन्हाळ्यामध्ये घामासोबतच चेहरा निस्तेज आणि टॅन होऊ लागतो. अनेक प्रकारचे घरगुती उपाय करून देखील पिंपल्स जाण्याचे नाव घेत नाहीत. चेहरा वारंवार धुतल्यानंतरही चेहरा तेलकट आणि निस्तेज दिसतो. कडक उन्हापासून चेहऱ्याचा बचाव करण्यासाठी चेहरा झाकून घ्या, सनस्क्रीन लावा हे केले जाते तरी देखील चेहऱ्यावर पिंपल्स येतातच. चला तर मग आज आपण उन्हाळ्यात पिंपल्स कसे टाळायचे. खालील गोष्टी केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाहीत.आणि थंडावा जाणवेल.

पुदीना पाण्याचे फायदे…

उन्हाळ्यात पुदिन्याच्या पाण्याची मदत घेऊ शकता. पावसाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सतत पाणी पिले पाहिजे यामुळे शरीर डिटॉक्स होते. जर तुम्हाला पुदिनाची चव आवडत नसेल तर पुदिन्याची पाने आणि लिंबू घालून पाणी पिऊ शकता. ताज्या पुदिन्याची चव सर्वांनाच आवडते, याशिवाय हे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्याला मार्केट मध्ये कोठेही पुदिन्याची पाने घेऊ शकता किंवा घरी सहज बनवू शकता. या पाण्याचे अनेक फायदे आहेत.

१) पिंपल्सपासून सुटका :- कडक उन्हाळ्यात पुदिन्याचे पाणी पिल्यामुळे आर्द्रता, चिकटपणा आणि घाम येणे आणि तेलकट त्वचेपासून सुटका मिळते. पुदिनामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येत नाहीत.

२) त्वचा राहील ताजी :- उन्हाळ्यात चेहरा निर्जीव झाल्यासारखा वाटतो. त्वचेची चमक देखील नाहीशी होते, अशा परीस्थितीत जर तुम्ही पुदिन्याचे पाणी प्रमाणात पिल्यामुळे तुमची त्वचा एकदम फ्रेश राहते.

३) पोटासाठी आरोग्यदायी :- बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ आणि ऍसिडिटी होते. अशा परिस्थितीत पुदिन्याचे पाणी पिल्यामुळे या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल. पुदिन्यात मेन्थॉल असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित चालते. त्यामुळे पुदिन्याचे पाणी चेहरा आणि पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

beingmarathi

Related articles