चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, काही मिनिटातचं होतील दूर…!

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, काही मिनिटातचं होतील दूर…!

चेहऱ्यावरील मृत पेशींखाली तेल साचल्यामुळे त्वचेवर लहान-लहान दाणे येऊ लागतात आणि हवेच्या संपर्कात आल्यावर ऑक्सिडायझेशन होऊन काळी पडते. हे ब्लॅकहेड्स हे जास्त प्रमाणात नाकाजवळ येतात, ते काढणे फार कठीण असते कारण ते मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात आणि सहज निघण्याचे नाव घेत नाहीत. चला तर मंग असे घरगुती उपाय बघूया, जे आजींच्या काळापासून चालत आलेले आहेत आणि समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय…

१) अंडी : एका वाटीत अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी लावा. 15-20 मिनिटे कोरडे होऊ द्या नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा करू शकता.

२) बेकिंग सोडा : एका चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे पाणी एकत्र मिसळून पेस्ट तयार करा आणि ब्लॅकहेड्सवर लावा. 10-15 मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. बेकीं सोडा हे एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि चेहऱ्यावरील तेल देखील शोषून घेते.

३) ग्रीन चहा : एक चमचा ग्रीन टीची पाने घ्या आणि पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर २० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

४) केळीचे साल : ब्लॅकहेड्सवर केळीच्या सालीचा आतील भाग चोळल्याने फायदा होतो. हे ब्लॅकहेड्स कमी करण्याचे मदत करतात.

५) हळद : अँटिऑक्सिडंटने समृद्ध हळद ​​ब्लॅकहेड्सवर अत्यंत प्रभावी ठरते. हळदीमध्ये खोबरे तेल घाला याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चार स्वच्छ धुवा. हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा.

beingmarathi

Related articles